YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 23:1-5

प्रेषितांची कृत्ये 23:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, “बंधुजनहो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे.” तेव्हा महायाजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांस त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली. तेव्हा पौल त्यास म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील; तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय?” तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, “तू देवाच्या महायाजकाची निंदा करितोस काय?” पौलाने म्हटले, “बंधुजनहो, हा महायाजक आहे हे मला ठाऊक नव्हते; कारण तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्याविरुद्ध वाईट बोलू नको असे शास्त्रात लिहिले आहे.”

प्रेषितांची कृत्ये 23:1-5 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग न्यायसभेकडे निरखून पाहत पौल म्हणाला, “माझ्या बंधुनो, मी आजपर्यंत माझे परमेश्वरा संबंधीचे कर्तव्य पूर्ण सद्सद्विवेकबुद्धीने करीत आलो आहे.” यावेळी महायाजक हनन्या याने पौलाच्याजवळ असलेल्या लोकांना त्याच्या तोंडावर चापट मारण्याचा हुकूम केला. तेव्हा पौल त्याला म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, परमेश्वर तुझ्यावर वार करतील! तू येथे नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करतो परंतु तू स्वतः नियमशास्त्राचा भंग करून माझ्यावर वार करण्याची आज्ञा देतोस काय!” पौलाच्या शेजारी जे उभे होते ते त्याला म्हणाले, “तू परमेश्वराच्या प्रमुख याजकाचा अपमान करण्याचे धैर्य कसे केले!” पौलाने उत्तर केले, “बंधुनो, तो प्रमुख याजक आहे, हे मला माहीत नव्हते; असे लिहिले आहे: ‘आपल्या लोकांच्या पुढार्‍यांपैकी कोणालाही कधीही वाईट बोलू नकोस.’ ”

प्रेषितांची कृत्ये 23:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, “बंधुजनहो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे.” तेव्हा प्रमुख याजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणार्‍यांना त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली. तेव्हा पौल त्याला म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील; तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करायला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय?” तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, “तू देवाच्या प्रमुख याजकाची निंदा करतोस काय?” पौलाने म्हटले, “बंधुजनहो, हा प्रमुख याजक आहे हे मला ठाऊक नव्हते; कारण ‘तू आपल्या लोकांच्या अधिकार्‍याविरुद्ध वाईट बोलू नकोस’ असे शास्त्रात लिहिले आहे.”

प्रेषितांची कृत्ये 23:1-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी लावून म्हणाला, “बंधुजनहो, मी आजपर्यंत देवापुढे उचित प्रकारे वागत आलो आहे, हे मी तुम्हांला माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून सांगतो.” उच्च याजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना त्याच्या तोंडावर थप्पड मारण्याचा आदेश दिला. पौल त्याला म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील, तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याचा आदेश देतोस काय?” तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, “तू देवाच्या उच्च याजकाची निंदा करतोस काय?” पौलाने म्हटले, “बंधुजनहो, हा उच्च याजक आहे, हे मला ठाऊक नव्हते. तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्याविरुद्ध वाईट बोलू नकोस, असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.”