YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 4:1-26

दानीएल 4:1-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नबुखद्नेस्सर राजाने सर्व लोक राष्ट्र आणि पृथ्वीवरील सर्व भाषा बोलाणाऱ्या लोकात फर्मान पाठवले की, तुमचे कल्याण होवो. सर्वोच्च देवाने जी चिन्हे आणि जे चमत्कार माझ्यासाठी केलेले तुम्हास सांगावे हे मला बरे वाटले आहे; त्याची चिन्हे किती थोर, त्याचे चमत्कार किती अद्भूत, त्याचे राज्य हे सार्वकालीक राज्य आहे. त्याचे स्वामित्व पिढ्यानपिढ्या राहते. मी, नबुखद्नेस्सर, माझ्या घरात सुखाने राहत हातो आणि माझ्या महलात समृद्धीचा उपभोग घेत होतो. मी स्वप्न पाहिले आणि घाबरलो मी त्यावेळी आपल्या पलंगावर पडलो होतो. त्या दृष्टांतामुळे माझे मन अधिर झाले. म्हणून मी आज्ञा केली की, बाबेलातील सर्व ज्ञानी लोकांस मजकडे आणावे म्हणजे ते माझ्या स्वप्नाचा उलघडा करतील. तेव्हा जादूगार, भुतविद्या करणारे, खास्दी आणि ज्योतिषी हे मजकडे आले. मी त्यांना स्वप्न सांगितले पण त्याचा उलघडा त्यांना होईना. शेवटी दानीएल आत आला, त्यास मी माझ्या देवाचे नाव बेल्टशस्सर दिले आहे. त्यास मी स्वप्न सांगितले. बेल्टशस्सरा, सर्व ज्ञान्यांच्या अधिकाऱ्या, मला ठाऊक आहे पवित्र देवाचा आत्मा तुझ्यामध्ये निवास करतो आणि तुला कोणतेही गुढ रहस्य अवघड नाही. मला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ मला सांग. मी माझ्या पलंगावर पडलो असता मला दिसले ते असे, मी पाहिले, पृथ्वीच्या मधोमध एक मोठा वृक्ष होता आणि त्याची उंची खूप मोठी होती. तो वृक्ष वाढून मजबूत झाला त्याचा शेंडा आकाशात पोहचला आणि त्याचा देखावा सर्व पृथ्वीच्या सीमेपर्यंत पोहचला. त्याची पाने सुंदर होती, त्यास भरपूर फळे असून ती सर्वांना खायला पुरेशी होती. वनपशु त्याच्या सावलीत आणि आकाशातील पक्षी त्याच्या फांद्यामध्ये राहत. तो वृक्ष सर्व जिवितांचे पोषण करीत असे. मी माझ्या बिछान्यात पडलो असता माझ्या मनात पाहिले आणि एक पवित्र देवदूत आकाशातून खाली उतरला. तो मोठ्याने ओरडून म्हणाला हा वृक्ष तोडून टाका आणि त्याच्या फांद्या छाटून टाका, त्याची पाने काढून टाका आणि फळे विखरा, त्याच्या खाली राहणारे प्राणी पळून जावो आणि फांद्यांतील पाखरे उडून जावोत. पण त्याचा बुंधा जमिनीत राहू दया. त्यास लोखंड आणि पितळेच्या पट्टया बांधून, कुरणाच्या कोवळ्या गवतात राहू द्या. त्यास आकाशातील दहीवरात भिजू द्या, वनपशुंबरोबर त्यास भूमीवरील गवताचा वाटा मिळू द्या. त्याचे मानवी हृदय जावून त्यास प्राण्याचे हृदय प्राप्त होवो, तो पर्यंत सात वर्षे होऊन जातील. हा निर्णय त्या देवदुताच्या घोषणेद्वारे आणि पवित्रजनांच्या विचाराने झाला आहे, यासाठी की मनुष्याच्या राज्यात परात्पर प्रभुत्व करतो, आणि ज्या कोणाला ते द्यायला तो इच्छितो त्यास तो ते देतो, आणि त्यावर मनुष्यातल्या सर्वांहून नीच अशा मनुष्यास तो स्थापतो, असे जिवंतांनी जाणावे. हे स्वप्न मी नबुखद्नेस्सर राजाने पाहिले आता तू हे बेल्टशस्सरा ह्याचा अर्थ मला सांग कारण माझ्या राज्यातल्या ज्ञानी जनांपैकी कोणीही ह्याचा अर्थ सांगू शकत नाही, पण तू हे सांगू शकतोस, कारण देवाचा पवित्र आत्मा तुझ्याठायी राहतो. मग दानीएल, ज्यास बेल्टशस्सर नाव देण्यात आले होते तो काही क्षणासाठी गोंधळून गेला आणि त्याचे मन अस्वस्थ झाले. राजा म्हणाला, “बेल्टशस्सर हे स्वप्न किंवा त्याच्या अर्थाने तू घाबरू नकोस.” तेव्हा बोलटशस्सर म्हणाला, “माझ्या स्वामी हे स्वप्न तुझा द्वेष करणाऱ्यास आणि याचा अर्थ तुझा शत्रुस लागू पडो. जो वृक्ष तू पाहीला, जो वाढून मजबुत झाला आणि ज्याचा शेंडा आकाशात गेला ज्यास सर्व पृथ्वीवरून पाहता येत होते. ज्यांची पाने सुंदर आणि फळे भरपूर असून ती सर्वांसाठी पुरेशी होती. त्याच्या सावलीत वनपशू राहत आणि फांद्यांमध्ये आकाशातील पक्षी राहत होते. हे राजा तो वृक्ष तू आहेस, तू वाढून बलवान झालास तुझी थोरवी आकाशापर्यंत पोचली आहे, तुझे अधिकार पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहचतात. हे राजा, तू एक स्वर्गदूत पाहिला जो स्वर्गातून खाली येवून म्हणाला, ‘हा वृक्ष तोडून ह्याचा नाश करा, पण त्यांचा बुंधा जमिनीत राहू दया, ह्याला लोखंड आणि पितळेच्या पट्टयांनी बांधून कुरणातल्या कोवळया गवतात राहू दया त्याने आकाशाचे दव भिजवो, तो सात वर्षे वनपशुसोबत राहो.’ हे राजा ह्याचा अर्थ, असा सर्वोच्च देवाचा हा आदेश आहे. जो माझ्या राजापर्यंत पोचला आहे. तुला मनुष्यातून काढून टाकण्यात येईल, तुझी वस्ती वनपशुमध्ये होईल. तुला बैलासारखे गवत खावे लागेल. आकाशातील दवाने तू भिजशील, सात वर्षे जाईपर्यंत तू हे जानशील की, मानवावर देवाची सत्ता आहे. जसे सांगण्यात आले आहे की, त्या वृक्षाची बुंधे तशीच राहू दया, हयाच प्रकारे, जेव्हा तू स्वर्गाचे नियम शिकशील तुझे राज्य तुला पुन्हा प्राप्त होईल.

सामायिक करा
दानीएल 4 वाचा

दानीएल 4:1-26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

नबुखद्नेस्सर राजाने, जगातील सर्व राष्ट्रातील विविध भाषा बोलणार्‍या सर्व लोकांना जाहीरनामा पाठविला तो हा: तुम्हा सर्वांची भरभराट होवो. परमोच्च परमेश्वराने मला जी चिन्हे व चमत्कार दाखविले ते तुम्ही सर्वांना सांगण्यात मला आनंद होत आहे. किती महान त्यांनी प्रकट केलेली चिन्हे, किती थोर त्यांनी केलेले चमत्कार! त्यांचे राज्य सदासर्वकाळचे आहे; त्यांचे प्रभुत्व पिढ्यान् पिढ्या राहणारे आहेत. मी नबुखद्नेस्सर आपल्या महालात शांतीने, संतुष्टीचे आणि समृद्धीचे जीवन जगत होतो. मी एक स्वप्न पाहिले, जेव्हा मी माझ्या बिछान्यावर निजलेला होतो, ते चित्र आणि दृष्टान्त जे माझ्या मनात आले, त्यामुळे मी अतिशय भयभीत झालो. माझ्या स्वप्नाचा अर्थ काय ते कळावे या हेतूने मी बाबेलमधील सर्व ज्ञानी लोकांना आज्ञा दिली. जेव्हा जादूगार, मांत्रिक, ज्योतिषी, दैवप्रश्न सांगणारे आले, तेव्हा मी त्यांना माझे स्वप्न सांगितले, पण ते मला त्याचा अर्थ सांगू शकले नाही. अखेरीस दानीएल माझ्या उपस्थितीत आला आणि मी त्याला माझे स्वप्न सांगितले. (माझ्या देवाच्या नावावरून मी त्याचे बेलटशास्सर असे नाव ठेवले होते. याच माणसामध्ये पवित्र देवाचा आत्मा आहे.) मी म्हणालो, “हे बेलटशास्सर, धुरंधर जादुगारा, पवित्र देवाचा आत्मा तुझ्यामध्ये आहे हे मला ठाऊक आहे आणि तुझ्यासाठी कोणतेच