अनुवाद 28:1-2
अनुवाद 28:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आज, मी दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळल्यात व तुमचा देव परमेश्वर याची वाणी तुम्ही ऐकाल तर तुमचा देव परमेश्वर तुम्हास पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्चस्थानी नेईल. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकाल तर हे सर्व आशीर्वाद तुमच्याकडे येतील
अनुवाद 28:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह तुमच्या परमेश्वराच्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुम्हाला देत आहे, त्या सर्व तुम्ही पाळल्या, तर याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा श्रेष्ठ असे राष्ट्र करतील. जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळाल तर हे सर्व आशीर्वाद तुम्हावर येतील व तुमच्यासह असतील
अनुवाद 28:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील; तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील.