प्रेषितांची कृत्ये 22:1-16
प्रेषितांची कृत्ये 22:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बंधुजनहो व वडील मंडळींनो, मी जे काही आता तुम्हास प्रत्युत्तर करतो ते ऐका. तो आपणाबरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक शांत झाले, मग त्याने म्हटले. मी यहूदी आहे, माझा जन्म किलकीयातील तार्स नगरांत झाला आणि मी या शहरांत गमलियेलच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडीलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो. पुरूष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालू देहान्त शिक्षा देऊन सुद्धा मी ‘या मार्गाचा’ पाठलाग केला. त्याविषयी महायाजक व सगळा वडिलवर्गही माझा साक्षी आहे; मी त्यांच्यापासून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्कास चाललो होतो; ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरूशलेम शहरात शासन करावयास आणावे. मग असे झाले की, जाता जाता मी दिमिष्क शहराजवळ पोहचलो तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला. तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि “शौला, शौला, माझा छळ का करितोस?” अशी वाणी माझ्याबरोबर मी बोलताना ऐकली. मी विचारले, प्रभूजी, तू कोण आहेस? त्याने मला म्हटले, “ज्या नासोरी येशूचा तू छळ करितोस तोच मी आहे.” तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूने मला म्हटले, “उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.” त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले; म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिष्कात नेले. मग हनन्या नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तेथे राहणारे सर्व यहूदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत. तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, शौल भाऊ, इकडे पहा, तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले. मग तो म्हणाला आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे; आणि त्या नीतिमान पुरुषाला पहावे व त्याच्या तोंडाची वाणी ऐकावी. कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील. तर आता उशीर का करितोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर.
प्रेषितांची कृत्ये 22:1-16 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“बंधुंनो व वडीलजनांनो, माझ्या बचावाचे भाषण ऐकून घ्या.” तो इब्री भाषेत बोलत आहे, हे ऐकून स्तब्धता अधिकच वाढली. तेव्हा पौल बोलू लागला: “मी एक यहूदी आहे आणि माझा जन्म किलिकियामधील तार्सस शहरात झाला, परंतु मी या शहरात वाढलो. माझे शिक्षण गमालियेल याच्या मार्गदर्शनात झाले व आपल्या पूर्वजांच्या नियमशास्त्राचे सविस्तर प्रशिक्षण मला मिळाले. जसे तुम्ही आज परमेश्वराविषयी आवेशी आहात तसाच मीही होतो. ज्यांनी या मार्गाचे अनुसरण केले होते, त्यांना मरण येईपर्यंत मी त्यांचा छळ केला, स्त्री व पुरुष दोघांनाही बांधून तुरुंगात टाकीत होतो. प्रमुख याजक व येथे असलेले सर्व सभासद, ते स्वतः याबाबतीत साक्ष देऊ शकतात की, मी त्यांच्याकडून दमास्कस येथील सभेच्या सदस्यांना दाखविण्यासाठी तशी पत्रेसुद्धा मिळविली होती आणि या लोकांना बंदिवान करून यरुशलेम येथे आणून त्यांना शिक्षा केली जावी यासाठी तेथे गेलो. “दुपारच्या समयी मी दमास्कसच्या जवळ आलो असताना, अकस्मात आकाशातून माझ्याभोवती प्रकाश चकाकताना पाहिला. मी जमिनीवर पडलो, तेव्हा इब्री भाषेत बोलणारी वाणी मी ऐकली, ‘शौला! शौला! तू माझा छळ का करीत आहेस?’ “ ‘प्रभो, आपण कोण आहात?’ मी विचारले. “प्रभुने मला उत्तर दिले, ‘मी नासरेथकर येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस, तोच मी आहे,’ माझ्या सहकार्यांनी प्रकाश पाहिला, परंतु जे माझ्याशी बोलत होते त्यांची वाणी त्यांनी ओळखली नाही. “मी विचारले, ‘प्रभू मी काय करावे?’ “प्रभू म्हणाले, ‘आता उठून उभा राहा आणि दमास्कसमध्ये जा, जे काही तुला करावयाचे आहे, ते तुला तेथे सांगण्यात येईल.’ त्या प्रखर प्रकाशामुळे मी आंधळा झालो होतो म्हणून माझ्या सोबत्यांनी मला दमास्कस या ठिकाणी हाताशी धरून नेले. “हनन्या नावाचा माणूस मला भेटावयास आला. तो नियमशास्त्राचे अचूक पालन करणारा होता व सर्व यहूदी लोकांचे त्याच्याबद्दल फारच चांगले मत होते. तो माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, ‘बंधू शौल, तुला दृष्टी प्राप्त होवो!’ आणि त्याच क्षणाला मी त्याला पाहू शकलो. “नंतर त्याने मला असे सांगितले: ‘आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराने तुझी निवड यासाठी केली आहे की तू त्यांची इच्छा जाणून घ्यावीस आणि जे नीतिमान आहेत त्यांना पाहावेस व त्यांच्या तोंडचे शब्द ऐकावेस. तू जे पाहिले व ऐकले आहेस त्याविषयी तू सर्व मनुष्यांना साक्षी होशील. आणि आता विलंब कशासाठी? जा, आणि बाप्तिस्मा घे आणि त्याच्या नावाने धावा करून आपल्या पापांपासून शुद्ध हो.’
