YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 22:24-30

प्रेषितांचे कार्य 22:24-30 MACLBSI

सरदाराने असा हुकूम केला की, त्याला गढीत आणावे. ते त्याच्यावर इतके का ओरडत होते, हे समजण्यासाठी त्याने त्याची चौकशी चाबकाखाली करण्यास सांगितले. परंतु त्यांनी त्याला बांधावयास सुरुवात केली तेव्हा जवळ उभ्या असलेल्या रोमन अधिकाऱ्याला पौलाने विचारले, “ज्या रोमन नागरिकाला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?” हे ऐकून रोमन अधिकाऱ्याने सरदाराजवळ जाऊन म्हटले, “आपण हे काय करत आहात? तो माणूस रोमन आहे.” तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “मला सांग, तू रोमन आहेस काय?” त्याने म्हटले, “होय.” सरदाराने म्हटले, “मी हा नागरिकत्वाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमन आहे.” ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले, शिवाय हा रोमन आहे असे सरदाराला कळले, तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्याला बेड्या ठोकल्या होत्या. यहुदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप ठेवला होता, तो काय आहे, हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने पौलाला बेड्यांतून मोकळे केले आणि मुख्य याजक व सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पौलाला तेथे आणून त्यांच्यापुढे उभे केले.

प्रेषितांचे कार्य 22:24-30 साठी चलचित्र