YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 11:18-32

अनुवाद 11:18-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

म्हणून तुम्ही माझी ही वचने आपल्या ध्यानीमनी साठवून ठेवा, ती चिन्हांदाखल आपल्या हातांना बांधा आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लावा. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना ती शिकवा आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा. ती आपल्या दारांच्या चौकटीवर आणि फाटकांवर लिहा. म्हणजे जो देश तुमच्या पूर्वजांना देण्याचे परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक वचन दिले होते त्यात तुम्ही व तुमची मुलेबाळे पृथ्वीच्या वर आकाश असेपर्यंत चिरायू होतील. ही जी आज्ञा मी तुम्हांला देत आहे ती सर्व तुम्ही काळजीपूर्वक पाळाल, आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम कराल, त्याच्या सर्व मार्गांनी चालाल आणि त्यालाच धरून राहाल, तर परमेश्वर ही सर्व राष्ट्रे तुमच्यासमोरून घालवून देईल आणि तुमच्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रांना तुम्ही आपल्या ताब्यात घ्याल. जेथे तुमचे पाऊल पडेल ते प्रत्येक स्थळ तुमचे होईल. रानापासून लबानोनापर्यंत आणि नदीपासून म्हणजे फरात नदीपासून पश्‍चिम समुद्रापर्यंत तुमच्या देशाचा विस्तार होईल. तुमच्याशी कोणी सामना करणार नाही; ज्या भूमीवर तुम्ही पाऊल टाकाल तेथल्या रहिवाशांच्या मनात तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमच्याविषयी भीती व दहशत उत्पन्न करील. पाहा, आज तुमच्यापुढे आशीर्वाद व शाप हे दोन्ही मी ठेवत आहे, म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा मी आज तुम्हांला सांगत आहे त्या तुम्ही पाळल्या तर तुम्हांला आशीर्वाद मिळेल; पण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत आणि ज्या मार्गाने जाण्याची मी आज तुम्हांला आज्ञा करीत आहे तो सोडून तुम्हांला अपरिचित अशा अन्य देवांच्या मागे तुम्ही गेलात तर तुम्हांला शाप मिळेल. जो देश ताब्यात घ्यायला तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेऊन पोहचवील तेव्हा तू गरिज्जीम डोंगरावरून आशीर्वाद आणि एबाल डोंगरावरून शाप उच्चारावास. हे डोंगर यार्देनेपलीकडे सूर्य मावळतो त्या दिशेला अराबात राहणारे कनानी ह्यांच्या प्रदेशात गिलगालासमोर, मोरे येथील एलोन वृक्षाच्या जवळ आहेत ना? जो देश तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देत आहे तो वतन करून घेण्यासाठी तुम्ही यार्देन ओलांडून जात आहात; तुम्ही तो ताब्यात घ्याल व त्यात वस्ती कराल. तेव्हा जे विधी व नियम मी आज तुम्हांला देत आहे ते सर्व काळजीपूर्वक पाळा.

सामायिक करा
अनुवाद 11 वाचा

अनुवाद 11:18-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

म्हणून सांगतो या आज्ञा लक्षात ठेवा. त्या हृदयात साठवून ठेवा. त्या लिहून ठेवा. आणि लक्षात राहण्यासाठी हातावर चिन्हादाखल बांधा व कपाळावर लावा. आपल्या मुलाबाळांना हे नियम शिकवा. घरीदारी, झोपताना, झोपून उठताना त्याविषयी बोलत राहा. घराच्या फाटकांवर, आणि दारांच्या खांबांवर ही वचने लिहा. म्हणजे जो देश परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला त्या देशात तुम्ही आणि तुमची मुलेबाळे पृथ्वीवर आकाशाचे छप्पर असेपर्यंत रहाल. मी सांगतो त्या सर्व आज्ञा नीट पाळा. परमेश्वर तुमचा देव ह्याजवर प्रेम करा. त्याने सांगितलेल्या मार्गाने जा. त्याच्यावरच निष्ठा ठेवा. म्हणजे तुम्ही जाल तेव्हा तेथील इतर राष्ट्रांना परमेश्वर तेथून हुसकावून लावेल. तुमच्यापेक्षा मोठ्या आणि सामर्थ्यवान राष्ट्रावर तुम्ही ताबा मिळवाल. जेथे जेथे तुम्ही पाय ठेवाल ती जमीन तुमची होईल. दक्षिणेतील वाळवंटापासून उत्तरेला लबानोन पर्यंत आणि पूर्वेला फरात नदीपासून पश्चिमेला समुद्रापर्यंत एवढा प्रदेश तुमचा होईल. कोणीही तुमचा सामना करु शकणार नाही. परमेश्वर देवाने तुम्हास सांगितल्याप्रमाणे, तुम्ही जेथे जेथे जाल तेथे लोकांस तुमची दहशत वाटेल. आज मी तुमच्यापुढे आशीर्वाद आणि शाप हे पर्याय ठेवत आहे. त्यातून निवड करा. आज मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा तुम्हास सांगितल्या त्या नीट लक्षपूर्वक पाळल्यात तर तुम्हास आशीर्वाद मिळेल. पण या आज्ञा न ऐकता भलतीकडे वळालात तर शाप मिळेल. तेव्हा आज मी सांगितल्या मार्गानेच जा. इतर दैवतांच्या मागे लागू नका. परमेश्वरास तुम्ही ओळखता पण इतर दैवतांची तुम्हास ओळख नाही. तुमचा देव परमेश्वर तुम्हास त्या प्रदेशात घेऊन जाईल. तुम्ही लवकरच तो प्रदेश ताब्यात घ्याल. तेथे गेल्याबरोबर तुम्ही गरिज्जीम डोंगरावर जा, व आशीर्वाद उच्चारा. मग तेथून एबाल डोंगरावर जाऊन शापवाणीचा उच्चार करा. हे डोंगर यार्देन नदीच्या पलीकडे, सुर्य माळवतो त्या दिशेला अराबात राहणाऱ्या कनानी लोकांच्या प्रदेशात, पश्चिमेकडे गिलगाल शहराजवळच्या मोरे येथील ओक वृक्षांजवळ आहेत. तुम्ही यार्देन नदी पार करून जाल. तुमचा देव परमेश्वर देत असलेली जमीन तुम्ही ताब्यात घ्याल. ती तुमची असेल. त्यामध्ये वस्ती कराल तेव्हा मी आज सांगितलेले नियम व विधी यांचे काळजीपूर्वक पालन करा.