प्रेषितांची कृत्ये 22:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“बंधुजनहो व वडीलजनहो, मी जे आता तुम्हांला प्रत्युत्तर करतो ते ऐका.” तो आपल्याबरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक शांत झाले. मग त्याने म्हटले : “मी यहूदी आहे. माझा जन्म किलिकियातील तार्स नगरात झाला आणि मी ह्या शहरात गमलिएलाच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले, आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो. पुरुष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्त शिक्षा देईपर्यंत मी ह्या पंथाचा पाठलाग केला. त्याविषयी प्रमुख याजक व सगळा वडीलवर्गही माझा साक्षी आहे; मी त्यांच्यापासून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्कास चाललो होतो; ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरुशलेमेत शासन करण्यास आणावे. मग असे झाले की, जाता जाता मी दिमिष्काजवळ पोहचलो, तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला. तेव्हा मी जमिनीवर पडलो, आणि ‘शौला, शौला, माझा छळ का करतोस?’ अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना मी ऐकली. मी विचारले, ‘प्रभूजी, तू कोण आहेस?’ त्याने मला म्हटले, ‘ज्या नासोरी येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.’ तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला अन् ते घाबरले, परंतु माझ्याबरोबर बोलणार्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. मग मी म्हणालो, ‘प्रभूजी, मी काय करावे?’ प्रभूने मला म्हटले, ‘उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरवण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.’ त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले, म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिष्कात नेले. मग हनन्या नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता, आणि तेथे राहणारे सर्व यहूदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत. तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, ‘शौल भाऊ, इकडे पाहा.’ तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले. मग तो म्हणाला, ‘आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबंधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावेस; आणि त्या नीतिमान पुरुषाला पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी; कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्यांविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील. तर आता उशीर का करतोस? ऊठ, प्रभूच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालन कर.’
प्रेषितांची कृत्ये 22:1-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
“बंधुजनहो व वडीलजनांनो, मी आता तुमच्यासमोर माझी बाजू मांडत आहे.” तो आपणाबरोबर हिब्रू भाषेत बोलत आहे, हे ऐकून ते अधिक शांत झाले. तो पुढे म्हणाला, “मी यहुदी आहे. माझा जन्म किलिकिया येथील तार्स नगरात झाला आणि मी ह्या यरुशलेम शहरात गमलिएलच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे काटेकोर शिक्षण मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो. पुरुष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्त शिक्षा देऊनसुद्धा मी प्रभुमार्ग अनुसरणाऱ्यांचा छळ केला. त्याविषयी उच्च याजक व सगळा वडीलवर्गही माझा साक्षी आहे. मी त्यांच्याकडून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्क ह्या ठिकाणी चाललो होतो, ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरुशलेममध्ये शासन करावयास आणावे. जाता जाता मी दिमिष्कजवळ पोहचलो, तेव्हा दुपारच्या वेळेस माझ्याभोवती एकाएकी प्रखर प्रकाश आकाशांतून चमकला. मी जमिनीवर पडलो आणि ‘शौल, शौल, माझा छळ का करतोस?’, अशी वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली. मी विचारले, ‘प्रभो, तू कोण आहेस?’ त्याने मला म्हटले, ‘ज्या नासरेथकर येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.’ माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. मी म्हणालो, ‘प्रभो, मी काय करावे?’ प्रभूने मला म्हटले, ‘उठून दिमिष्क येथे जा, तू जे काही करावे म्हणून ठरवण्यात आले आहे, ते सर्व तुला तेथे सांगण्यात येईल.’ त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले म्हणून माझ्या सहकाऱ्यांनी माझा हात धरून मला दिमिष्क येथे नेले. हनन्या नावाचा एक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तेथे राहणारे सर्व यहुदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत. तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, ‘शौल भाऊ, इकडे पाहा.’ तत्क्षणी मी त्याच्याकडे वर पाहिले. तो म्हणाला, ‘आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबंधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे, हे तू समजून घ्यावे आणि त्या नीतिमान सेवकाला पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी. कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षीदार होशील. तर आता उशीर का करतोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालन कर.’