प्रेषितांची कृत्ये 5:1-21
प्रेषितांची कृत्ये 5:1-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हनन्या नावाचा कोणीएक इसम व त्याची बायको सप्पीरा ह्यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किंमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, “हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे? ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्यांशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस.” हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणार्या सर्वांना मोठे भय वाटले. नंतर तरुणांनी उठून त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. मग असे झाले की, सुमारे तीन तासांनी त्याची बायको आत आली तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते. पेत्र तिला म्हणाला, “मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय?” तिने उत्तर दिले, “होय, एवढ्यालाच.” पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगनमत का केले? पाहा, ज्यांनी तुझ्या नवर्याला पुरले त्यांचे पाय दाराशीच आहेत; ते तुलाही उचलून बाहेर नेतील.” तेव्हा लगेचच तिने त्याच्या पायांजवळ पडून प्राण सोडला आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवर्याजवळ पुरले. ह्यावरून सर्व मंडळीला व हे ऐकणार्या सर्वांना मोठे भय वाटले. प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत; आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या देवडीत जमत असत. आणि त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे, तरी लोक त्यांना थोर मानत असत. विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया ह्यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले; इतके की लोक दुखणेकर्यांना रस्त्यात आणून पलंगांवर आणि खाटांवर ठेवत; ह्यासाठी की, पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. आणखी यरुशलेमेच्या आसपासच्या चोहोकडल्या गावांतून लोकसमुदाय दुखणेकर्यांना व अशुद्ध आत्म्यांनी पिडलेल्यांना घेऊन तेथे येत असत; आणि ते सर्व बरे होत असत. तेव्हा प्रमुख याजक व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदूकपंथी मत्सराने उठले आणि त्यांनी प्रेषितांना अटक करून तुरुंगात घातले. परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, “जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाची सर्व वचने लोकांना सांगा.” हे ऐकून उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले. इकडे, प्रमुख याजक व त्याच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा व इस्राएल लोकांचे संपूर्ण वडीलमंडळ एकत्र बोलावले आणि त्यांना आणण्यास बंदिशाळेकडे पाठवले.
प्रेषितांची कृत्ये 5:1-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा हनन्या नावाचा कोणी एक मनुष्य व त्याची पत्नी सप्पीरा यांनी आपली मालमत्ता विकली, मग त्याने त्या किंमतीतून काही भाग पत्नीच्या संमतीने ठेवून घेतला, आणि काही भाग आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी आणि जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरले आहे? ती होती तोपर्यंत तुझी स्वतःची नव्हती काय? आणि ती विकल्यानंतर त्याची आलेली किंमत तुझ्याच स्वाधीन नव्हते काय? ही गोष्ट तू आपल्या मनात का आणली? तू मनुष्याशी नाही, तर देवाशी लबाडी केली आहे. तेव्हा हनन्याने हे शब्द ऐकताच खाली पडून प्राण सोडला. आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय प्राप्त झाले. तेव्हा काही तरूणांनी उठून त्यास गुंडाळले, व बाहेर नेऊन पुरले. त्यानंतर सुमारे तीन तासांनतर त्याची पत्नी आत आली, पण जे झाले होते ते तिला समजले नव्हते. तेव्हा पेत्राने तिला म्हटले, “मला सांग तुम्ही एवढ्यालाच जमीन विकली काय.” आणि तिने म्हटले, “होय, एवढ्यालाच.” पण पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही एकोपा का केला? पाहा ज्यांनी तुझ्या पतीला पुरले त्यांचे पाय दारापाशी आहेत, ते तुलाही उचलून बाहेर नेतील.” तेव्हा लागलेच तिने त्यांच्या पायाजवळ पडून प्राण सोडला, आणि तरूण आत आले तेव्हा ती मरण पावलेली; अशी आढळली आणि त्यांनी तिला बाहेर नेऊन तिच्या पतीजवळ पुरले. आणि सर्व मंडळीला व ज्यांनी या गोष्टी ऐकल्या त्या सर्वांना मोठे भय प्राप्त झाले. तेव्हा प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चमत्कार व अद्भूते घडत असत. आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या द्वारमंडपात जमत असत. आणि अविश्वासी लोकांतला कोणी त्यांच्याशी मिळण्यास धजत नसे; तरी लोक त्यांना थोर मानीत असत, इतकेच नव्हे तर विश्वास धरणारे पुष्कळ पुरूष व स्त्रिया यांचे समुदाय प्रभूला मिळत असत. इतके चमत्कार घडले की लोकांनी दुखणेकऱ्यास उचलुन रस्त्यामध्ये आणले, आणि पेत्र जवळून येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील कोणावर पडावी म्हणून त्यांना बाजांवर व पलंगावर ठेवले. आणखी यरूशलेम शहराच्या, आसपासच्या चहूकडल्या गावांतील लोकांचे समुदाय रोग्यास व अशुद्ध आत्म्यांनी पिडलेल्यांस घेउन येत असत. तेव्हा महायाजक उठले आणि तो व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदूकी पंथाचे लोक हे आवेशाने भरले. आणि त्यांनी आपले हात प्रेषितांवर टाकून त्यांना सार्वजनिक बंदिशाळेत ठेवले. परंतु त्यारात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, “जा, आणि परमेश्वराच्या भवनात उभे राहून या जीवनाचा सर्व संदेश लोकांस सांगा.” हे ऐकून उजाडताच ते परमेश्वराच्या भवनामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले, इकडे महायाजक व त्यांच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा व इस्राएल लोकांचे संपूर्ण वडीलमंडळ एकत्र बोलावले, आणि त्यांना आणण्यास बंदिशाळेकडे पाठवले.
