YouVersion लोगो
सर्च आयकॉन

कलस्सै 4:2-18

कलस्सै 4:2-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकारस्तुती करत जागृत राहा; आणखी आमच्यासाठीही प्रार्थना करा, अशी की, ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगण्यास देवाने आमच्यासाठी वचनाकरता दार उघडावे; ह्यासाठी की, जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते रहस्य प्रकट करावे. बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; संधी साधून घ्या. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यायचे हे तुम्ही समजावे. प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास, हा माझ्याविषयीच्या सर्व गोष्टी तुम्हांला कळवील. त्याला मी तुमच्याकडे ह्यासाठीच पाठवले आहे की, आमचे वर्तमान तुम्हांला कळावे व त्याने तुमच्या मनाचे समाधान करावे. त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम, जो तुमच्यातलाच आहे, त्यालाही पाठवले आहे; ते येथील सर्व वर्तमान तुम्हांला कळवतील. माझ्या सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हांला सलाम सांगतो, आणि बर्णबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हांला सलाम सांगतो, (त्याच्याविषयी तुम्हांला आज्ञा मिळाल्या आहेत, तो तुमच्याकडे आला तर त्याचा स्वीकार करा); युस्त म्हटलेला येशू तुम्हांला सलाम सांगतो; सुंता झालेल्यांपैकी हेच मात्र देवाच्या राज्याकरता माझे सहकारी आहेत व त्यांच्या द्वारे माझे सांत्वन झाले आहे. ख्रिस्त येशूचा दास एफफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हांला सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुमच्यासाठी जीव तोडून विनंती करत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढनिश्‍चयी असे स्थिर राहावे. तुमच्यासाठी व जे लावदिकीयात व हेरापलीत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करत आहे, त्याच्याविषयी मी साक्षी आहे. प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हांला सलाम सांगतात. लावदिकीयातील बंधू, आणि नुंफा व तिच्या घरी जमणारी मंडळी ह्यांना सलाम सांगा. हे पत्र तुमच्यात वाचून झाल्यावर लावदिकीयातील मंडळीतही वाचायला मिळावे; व लावदिकीयांकडील पत्र तुम्हीही वाचावे. अर्खिप्पाला सांगा की, “जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष दे.” मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम. मी बंधनांत आहे ह्याची आठवण ठेवा. तुमच्याबरोबर कृपा असो.

सामायिक करा
कलस्सै 4 वाचा

कलस्सै 4:2-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यांत उपकारस्तुती करीत जागृत रहा. आणखी आम्हासाठी देखील प्रार्थना करा; अशी की, कारण ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगावयास देवाने आम्हांसाठी वचनाकरिता द्वार उघडावे. म्हणजे मला जसे सांगितले पाहिजे तसेच मी ते रहस्य प्रकट करावे. बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा. संधी साधून घ्या. तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे. माझा प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्यासोबतीचा दास हा माझ्याविषयी सर्व गोष्टी तुम्हास कळवील. मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे पाठवले आहे की, म्हणजे आमच्याविषयीच्या सर्व गोष्टी त्याने तुम्हास कळवून तुमच्या मनाचे समाधान करावे. मी त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम, जो तुमच्यांतलाच आहे त्यालाही पाठवले आहे; ते तुम्हास येथील सर्व गोष्टी कळवतील. माझा सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हास सलाम सांगतो, तसाच बर्णबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हास सलाम सांगतो. (त्याच्याविषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत. तो जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याचा स्वीकार करा.) युस्त म्हणलेला येशू हाही तुम्हास सलाम सांगतो; सुंता झालेल्यांपैकी हेच मात्र देवाच्या राज्यासाठी माझे सहकारी आहेत आणि त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे. ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हास सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण असून तुमची पूर्ण खात्री होऊन स्थिर असे उभे रहावे. तुम्हासाठी व जे लावदीकियात व हेरापलीत आहेत त्याच्यांसाठी तो फार श्रम करीत आहे, अशी त्याच्याविषयी मी साक्ष देतो. प्रिय वैद्य लूक आणि देमास हे तुम्हास सलाम सांगतात. लावदीकियातील बंधू आणि नुंफा व तिच्या घरी जमणारी मंडळी ह्यांना सलाम द्या. हे पत्र तुमच्यांत वाचून झाल्यावर की, लावदीकियातील मंडळीतही वाचले जावे आणि लावदीकियाकडील पत्र तुम्हीही वाचावे. अर्खिपाला सांगा की, जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे म्हणून काळजी घे. मी पौलाने स्वहस्ते लिहीलेला सलाम; मी बंधनात आहे याची आठवण ठेवा. तुम्हांबरोबर कृपा असो.