रहस्य कठीण नाही. माझे हे स्वप्न आहे; मला त्याचा अर्थ सांग. मी माझ्या बिछान्यावर निजलेला असताना हे दृष्टान्त पाहिले: पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष लावलेला मी पाहिले. तो प्रचंड उंचच उंच होता. तो वृक्ष वाढला आणि मजबूत झाला आणि त्याचा शेंडा आकाशापर्यंत पोहोचला; पृथ्वीच्या सीमेपासूनही तो दिसू शकत होता. त्याची पाने हिरवीगार होती, त्याला फळे भरपूर होती आणि त्यामध्ये प्रत्येकासाठी भोजन होते. त्याच्या खाली जंगली पशू विसावले होते, आणि त्याच्या फांद्यांमध्ये पक्षी राहत असत; त्यांनी आपली घरटी बांधली. त्यातून प्रत्येक प्राण्याला खायला मिळत असे. “मी बिछान्यावर निजलेला असताना हे दृष्टान्त पाहिले की, स्वर्गातून एक पवित्र, एक दूत खाली येत आहे. त्याने मोठ्याने ओरडून सांगितले ‘हे वृक्ष तोडून टाका, फांद्या कापून टाका; पाने ओरबाडून काढा आणि फळे विखरून द्या. त्याच्या खालचे पशू निघून जावोत आणि फांद्यांवरील पक्षी उडून जावोत. परंतु त्याचा बुंधा व मुळे लोखंड व कास्याने बांधून सभोवतालच्या गवतात जमिनीवरच राहू द्या. “ ‘आकाशातील दव पडून त्यास भिजू द्या आणि त्याला भूमीवरील गवतामध्ये पशूंसोबत राहू द्या. सात वर्षापर्यंत, त्याचे माणसाचे मन बदलले जावो आणि त्याला पशूचे मन दिले जावो. “ ‘हा निर्णय दूतांद्वारे घोषित केला जातो, पवित्र लोक हा निर्णय जाहीर करतात, जेणेकरून जिवंतांना हे कळावे की जे परात्पर आहेत, ते पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च राज्यकर्ता आहेत आणि ज्याला ते इच्छितात, त्यांना ते देतात आणि त्यांच्यावर अगदी कनिष्ठाला नियुक्त करतात.’ “हे स्वप्न आहे जे मी, राजा नबुखद्नेस्सरने पाहिले. हे बेलटशास्सर, आता याचा अर्थ काय तो मला सांग, कारण माझ्या राज्यात कोणताही ज्ञानी मनुष्य मला त्याचा अर्थ सांगू शकत नाही. फक्त तूच मला अर्थ सांगू शकशील, कारण पवित्र देवांचा आत्मा तुझ्यामध्ये आहे.” नंतर दानीएल (ज्याला बेलटशास्सर असेही म्हटले जात), काही वेळेसाठी व्याकूळ झाला आणि त्याचे विचार त्याला भयभीत करू लागले. म्हणून राजा म्हणाला, “हे बेलटशास्सर, माझे स्वप्न किंवा त्याचा अर्थ यामुळे भयभीत होऊ नको.” तेव्हा बेलटशास्सराने (अर्थात् दानीएलाने) उत्तर दिले, “महाराज, जर हे स्वप्न तुमच्या शत्रूंवर आणि त्याचा अर्थ तुमच्या विरोधकांवर ओढवला असता, तर किती बरे झाले असते! तुम्ही पाहिलेले वृक्ष, जे वाढले आणि मजबूत झाले, ज्याचे शिखर आकाशाला स्पर्श करू लागले आणि जे सर्व पृथ्वीवरून पाहिले जाऊ शकते, ज्यामध्ये सुंदर पाने आणि विपुल फळे होती, ज्याने सर्वांना अन्न दिले, ज्याने वन्यपशूंना आश्रय दिला आणि ज्याच्या फांद्यांवर पक्षी घरटे बांधली; महाराज, तुम्ही तो वृक्ष आहात! आपण समर्थ व थोर झाला आहात. आपले थोरपण आकाशाला जाऊन भिडले आहे आणि आपली सत्ता पृथ्वीच्या टोकांपर्यंत गेली आहे. “हे महाराज, नंतर आपणाला येणारा एक पवित्र दूत दिसला आणि तो म्हणत होता, ‘वृक्ष तोडा, त्याचा नाश करा, पण त्याचा बुंधा व मुळे तशीच जमिनीतील गवतात राखा. त्याच्याभोवती हिरवळ असेल व तो लोखंडाच्या आणि कास्याच्या पट्टयाने बांधलेला असेल. आकाशातील दवाने तो भिजून जावो! सात वर्षे मैदानातल्या पशूंसारखी त्याची गत होवो!’ “महाराज हे आहे याचा अर्थ, आणि महाराज, हा अर्थ आहे आणि परात्पर परमेश्वराने माझ्या स्वामी राजाच्या विरुद्ध काढलेला हा आदेश आहे: तुम्हाला लोकांमधून हाकलून देण्यात येईल आणि तुम्ही वन्यप्राण्यांबरोबर राहाल; तुम्ही बैलाप्रमाणे गवत खाल आणि आकाशाच्या दवाने भिजून जाल. सात कालखंड संपेपर्यंत तुम्ही या स्थितीत राहाल आणि मग तुमचा असा विश्वास असेल की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि ते ज्याला इच्छितात त्याला ही राज्ये देतात. परंतु बुंधा व मुळे जमिनीतच ठेवण्याची आज्ञा देण्यात आली आहे, याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही स्वीकाराल स्वर्ग राज्य करते तेव्हा तुमचे राज्य तुम्हाला परत केले जाईल.

सामायिक करा
दानीएल 4 वाचा

दानीएल 4:1-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नबुखद्नेस्सर राजा ह्याच्याकडून सर्व पृथ्वीवर राहणार्‍या सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणार्‍या लोकांना : तुमचे कल्याण असो! परात्पर देवाने जी चिन्हे व जे अद्भुत चमत्कार माझ्यासंबंधाने दाखवले आहेत ते विदित करावेत हे मला बरे वाटले आहे. त्याची चिन्हे किती थोर! त्याच्या अद्भुत चमत्कारांचा प्रभाव केवढा! त्याचे राज्य सर्वकालचे आहे व त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. मी नबुखद्नेस्सर आपल्या गृहात चैनीत होतो, आपल्या मंदिरात समृद्ध होतो. मी स्वप्न पाहिले त्याने मी भयभीत झालो; मी पलंगावर पडलो असता माझे विचार व माझ्या मनात घोळत असलेल्या कल्पना ह्यांनी मी चिंताक्रांत झालो. तेव्हा मी आज्ञा केली की मला स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी बाबेलातील सर्व ज्ञानी पुरुषांना माझ्याकडे आणावे. तेव्हा ज्योतिषी, मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ हे आत आल्यावर मी आपले स्वप्न त्यांच्यापुढे मांडले; पण त्यांनी त्याचा अर्थ मला सांगितला नाही. सरतेशेवटी दानीएल माझ्यापुढे आला; त्याचे माझ्या देवाच्या नावावरून बेल्टशस्सर हे नाव ठेवले आहे व त्याच्या ठायी पवित्र देवांचा आत्मा वसत आहे, त्याला मी आपले स्वप्न सांगितले. मी म्हणालो, हे बेल्टशस्सरा, ज्योतिष्यांच्या अध्यक्षा, पवित्र देवांचा आत्मा तुझ्या ठायी आहे व कोणतेही रहस्य तुला समजायला अवघड नाही हे मला ठाऊक आहे, तर मी पाहिलेल्या स्वप्नातील दृष्टान्त व त्यांचा अर्थ मला सांग. मी आपल्या पलंगावर पडलो असता माझ्या मनात जे दृष्टान्त घोळत होते ते हे : मी पाहिले, तेव्हा पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष होता, त्याची उंची फार मोठी होती. तो वृक्ष वाढून मजबूत झाला, त्याची उंची गगनास पोहचली व तो सगळ्या पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दिसू लागला. त्याला सुंदर पाने होती, त्यावर फळे विपुल असून सर्वांना खायला पुरेशी होती. वनपशू त्याच्या आश्रयाने राहत, अंतराळातील पक्षी त्याच्या शाखांमध्ये वस्ती करीत व त्या वृक्षावर सर्व मनुष्यांचे पोषण होत असे. मी पलंगावर पडलो असता माझ्या मनात