प्रेषितांची कृत्ये 5:1-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता हनन्याह नावाचा मनुष्य आणि त्याची पत्नी सप्पीरा या दोघांनी मिळून आपल्या संपत्तीचा एक भाग विकला. मिळालेल्या पैशातून काही पैसे त्याने त्याच्या पत्नीच्या पूर्ण संमतीने स्वतःसाठी ठेवले व बाकीचे पैसे आणून प्रेषितांच्या चरणी ठेवले. परंतु पेत्र म्हणाला, “हनन्याह, सैतानाने तुझे हृदय एवढे कसे भरले की तू पवित्र आत्म्याशी लबाडी केलीस व मालमत्ता विकून आलेल्या पैशातून काही पैसे तुझ्या स्वतःसाठी ठेवून घेतलेस? संपत्ती विकण्यापूर्वी ती तुझ्या मालकीची नव्हती का आणि ती विकल्यानंतर, त्या पैशाचा वापर कसा करावा हे देखील तुझ्या अधिकारात नव्हते का? तर मग असे करण्याचे तुझ्या मनात कसे आले? तू केवळ मनुष्याबरोबर नाही तर परमेश्वराबरोबर लबाडी केली आहेस.” हे शब्द ऐकताच हनन्याह खाली कोसळला आणि मरण पावला. घडलेल्या गोष्टी ऐकून सर्वजण भयभीत झाले. नंतर काही तरुण पुरुष पुढे आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह गुंडाळला व बाहेर नेऊन पुरून टाकला. सुमारे तीन तासानंतर त्याची पत्नी आत आली, काय घडले होते याची तिला कल्पना नव्हती. पेत्राने तिला विचारले, मला सांग “तुला व हनन्याला जमिनीची इतकीच किंमत मिळाली काय?” तिने उत्तर दिले, “होय, तितकीच किंमत.” मग पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यासाठी तुम्ही कट का केला? ऐक, ज्या पुरुषांनी तुझ्या पतीला नुकतेच पुरले आहे त्यांचे पाय दारातच आहेत आणि ते तुलादेखील उचलून बाहेर नेतील.” त्याच क्षणी ती त्याच्या पायावर कोसळली आणि मरण पावली आणि ते तरुण आत आले व तिचा मृत्यू झाल्याचे पाहून तिला बाहेर नेऊन तिच्या नवर्याजवळ पुरले. सर्व मंडळी आणि ज्या सर्वांनी हे ऐकले ते सारे भयभीत झाले. प्रेषित लोकांमध्ये अनेक चिन्हे व अद्भुत कृत्ये करीत होते आणि सर्व विश्वासणारे एकत्रितपणे शलोमोनाच्या देवडीत जमत असत, त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात अत्यंत सन्मान होता, परंतु त्यांच्यात सामील होण्याचे धैर्य कोणाला झाले नाही. तरी देखील अधिकाधिक पुरुषांनी व स्त्रियांनी प्रभूवर विश्वास ठेवला आणि त्यांच्या संख्येत वाढ झाली. याचा परिणाम असा झाला की, पेत्र जवळून जात असताना निदान त्याची छाया तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी म्हणून आजारी लोकांना बाहेर रस्त्यावर आणून खाटांवर आणि अंथरुणावर ठेवीत असत. यरुशलेमच्या आसपासच्या गावातून लोकसमुदाय येताना त्यांच्याबरोबर आजारी व अशुद्ध आत्म्यांनी पीडलेल्यांना आणत होते आणि ते सर्वजण बरे होऊन जात. नंतर महायाजक आणि त्यांचे सहकारी जे सर्व सदूकी पंथाचे सभासद होते, ते मत्सराने भरून गेले. त्यांनी प्रेषितांना अटक करून सार्वजनिक तुरुंगात डांबले. परंतु रात्रीच्या समयी प्रभूच्या देवदूताने तुरुंगाचे दरवाजे उघडून त्यांना बाहेर काढले. तो म्हणाला, “मंदिराच्या आवारात जा आणि या नवजीवनाबद्दल लोकांना सांगा.” ते पहाटेच मंदिराच्या आवारात गेले आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे लगेच त्यांनी शिक्षण देण्यास सुरुवात केली. जेव्हा महायाजक व त्यांचे सहकारी आले, तेव्हा त्यांनी न्यायसभा व यहूदी वडीलमंडळीला एकत्र बोलाविले आणि प्रेषितांना तुरुंगातून चौकशीसाठी घेऊन यावे अशी आज्ञा केली.
