YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 22:24-30

प्रेषितांची कृत्ये 22:24-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

सरदाराने शिपायांना सांगितले, पौलाला चाबकाने मारा, अशाप्रकारे हे लोक पौलाविरुद्ध का ओरड करीत आहेत हे सरादाराला जाणून घ्यायचे होते. मग त्यांनी त्यास वाद्यांनी ताणले, तेव्हा जवळ उभ्या असलेल्या शताधीपतीला पौलाने म्हटले, “रोमन मनुष्यास व ज्याला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?” हे एकूण शताधीपतीने सरदाराजवळ जाऊन म्हटले, आपण हे काय करीत आहा? तो मनुष्य रोमन आहे. तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “मला सांग, तू रोमन आहेस काय?” त्याने म्हटले, “होय.” सरदाराने उत्तर दिले, “मी हा नागरिकपणाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमन आहे.” ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले; शिवाय हा रोमन आहे असे सरदाराला कळले तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्यास बांधिले होते. यहूदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते, म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्यास मोकळे केले आणि मुख्य याजक लोक व सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकुम करून पौलाला खाली आणून त्याच्यापुढे उभे केले.

प्रेषितांची कृत्ये 22:24-30 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तेव्हा सेनापतीने पौलाला आत बराकीत आणण्याची आज्ञा केली. लोक त्याच्यावर इतके का ओरडत आहेत, हे समजावे म्हणून त्याने फटके मारून त्याची तपासणी करण्यास सांगितले. जेव्हा ते पौलाला फटके मारण्यासाठी बांधत होते त्यावेळेस पौल तेथे उभा असलेल्या शताधिपतीला म्हणाला, “ज्या मनुष्यावर दोषारोप अजून सिद्ध झालेला नाही, अशा रोमी नागरिकाला फटके मारणे हे कायद्याने योग्य आहे का?” ते ऐकल्याबरोबर तो अधिकारी शताधिपती सेनापतींकडे गेला व म्हणाला, “आपण काय करत आहात? हा माणूस तर रोमी नागरिक आहे.” तेव्हा तो सेनापती पौलाकडे गेला आणि त्याने त्याला विचारले, “मला सांग, तू रोमी नागरिक आहेस काय?” त्याने उत्तर दिले. “होय, मी आहे.” त्यावर तो सेनापती बोलला, “मला नागरिकत्व मिळण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागले.” “परंतु मी जन्मतःच रोमी नागरिक आहे,” पौलाने उत्तर दिले. यामुळे जे त्याला प्रश्न विचारुन त्याची तपासणी करणार होते ते तत्काळ निघून गेले. सेनापतीला जेव्हा समजले की, पौल एक रोमी नागरिक आहे आणि त्याचा आरोप सिद्ध होण्यापूर्वी त्याला साखळदंडानी बांधले गेले होते तो फार घाबरुन गेला. सेनापतीला हे शोधून काढायचे होते की, खरोखर कोणत्या कारणाने यहूदी लोक पौलाला आरोपी ठरवीत आहेत. म्हणून त्याने दुसर्‍या दिवशी पौलाला मुक्त केले आणि मुख्य याजक व सर्व न्यायसभेचे सभासद यांना एकत्र होण्याचा हुकूम केला. त्यांनी पौलाला न्यायसभेपुढे आणले व त्यांच्यापुढे आणून उभे केले.

प्रेषितांची कृत्ये 22:24-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

सरदाराने असा हुकूम केला की, त्याला गढीत आणावे. ते त्याच्यावर इतके का ओरडत होते हे समजण्यासाठी त्याने त्याची चौकशी चाबकाखाली करण्यास सांगितले. मग त्यांनी त्याला वाद्यांनी ताणले, तेव्हा जवळ उभ्या असलेल्या शताधिपतीला पौलाने म्हटले, “रोमी मनुष्याला व तशात ज्याला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?” हे ऐकून शताधिपतीने सरदाराजवळ जाऊन म्हटले, “आपण हे काय करत आहात? तो माणूस रोमी आहे.” तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “मला सांग, तू रोमी आहेस काय?” त्याने म्हटले, “होय.” सरदाराने उत्तर दिले, “मी हा नागरिकत्वाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमी आहे.” ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले; शिवाय हा रोमी आहे असे सरदाराला कळले तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्याला बांधवले होते. यहूदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्‍चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते. म्हणून दुसर्‍या दिवशी त्याने त्याला मोकळे केले, आणि मुख्य याजक व सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पौलाला खाली आणून त्यांच्यापुढे उभे केले.

प्रेषितांची कृत्ये 22:24-30 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

सरदाराने असा हुकूम केला की, त्याला गढीत आणावे. ते त्याच्यावर इतके का ओरडत होते, हे समजण्यासाठी त्याने त्याची चौकशी चाबकाखाली करण्यास सांगितले. परंतु त्यांनी त्याला बांधावयास सुरुवात केली तेव्हा जवळ उभ्या असलेल्या रोमन अधिकाऱ्याला पौलाने विचारले, “ज्या रोमन नागरिकाला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?” हे ऐकून रोमन अधिकाऱ्याने सरदाराजवळ जाऊन म्हटले, “आपण हे काय करत आहात? तो माणूस रोमन आहे.” तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “मला सांग, तू रोमन आहेस काय?” त्याने म्हटले, “होय.” सरदाराने म्हटले, “मी हा नागरिकत्वाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमन आहे.” ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले, शिवाय हा रोमन आहे असे सरदाराला कळले, तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्याला बेड्या ठोकल्या होत्या. यहुदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप ठेवला होता, तो काय आहे, हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने पौलाला बेड्यांतून मोकळे केले आणि मुख्य याजक व सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पौलाला तेथे आणून त्यांच्यापुढे उभे केले.