YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 5:10-16

दानीएल 5:10-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

राजा आणि सरदार यांचे बोलणे ऐकूण राणीची आई त्या मेजवाणी गृहात आली. ती म्हणाली, “महाराज चिरायू असा चिंतातूर होऊ नका आपली मुद्रा पालटू देवू नका. आपल्या राज्यात एक असा पुरूष आहे ज्यात पवित्र देवाचा आत्मा वसतो. आपल्या वडिलाच्या राज्यात, प्रकाश, विवेक, देवाच्या ज्ञानासारखे ज्ञान त्यामध्ये दिसून आले आपला बाप राजा नबुखद्नेस्सराने त्यास सर्व जादूगार भूतविद्या करणारे, खास्दी आणि ज्योतीषी यावर प्रशासक म्हणून त्यास नेमले. उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नांचा उलगडा करणे, कोडी स्पष्ट करणे, आणि अडचणी सोडवणे, या गुंणवत्ता ज्या दानीएलात आढळल्या त्यास बेल्टशस्सर नाव दिले. आता त्या दानीएलाला बोलवा म्हणजे तो अर्थ सांगेल.” नंतर दानीएलास राजासमोर आणले. “राजा त्यास म्हणाला तू दानीएल आहेस, यहूदातून पकडून आणलेल्या बंदीवानातील एक ज्यास माझ्या वडिलाने पकडले होते. मी तुझ्याविषयी ऐकले आहे, की देवाचा आत्मा तुझ्यात राहतो आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान हे तुझ्या ठायी दिसून आले आहे. मला हा लेख वाचून त्याचा अर्थ सांगण्यासाठी हे ज्ञानी लोक जे भुतविदया करणारे मजसमोर आहेत पण त्यांना ह्याचा अर्थ सांगता येईना. मी तुझ्याबाबतीत ऐकले आहे की तू ह्याचा अर्थ सांगून हे सोडवू शकतो आता जर तू मला हे लिखाण वाचून त्याचा अर्थ सांगशील तर मी तुला जांभळे वस्त्र व तुझ्या गळयात सोन्याचा गोफ देवून तुला राज्यातील ज्ञानी प्रशासकांपैकी एक प्रशासक करील.”

सामायिक करा
दानीएल 5 वाचा

दानीएल 5:10-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

राजा आणि अधिकार्‍यांचा आवाज ऐकून राणी मेजवानीच्या दिवाणखान्यात आली. ती म्हणाली, “महाराज, चिरायू असा! घाबरू नका, आपली मुद्रा पालटू देऊ नका. कारण ज्याच्यामध्ये पवित्र देवांचा आत्मा आहे असा एक मनुष्य आपल्या राज्यात आहे. तुमच्या पित्याच्या कारकिर्दीत हा मनुष्य जणू काय देवच आहे अशा ज्ञानाने व शहाणपणाने परिपूर्ण असून असे आढळून आले होते. तुमचा पिता नबुखद्नेस्सर राजाच्या कारकिर्दीत त्याला बाबेलमधील सर्व जादूगार, मांत्रिक, ज्योतिषी, दैवप्रश्न सांगणारे या सर्वांवर प्रमुख नेमण्यात आले होते. त्याने हे केले कारण दानीएल हा ज्याला राजा बेलटशास्सर म्हणत होता, त्याच्याकडे उत्तम मन आणि ज्ञान आणि समज होती आणि त्याच्याकडे स्वप्नांचा अर्थ सांगण्याचे, कोडे सोडविण्याचे आणि कठीण समस्या सोडविण्याची क्षमता होती. म्हणून दानीएलला बोलवा म्हणजे तो तुम्हाला त्या लिखाणाचा अर्थ सांगेल.” तेव्हा दानीएलला राजासमोर आणण्यात आले आणि राजाने त्याला म्हटले, “दानीएल तो तूच आहेस काय, ज्याला माझे पिता राजा यांनी यहूदीयातून कैदी म्हणून आणला होता? तुझ्यामध्ये देवांचा आत्मा आहे आणि प्रकाश, बुद्धी आणि उत्कृष्ट शहाणपण यांनी तू परिपूर्ण आहेस असे मी ऐकले आहे. ज्ञानी लोकांनी आणि ज्योतिषांनी भिंतीवरील हे लिखाण वाचावे आणि त्याचा अर्थ काय आहे हे सांगावे म्हणून त्यांना माझ्यापुढे आणले पण ते अर्थ सांगू शकले नाही. मी तुझ्याबद्दल ऐकले आहे की तू अर्थ सांगण्यात आणि कोडी सोडविण्यात सक्षम आहेस. जर तू हे लिखाण वाचशील आणि त्याचा अर्थ मला समजावून सांगशील, तर तुला जांभळा पोशाख देण्यात येईल आणि गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात येईल आणि राज्यात तू तिसर्‍या क्रमांकाचा सत्ताधारी होशील.”

सामायिक करा
दानीएल 5 वाचा

दानीएल 5:10-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

राजा व त्याचे सरदार ह्यांचे शब्द ऐकून राणी भोजनगृहात आली. ती म्हणाली, “महाराज, चिरायू असा; आपल्या मनाची तळमळ होऊ देऊ नका; आपण आपली मुद्रा पालटू देऊ नका. पवित्र देवांचा आत्मा ज्यात आहे असा एक पुरुष आपल्या राज्यात आहे; आपल्या बापाच्या कारकिर्दीत प्रकाश, विवेक व देवांच्या ज्ञानासारखे ज्ञान ही त्याच्या ठायी दिसून आली; महाराज, आपला बाप नबुखद्नेस्सर राजा ह्यांनी त्याला ज्योतिषी, मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ ह्यांचा अध्यक्ष नेमले होते; कारण उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नांचा अर्थ सांगणे, कूट प्रश्‍न उलगडणे, कोडी उकलणे, ह्यासंबंधाने ज्याला राजाने बेल्टशस्सर असे नाव दिले होते तो दानीएल प्रवीण होता असे दिसून आले; तर आता दानिएलास बोलावून आणा म्हणजे तो अर्थ सांगेल.” तेव्हा दानिएलास राजापुढे आणले. राजा त्याला म्हणाला, “माझा बाप, जो राजा, त्याने यहूदातून पकडून आणलेल्या लोकांपैकी दानीएल तो तूच काय? मी तुझ्याविषयी ऐकले आहे की देवांचा आत्मा तुझ्या ठायी आहे आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान ही तुझ्या ठायी दिसून आली आहेत. आता हा लेख वाचून त्याचा अर्थ मला सांगावा म्हणून हे ज्ञानी व मांत्रिक लोक माझ्यापुढे आणले, पण त्याचा अर्थ त्यांना सांगता येईना. मी तुझ्याविषयी ऐकले आहे की, तुला स्वप्नांचा अर्थ सांगता येतो व कोडी उकलता येतात; आता तुला हा लेख वाचता येऊन त्याचा अर्थ मला सांगता आला तर तुला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, तुझ्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल आणि तू राज्यातील तिघा अधिपतींतला एक होशील.”

सामायिक करा
दानीएल 5 वाचा