प्रेषितांची कृत्ये 5:1-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हनन्या नावाचा कोणीएक इसम व त्याची बायको सप्पीरा ह्यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किंमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, “हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे? ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्यांशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस.” हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणार्या सर्वांना मोठे भय वाटले. नंतर तरुणांनी उठून त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. मग असे झाले की, सुमारे तीन तासांनी त्याची बायको आत आली तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते. पेत्र तिला म्हणाला, “मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय?” तिने उत्तर दिले, “होय, एवढ्यालाच.” पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगनमत का केले? पाहा, ज्यांनी तुझ्या नवर्याला पुरले त्यांचे पाय दाराशीच आहेत; ते तुलाही उचलून बाहेर नेतील.” तेव्हा लगेचच तिने त्याच्या पायांजवळ पडून प्राण सोडला आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवर्याजवळ पुरले. ह्यावरून सर्व मंडळीला व हे ऐकणार्या सर्वांना मोठे भय वाटले. प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत; आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या देवडीत जमत असत. आणि त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे, तरी लोक त्यांना थोर मानत असत. विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया ह्यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले; इतके की लोक दुखणेकर्यांना रस्त्यात आणून पलंगांवर आणि खाटांवर ठेवत; ह्यासाठी की, पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. आणखी यरुशलेमेच्या आसपासच्या चोहोकडल्या गावांतून लोकसमुदाय दुखणेकर्यांना व अशुद्ध आत्म्यांनी पिडलेल्यांना घेऊन तेथे येत असत; आणि ते सर्व बरे होत असत. तेव्हा प्रमुख याजक व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदूकपंथी मत्सराने उठले आणि त्यांनी प्रेषितांना अटक करून तुरुंगात घातले. परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, “जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाची सर्व वचने लोकांना सांगा.” हे ऐकून उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले. इकडे, प्रमुख याजक व त्याच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा व इस्राएल लोकांचे संपूर्ण वडीलमंडळ एकत्र बोलावले आणि त्यांना आणण्यास बंदिशाळेकडे पाठवले.
प्रेषितांची कृत्ये 5:1-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
हनन्या नावाचा एक गृहस्थ व त्याची पत्नी सप्पीरा ह्यांनी त्यांची काही मालमत्ता विकली. परंतु हनन्याने आलेल्या किमतीतून काही भाग पत्नीच्या संमतीने स्वतःसाठी राखून ठेवला व उरलेला भाग आणून प्रेषितांकडे दिला. पेत्र त्याला म्हणाला, “हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून तू तुझे मन सैतानाच्या ताब्यात का दिलेस? विकण्यापूर्वी ती जमीन तुझी स्वतःची होती व विकल्यावर सर्व रक्कम तुझीच नव्हती काय? तर मग असे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस.” हे शब्द ऐकताच तो खाली पडला व मरण पावला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. नंतर काही तरुणांनी येऊन त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. सुमारे तीन तासांनी त्याची पत्नी आत आली तेव्हा जे घडले ते तिला ठाऊ क नव्हते. पेत्र तिला म्हणाला, “मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय?” तिने उत्तर दिले, “होय, एवढ्यालाच.” पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यात तुम्ही संगनमत का केले? पाहा, ज्यांनी तुझ्या पतीला पुरले ते एवढ्यातच परत येत आहेत. ते तुलाही उचलून बाहेर नेतील.” ती त्याच्या पायांजवळ पडली व मरण पावली. तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या पतीजवळ पुरले. ह्यावरून सबंध ख्रिस्तमंडळीला व हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. प्रेषितांच्या हस्ते लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुत कृत्ये घडत असत. ते सर्व एकचित्ताने शलमोनच्या देवडीत जमत असत. त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे. मात्र लोक त्यांना थोर मानत असत. प्रभूवर विश्वास ठेवणारे पुरुष व स्त्रिया त्यांना मिळत गेले. इतके की, लोक रुग्णांना रस्त्यावर आणून खाटांवर आणि चटयांवर ठेवीत, ह्यासाठी की, पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. तसेच यरुशलेमच्या आसपासच्या नगरांतून लोकसमुदाय रुग्णांना व अशुद्ध आत्म्यांनी पीडलेल्यांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत. उच्च याजक व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदूकी सहकारी मत्सराने पेटून उठले. त्यांनी प्रेषितांना अटक करून सार्वजनिक तुरुंगात टाकले. परंतु त्या रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, “जा. मंदिरात उभे राहून हा संपूर्ण संदेश लोकांना सांगा.” हे ऐकून दिवस उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन प्रबोधन करू लागले. इकडे उच्च याजक व त्याचे सहकारी ह्यांनी येऊन न्यायसभेला व यहुदी लोकांच्या सर्व वडीलजनांना एकत्र बोलावले आणि प्रेषितांना आणावयास शिपायांना तुरुंगाकडे पाठवले.