अनुवाद 28:5-8
अनुवाद 28:5-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुमच्या टोपल्या आणि पराती परमेश्वराच्या आशीर्वादाने भरलेल्या राहतील. तुम्ही आत याल तेव्हा आशीर्वादीत व्हाल आणि बाहेर जाल तेव्हा आशीर्वादीत व्हाल. तुमच्यावर चाल करून येणाऱ्या शत्रूला पराभूत करण्यास तुम्हास परमेश्वराचे साहाय्य होईल. एका वाटेने आलेला शत्रू सात वाटांनी पळत सुटेल. परमेश्वराच्या कृपेने तुमची कोठारे भरलेली राहतील. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हास जो देश देत आहे त्यामध्ये तुमची भरभराट होईल.
अनुवाद 28:5-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुमच्या टोपल्या व तुमची पीठ मळण्याची परात आशीर्वादित होतील. तुम्ही बाहेर जाल तेव्हा व तुम्ही आत याल तेव्हा आशीर्वादित व्हाल. तुमचे शत्रू जेव्हा तुम्हावर हल्ला करतील, तेव्हा याहवेह त्यांचा तुमच्यासमोर पराजय करतील. ते एका दिशेकडून तुमच्यावर चालून येतील, परंतु सात दिशांना पळून जातील. याहवेह तुमच्या धान्याची कोठारे आणि जे काही तुम्ही हाती घ्याल त्यास आशीर्वादित करतील, याहवेह तुमचे परमेश्वर देत असलेल्या देशात तुम्ही जाल तिथे ते तुमची भरभराट करतील.
अनुवाद 28:5-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होईल. तू आत येशील तेव्हा आणि बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्यापुढे मार खातील असे परमेश्वर करील; ते एका वाटेने तुझ्यावर चालून येतील पण तुझ्यापुढून सात वाटांनी पळून जातील. तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल.