प्रेषितांची कृत्ये 9:32-35
प्रेषितांची कृत्ये 9:32-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग असे झाले की, पेत्र यरूशलेम शहराच्या सभोवतालच्या गावामध्ये फिरला, लोद या गावामध्ये जे देवाचे पवित्रजन होते त्यांना भेटला. लोद येथे त्यास ऐनेयास नावाचा मनुष्य आढळला, त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व आठ वर्षे अंथरुणाला खिळून होता. पेत्र त्यास म्हणाला, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे; ऊठ, आपले अंथरुण नीट कर.” ऐनेयास ताबडतोब उभा राहिला. लोद येथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शारोनात राहणाऱ्यांनी त्यास पाहिले, तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले.
प्रेषितांची कृत्ये 9:32-35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पेत्र त्या देशात प्रवास करीत असताना, प्रभूच्या लोकांना भेटण्यासाठी तो लोद गावात आला. तिथे त्याला एनियास नावाचा एक मनुष्य भेटला, तो पक्षघाती असून आठ वर्षे बिछान्याला खिळून होता. पेत्र त्याला म्हणाला, “एनियास, येशू ख्रिस्ताने तुला बरे केले आहे. ऊठ आणि आपले अंथरूण गुंडाळ.” तेव्हा एनियास तत्काळ उठला. लोद व शारोन या शहरात राहणार्या सर्व लोकांनी एनियासला पाहिले आणि ते प्रभूकडे वळले.
प्रेषितांची कृत्ये 9:32-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग असे झाले की, पेत्र चहूकडे फिरत असता लोद गावात जे पवित्र जन राहत होते त्यांच्याकडेही गेला. तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला; त्याला पक्षाघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अंथरुणाला खिळलेला होता. त्याला पेत्राने म्हटले, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करत आहे, ऊठ व स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर.” तेव्हा तो तत्काळ उठला. त्याला पाहून लोद व शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळले.
प्रेषितांची कृत्ये 9:32-35 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पेत्र सर्वत्र फिरत असता लोद गावात जे पवित्र जन राहत होते त्यांच्याकडेही तो गेला. तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला. त्याला पक्षाघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अंथरुणाला खिळलेला होता. त्याला पेत्राने म्हटले, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करत आहे, ऊठ व स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर.” तो तत्काळ उठला. त्याला पाहून लोद व शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळले.