प्रेषितांची कृत्ये 2:4-11
प्रेषितांची कृत्ये 2:4-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरूशलेम शहरात राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपआपल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन; म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालील प्रांतातील ना? तर आपण प्रत्येकजण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पदुकिया, पंत, आशिया, फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यात राहणारे, यहूदी व यहूदीयमतानूसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपआपल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.”
प्रेषितांची कृत्ये 2:4-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेथे उपस्थितीत असलेले सगळे जण पवित्र आत्म्याने भरले आणि आत्म्याने हे करण्यास त्यांना समर्थ केल्यामुळे ते वेगवेगळ्या भाषेत बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालील प्रत्येक देशामधून आलेले भक्तिमान यहूदी यरुशलेममध्ये राहत होते. जेव्हा त्यांनी तो मोठा आवाज ऐकला, तेव्हा त्याठिकाणी लोकांची मोठी गर्दी जमली आणि ते गोंधळून गेले, कारण प्रत्येकाने त्यांची स्वतःची मातृभाषा बोलली जात आहे, असे ऐकले. विस्मित होऊन त्यांनी विचारले: “हे सर्व बोलत आहेत ते गालीलकर आहेत ना? तरीसुद्धा ते आमच्या मातृभाषांमध्ये बोलताना आम्ही ऐकत आहोत हे कसे? आम्ही येथे पार्थी, मेदी आणि एलामी लोक आहोत; मेसोपोटामिया रहिवासी, यहूदीया आणि कप्पदुकिया, पंत आणि आशिया, फ्रुगिया आणि पंफुल्या, इजिप्त व कुरणेच्या जवळचा लिबिया; रोमहून आलेले पाहुणे यहूदी व धर्मांतर झालेले यहूदी; क्रेतीय व अरब हेही आमच्यात आहेत. तरीदेखील परमेश्वराच्या अद्भुत कृत्यांबद्दल आमच्या भाषेमध्ये बोलताना ऐकत आहोत!”
प्रेषितांची कृत्ये 2:4-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरुशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला; कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालीली ना? तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पदुकिया, पंत, आसिया, फ्रुगिया, पंफूलिया, मिसर व कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यांत राहणारे, यहूदी व यहूदीयमतानुसारी असे रोमी प्रवासी, क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपापल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.”
प्रेषितांची कृत्ये 2:4-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातून आलेले यहुदी लोक यरुशलेममध्ये राहत होते. तो ध्वनी ऐकल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन भांबावून गेला कारण प्रत्येकाने आपापल्या भाषेत त्यांना बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे अशा प्रकारे बोलणारे सर्व गालीलकर ना? तर आपण प्रत्येक जण आपापली भाषा ऐकतो हे कसे? आपण पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहुदिया, कप्पुदुकिया, पंत, आसिया, फ्रुगिया, पंफूलिया, मिसर व कुरणेजवळील लिबुवा अशा विविध प्रदेशांतले आहोत. आपणांपैकी काही लोक मूळचे यहुदी व इतर काही धर्मांतरित यहुदी असे रोमन आहेत. तसेच इतर काही लोक क्रेती व अरब आहेत. असे असतानाही आपण त्यांना आपापल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.”