सामायिक करा
कलस्सै 4 वाचा

कलस्सै 4:2-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जागृत राहून आणि उपकारस्तुतिसह प्रार्थनेत तत्पर राहा. ख्रिस्ताच्या रहस्याची घोषणा आम्हाला करता यावी याकरिता परमेश्वराने आमच्या संदेशासाठी दार उघडावे म्हणूनही प्रार्थना करा. त्याचकरिता मी या बंधनात आहे. जशी स्पष्टपणे सांगितली पाहिजे, तशी ती मला सांगता यावी, म्हणून प्रार्थना करा. बाहेरील लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; आणि प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या. तुमचे संभाषण सर्वदा कृपेने भरलेले, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला कळेल. तुखिक माझे सर्व वर्तमान तुम्हाला सांगेल. तो माझा प्रिय बंधू आणि प्रभुच्या कार्यातील प्रामाणिक सहकारी आहे. मी त्याला मुद्दाम याच हेतूने पाठवीत आहे की त्याद्वारे तुम्हाला आमची खुशाली तुम्हाला समजावी व त्याने तुमच्या हृदयास प्रोत्साहित करावे. विश्वासू व अतिप्रिय बंधू अनेसिम, तुम्हामधील एक, यालाही मी तुम्हाकडे पाठवीत आहे. तो व तुखिक तुम्हाला येथील सर्व अद्यावत बातम्या देतील. माझ्याबरोबर येथे बंदिवान असलेला अरिस्तार्ख, तसेच बर्णबाचा नातेवाईक मार्कही तुम्हाला आपली शुभेच्छा पाठवितात. मी पूर्वी सूचना दिल्याप्रमाणे मार्क कधी तुमच्याकडे आला, तर त्याचे मनापासून स्वागत करा. येशू म्हटलेला यूस्त देखील आपली शुभेच्छा पाठवीत आहे. परमेश्वराच्या राज्यासाठी हेच तेवढे यहूदी येथे माझे सहकारी आहेत आणि ते माझ्या सांत्वनाचे कारण झाले आहेत. जो तुमच्यातील एक आणि ख्रिस्त येशूंचा दास, एपफ्रासही, तुम्हाला आपली शुभेच्छा पाठवीत आहे. तो तुमच्यासाठी नेहमी कळकळीने प्रार्थना करून परमेश्वराजवळ मागतो की परमेश्वराने तुम्हाला त्यांच्या इच्छेमध्ये परिपक्व व स्थिर करावे. मी साक्ष देतो की, त्याने तुमच्यासाठी आणि लावदिकीया व हेरापाली येथील लोकांसाठी फार श्रम केले आहेत. प्रिय वैद्य लूक आणि देमास आपली शुभेच्छा पाठवीत आहेत. लावदिकीया येथल्या विश्वासणार्‍या बंधुजनांस, नुंफा व तिच्या घरात जमणार्‍या मंडळीला माझ्या शुभेच्छा सांगा. तुमच्यासाठी हे पत्र वाचून झाल्यानंतर ते लावदिकीया मंडळीकडेसुद्धा वाचण्यास देणे आणि त्याबदल्यात लावदिकीयाकडून आलेले पत्र वाचावे. अर्खिप्पाला सांगा, “प्रभुमध्ये तुला जी सेवा दिलेली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष देणे.” मी पौल, माझ्या हस्ताक्षरात या शुभेच्छा व्यक्त करीत आहे. माझ्या बंधनाची आठवण ठेवा. परमेश्वराची कृपा तुम्हाबरोबर असो.

