मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, “बंधुजनहो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे.” तेव्हा प्रमुख याजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणार्यांना त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली. तेव्हा पौल त्याला म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील; तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करायला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय?” तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, “तू देवाच्या प्रमुख याजकाची निंदा करतोस काय?” पौलाने म्हटले, “बंधुजनहो, हा प्रमुख याजक आहे हे मला ठाऊक नव्हते; कारण ‘तू आपल्या लोकांच्या अधिकार्याविरुद्ध वाईट बोलू नकोस’ असे शास्त्रात लिहिले आहे.”
प्रेषितांची कृत्ये 23 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 23
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 23:1-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