प्रेषितांची कृत्ये 2:25-28
प्रेषितांची कृत्ये 2:25-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, ‘मी परमेश्वरास आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झालीच आणखी माझा देह ही आशेवर राहील. कारण तू माझा जीव मृतलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत; ते आपल्या समक्षतेने मला हर्षभरीत करशील.’”
प्रेषितांची कृत्ये 2:25-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दावीद राजा त्यांच्यासंबंधी म्हणतो: “ ‘मी माझ्या प्रभूला नित्य दृष्टीसमोर ठेवले आहे. कारण ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही. यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे; माझे शरीर देखील आशेत विसावा घेईल, कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही, किंवा तुमच्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाही. तुम्ही मला जीवनाचे मार्ग कळविले आहेत; तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल.’
प्रेषितांची कृत्ये 2:25-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, ‘मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे; म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झाली; आणि माझा देहही आशेवर राहील. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळवले आहेत; तू आपल्या समक्षतेने मला हर्षभरित करशील.’
प्रेषितांची कृत्ये 2:25-28 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो: मी प्रभूला आपणापुढे नित्य पाहिले आहे, मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे, माझे हृदय आनंदाने भरून गेले आहे व माझी जीभ उल्हसित झाली आहे तसेच मी जरी मर्त्य असलो, तरीही आशेवर विसंबून राहीन, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, आपल्या पवित्र सेवकाला तू कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत आणि तुझा सहवास मला आनंदाने भरून टाकील.