दानीएल 2:46-48
दानीएल 2:46-48 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
राजा नबुखद्नेस्सराने पालथे पडून दानीएलास साष्टांग दंडवत घातले आणि आज्ञा केली की त्यास अर्पण करून धूप दाखवा. राजा दानीएलास म्हणाला, “खरोखर तुझा देव सर्व देवांचा देव आहे, राजांचा राजा आहे, तो जो रहस्यांचा उलगडा करतो, म्हणून तुला हे रहस्या प्रगट करता आले आहे.” नंतर राजाने दानीएलास मोठा सन्मान आणि अद्भुत भेटवस्तू दिल्या. त्यास अवघ्या बाबेलातील परगण्याची सत्ता दिली आणि दानीएल बाबेलाच्या सर्व ज्ञानी लोकांचा मुख्य प्रशासक झाला.
दानीएल 2:46-48 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा नबुखद्नेस्सर राजाने पालथे पडून दानिएलास साष्टांग नमस्कार घातला आणि ‘त्याच्यापुढे नैवेद्य ठेवून त्याला धूप दाखवा’ अशी आज्ञा केली. राजाने दानिएलास म्हटले, “तुमचा देव खरोखर देवाधिदेव व राजराजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रकट करता आले म्हणून तो रहस्ये प्रकट करणारा देव आहे.” मग राजाने दानिएलास थोर पदास चढवले, त्याला मोठमोठी इनामे दिली, त्याला सगळ्या बाबेल परगण्याची सत्ता दिली आणि त्याला बाबेलच्या सर्व ज्ञान्यांच्या प्रमुखांचा अध्यक्ष केले.