YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 6:1-4

दानीएल 6:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

दारयावेश राजाने आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सर्व साम्राज्यात एकशे वीस प्रांताधिकारी नेमले; त्यांच्यावर तीन अध्यक्ष नेमले, दानीएल त्यांपैकी एक होता; राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून प्रांता-धिकार्‍यांनी आपला हिशोब त्या तिघांना द्यावा असे ठरवले. दानीएल त्या अध्यक्षांत व प्रांताधिकार्‍यांत श्रेष्ठ ठरला, कारण त्याच्या ठायी उत्तम आत्मा वसत होता; त्याला सर्व राज्यावर नेमावे असा राजाचा विचार होता. असे असता राज्यकारभारासंबंधाने दानिएलाविरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांताधिकार्‍यांनी चालवला; पण त्यांना काही निमित्त किंवा दोष सापडेना; कारण तो विश्वासू असून त्याच्या ठायी काही चूक किंवा अपराध सापडला नाही.

सामायिक करा
दानीएल 6 वाचा

दानीएल 6:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

दारयावेश राजाने त्याच्या मर्जिने आपल्या सर्व साम्राज्यात एकशे वीस प्रांताधिकारी नेमले. त्यांच्यावर तीन मुख्यप्रशासक होते. त्यापैकी एक दानीएल होता. या प्रशासकांची नेमणूक यासाठी होती की राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून सर्व प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना हिशोब द्यावा व त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. दानीएल त्या प्रशासक व प्रांताधिकाऱ्यांत श्रेष्ठ ठरला कारण त्याच्यामध्ये उत्तम आत्मा वसत होता. राजा त्यास सर्व राज्यावर नेमण्यासाठी योजना करत होता. असे असताना इतर मुख्य प्रशासक आणि प्रांतिधिकारी हे दानीएलात चूक शोधण्याचा प्रयत्न करत होते. पण तो विश्वासू असल्याने त्यांना त्याच्यात काहीच चूक सापडली नाही.

सामायिक करा
दानीएल 6 वाचा

दानीएल 6:1-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

दारयावेश राजाने आपल्या मर्जीनुसार आपल्या संपूर्ण साम्राज्यात राज्य करण्यासाठी 120 प्रांताधिकारी नियुक्त करावे, व त्यांच्यावर तीन अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली होती, ज्यामध्ये दानीएल एक होता. राजाला कोणत्याच प्रकारची हानी होऊ नये म्हणून प्रांताधिकार्‍यांनी त्यांना हिशोब द्यावा. दानीएल हा अध्यक्ष व प्रांताधिकारी यांच्यापेक्षा त्याच्या विलक्षण गुणांमुळे सरस असल्यामुळे शासक म्हणून त्यालाच संपूर्ण साम्राज्यावर नेमावे अशी राजाची योजना होती. यामुळे अध्यक्ष आणि प्रांताधिकारी दानीएलविरुद्ध राज्य कारभारातील दोष शोधण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना त्याच्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार आढळला नाही, कारण तो विश्वासू होता आणि तो भ्रष्ट नव्हता किंवा निष्काळजीपणाही करीत नव्हता.

सामायिक करा
दानीएल 6 वाचा