दृष्टान्त घोळत होते, त्यांत मी पाहिले की एक जागल्या, पवित्र पुरुष, आकाशातून उतरला. तो मोठ्याने पुकारून म्हणाला, ‘हा वृक्ष तोडून टाका, ह्याच्या फांद्या छेदा, ह्याची पाने झाडून टाका व ह्याची फळे विखरा; ह्याच्याखाली राहत असलेले पशू निघून जावोत व पक्षी ह्याच्या शाखांतून उडून जावोत. तरीपण ह्याचे बुंध जमिनीत राहू द्या; ह्याला लोखंड व पितळ ह्यांच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या; ह्याला आकाशातल्या दहिवराने भिजू द्या; भूमीवरील गवताचा वाटा ह्याला वनपशूंबरोबर मिळो; ह्याचे मानवहृदय जाऊन ह्याला पशुहृदय प्राप्त होवो व सात काळ त्याच्यावरून जावोत. हे शासन त्या जागल्यांच्या ठरावान्वये व पवित्र जनांच्या वचनानुसार झाले; ते अशासाठी की मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे, व तो ते पाहिजे त्याला देतो आणि त्यावर अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यांपैकी पाहिजे त्याला नेमतो, हे सर्व जीवधार्‍यांना समजावे.’ हे स्वप्न मी नबुखद्नेस्सर राजाने पाहिले आहे; तर आता हे बेल्टशस्सरा, ह्याच्या अर्थाचा उलगडा कर, कारण माझ्या राज्यातील सर्व ज्ञानी पुरुषांना ह्याचा अर्थ मला सांगता आला नाही; पण तुला सांगता येईल, कारण पवित्र देवांचा आत्मा तुझ्या ठायी आहे.” मग बेल्टशस्सर हे नाव दिलेला दानीएल क्षणभर बुचकळ्यात पडला व विचारांनी त्याचे मन व्यग्र झाले. तेव्हा राजा त्याला म्हणाला, “बेल्टशस्सरा, ह्या स्वप्नासंबंधाने व त्याच्या अर्थासंबंधाने तू घाबरू नकोस.” तेव्हा बेल्टशस्सराने म्हटले, “माझे स्वामी, हे स्वप्न आपल्या द्वेष्ट्यांना व त्याचा अर्थ आपल्या वैर्‍यांना लागू पडो! आपण वृक्ष पाहिलास तो वाढून मजबूत झाला, त्याची उंची गगनास पोहचली, तो सगळ्या पृथ्वीला दिसू लागला; त्याची पाने सुंदर होती, त्यावर फळे विपुल असून सर्वांना खाण्यास पुरेशी होती, त्याच्याखाली वनपशू राहत होते व त्याच्या शाखांत अंतराळातील पक्षी वस्ती करत होते; महाराज, तो वृक्ष आपणच आहात; आपण वाढून बलवान झाला आहात; आपली थोरवी वाढून गगनापर्यंत पोहचली आहे. आणि महाराजांनी असे पाहिले की, एक जागल्या, पवित्र पुरुष, आकाशातून उतरून म्हणाला, हा वृक्ष तोडून ह्याचा नाश करा; तथापि ह्याचे बुंध जमिनीत राहू द्या; ह्याला लोखंड व पितळ ह्यांच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या; ह्याला आकाशातल्या दहिवराने भिजू द्या; ह्याला वनपशूंबरोबर वाटा मिळो, ह्याच्यावरून सात काळ जावोत तोवर असे होवो. महाराज, ह्याचा अर्थ असा आहे आणि माझे स्वामीराजे, ह्याच्याविषयी परात्पर देवाचा ठराव हा आहे : आपणाला मनुष्यांतून घालवून देतील; आपली वस्ती वनपशूंत होईल; आपणाला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल; आपण आकाशातील दहिवराने भिजाल; मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो हे ज्ञान आपणाला होईपर्यंत आपणावरून सात काळ जातील. त्यांनी त्या वृक्षाचे बुंध राखून ठेवायला सांगितले; ह्याचा अर्थ हा की सत्ता ही स्वर्गातील देवाची आहे हे ज्ञान आपणाला झाले म्हणजे आपले राज्य निश्‍चयाने आपणास मिळेल.’

सामायिक करा
दानीएल 4 वाचा