सामायिक करा
कलस्सै 4 वाचा

कलस्सै 4:2-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

प्रार्थनेत तत्पर असा व प्रार्थना करताना आभार मानत दक्ष राहा. ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी तुरुंगात आहे, त्याविषयीचा संदेश सांगावयास देवाने आम्हांला चांगली संधी द्यावी व जसे मी बोलले पाहिजे, तसे बोलून मी ते रहस्य प्रकट करावे म्हणून आमच्यासाठीही प्रार्थना करा. बाहेरील लोकांबरोबर सुज्ञतेने वागा. प्रत्येक संधीचा पूरेपूर उपयोग करा. तुमचे बोलणे सर्वदा सभ्य व मिठाने रुचकर केलेले असावे व प्रत्येकाला कसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजून घ्यावे. आपला प्रिय बंधू तुखिक, प्रभूच्या कार्यातील विश्वासू प्रसेवक व माझ्या सोबतीचा सेवक हा माझ्याविषयी सगळे काही तुम्हांला कळवील. त्याला मी तुमच्याकडे ह्यासाठी पाठविले आहे की, आमचे वृत्त त्याने तुम्हांला कळवावे व तुम्हांला आनंदित करावे. त्याच्याबरोबर प्रिय व विश्वासू बंधू अनेसिम जो तुमच्यातला आहे, त्यालाही पाठविले आहे. ते येथील सर्व वृत्त तुम्हांला कळवतील. माझ्याबरोबर तुरुंगात असलेला अरिस्तार्ख तुम्हांला शुभेच्छा देतो. तसेच बर्णबाचा भाऊबंद मार्क हादेखील तुम्हांला शुभेच्छा कळवतो. त्याच्याविषयी तुम्हांला निर्देश देण्यात आला आहे की, तो तुमच्याकडे आला तर त्याचे स्वागत करा. युस्त उर्फ येशू हादेखील तुम्हांला शुभेच्छा पाठवत आहे. सुंता झालेल्यांपैकी फक्त हेच देवाच्या राज्याकरिता माझे सहकारी आहेत व त्यांचा मला फारच आधार आहे. ख्रिस्त येशूचा सेवक एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे, तो तुम्हांला शुभकामना पाठवतो. तो आपल्या प्रार्थनेमध्ये सर्वदा तुमच्यासाठी आस्थेने विनंती करीत असतो की, त्याच्या इच्छेचे परिपूर्ण पालन करण्यासाठी प्रौढ व दृढनिश्चयी ख्रिस्ती म्हणून देवाने तुम्हांला स्थिर करावे. तुमच्यासाठी व जे लावदिकीयात व हेरापलीत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे, ह्याची मी साक्ष देतो. आपले प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हांला शुभेच्छा देतात. लावदिकीयातील बंधू तसेच नुंफा व तिच्या घरी जमणारी ख्रिस्तमंडळी ह्यांना शुभेच्छा सांगा. हे पत्र तुमच्यात वाचून झाल्यावर लावदिकीयातील ख्रिस्तमंडळीतही वाचावयास मिळावे व लावदिकीयाकडील पत्र तुम्हीही वाचावे. आर्खिप्पाला सांगा की, प्रभूच्या सेवाकार्यात जी जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली आहे, ती पार पाडण्याकडे त्याने लक्ष द्यावे. मी, पौलाने स्वहस्ते लिहिलेल्या शुभेच्छा. माझ्या बेड्यांची आठवण ठेवा. प्रभूची कृपा तुमच्याबरोबर राहो.

सामायिक करा
कलस्सै 4 वाचा

कलस्सै 4:2-18

कलस्सै 4:2-18 MARVBSIकलस्सै 4:2-18 MARVBSIकलस्सै 4:2-18 MARVBSIकलस्सै 4:2-18 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा