YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 9:17-19

प्रेषितांची कृत्ये 9:17-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हनन्या निघाला आणि यहूदाच्या घरी गेला, त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, “शौल, भाऊ, प्रभू येशूने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठवले, यासाठी की, तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे.” लागलीच खपल्यासारखे काहीतरी शौलाच्या डोळ्यावरून खाली पडले, आणि त्यास पुन्हा दृष्टी आली शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला. नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात शक्ती आली, शौल काही दिवस दिमिष्क येथील शिष्यांबरोबर राहिला.

प्रेषितांची कृत्ये 9:17-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

नंतर हनन्याह त्या घरी गेला आणि त्याने घरात प्रवेश केला. त्याचे हात शौलावर ठेवीत त्याने म्हटले, “बंधू शौल, तू वाटेने येत असताना ज्या प्रभू येशूंनी तुला दर्शन दिले, त्यांनी मला यासाठी पाठविले आहे की, तुला आपली दृष्टी परत यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस.” त्याच क्षणी, त्याच्या डोळ्यावरून खपल्यांसारखे काहीतरी पडले आणि शौलाला पुन्हा दिसू लागले. तो उठला आणि त्याचा बाप्तिस्मा झाला, त्याने थोडेसे अन्न घेतल्यानंतर, त्याला पुन्हा शक्ती प्राप्त झाली. शौलाने दिमिष्कमध्ये अनेक दिवस शिष्यांच्या बरोबर घालविले.