अनुवाद 16:11-12
अनुवाद 16:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या विशेष निवासस्थानी जा. तेथे तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात सहकुटुंब सहपरिवार आनंदात वेळ घालवा. आपली मुलेबाळे, दास, गावातील लेवी, परके, अनाथ, विधवा या सर्वांना बरोबर घ्या. तुम्ही मिसरमध्ये दास होता हे विसरु नये म्हणून हे विधी न चुकता पाळा.
सामायिक करा
अनुवाद 16 वाचाअनुवाद 16:11-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला मुलगा व मुलगी, दास व दासी, आणि तुझ्या गावातला लेवी, आणि तुमच्यामध्ये असलेला उपरा, अनाथ व विधवा ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद कर. तू मिसर देशात दास होतास ह्याचे तुला स्मरण राहावे म्हणून हे विधी काळजीपूर्वक पाळ.
सामायिक करा
अनुवाद 16 वाचा