सामायिक करा
अनुवाद 11 वाचा

अनुवाद 11:18-32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यास्तव माझ्या या आज्ञा काळजीपूर्वक आपल्या मनात आणि अंतःकरणात साठवून ठेवा; त्या तुम्ही आपल्या हातावर चिन्ह म्हणून बांधून ठेवा आणि आपल्या कपाळपट्टीवर बांधा. त्या आपल्या मुलांना शिकवा. घरी बसलेले असताना, वाटेवर चालत असताना, झोपण्याच्या वेळी व झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल बोलत राहा. त्या तुमच्या घरातील दाराच्या चौकटीवर व तुमच्या फाटकांवर लिहाव्या, म्हणजे जितके दिवस पृथ्वीवर आकाश स्थित आहे, तितके तुमच्या पूर्वजांना याहवेहने देऊ केलेल्या वचनदत्त देशात तुमचे आणि तुमच्या मुलाबाळांचे दिवस असतील. मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळाल—याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती कराल, आज्ञाधारकपणे त्यांच्या मार्गावर चालत राहाल आणि त्यांना बिलगून राहाल— तर याहवेह या सर्व राष्ट्रांना तुमच्यापुढून घालवून देतील आणि तुमच्यापेक्षा कितीही मोठी आणि बलवान राष्ट्र असोत, तुम्ही त्यांना आपल्या ताब्यात घ्याल. तुम्ही जिथे पाऊल ठेवाल, ती प्रत्येक भूमी तुमची होईल: तुमच्या देशाची सीमा दक्षिणेकडील नेगेव प्रांतापासून लबानोन देशापर्यंत व फरात नदीपासून भूमध्य समुद्रापर्यंत पसरेल. तुमच्याविरुद्ध कोणीही उभे राहू शकणार नाही. कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे, तुम्ही जाल त्या ठिकाणी तुम्हाविषयी तेथील लोकात ते भय आणि दहशत निर्माण करतील. पाहा, मी आज तुमच्यापुढे आशीर्वाद व शाप ठेवीत आहे— याहवेह तुमच्या परमेश्वराच्या ज्या आज्ञा आज मी तुम्हाला देणार आहे, त्या जर तुम्ही पाळल्या, तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल; आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा न मानल्यास, आज मी तुम्हाला ज्या मार्गाने जाण्याची आज्ञा देत आहे त्यापासून भटकून जाल आणि जी दैवते तुम्हाला माहीत नाहीत अशांचे अनुसरण करण्यास सुरुवात कराल, तर तुम्हाला शाप मिळेल. याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जेव्हा या देशाचा ताबा घेण्यासाठी आणतील, तेव्हा तुम्ही गरिज्जीम डोंगरावरून आशीर्वाद आणि एबाल डोंगरावरून शाप उच्चारावा. तुम्ही जाणता, हे डोंगर यार्देन नदीच्या पश्चिमेला असलेल्या कनानी लोकांच्या देशात आहेत. कनानी लोक जे अराबात गिलगाल या शहराजवळ असलेल्या ओसाड भागात राहतात. हे ठिकाण मोरेहच्या जवळील एला वृक्षांच्या राईपासून दूर नाही. तुम्ही यार्देन नदी ओलांडून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेला देश काबीज करण्यास जात आहात. तुम्ही तो ताब्यात घ्याल आणि तिथे वस्ती कराल, पण मी आज तुमच्यासमोर ठेवत असलेल्या सर्व विधी व नियम पाळण्याची खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे.