प्रेषितांची कृत्ये 12:1-5
प्रेषितांची कृत्ये 12:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला. आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले. ते यहूदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरता त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहार्यात होता; परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती.
प्रेषितांची कृत्ये 12:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या वेळेच्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतील काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला. योहानाचा भाऊ याकोबा ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले. हेरोदाने पाहिले की, यहूदी अधिकाऱ्यांना हे आवडले आहे, म्हणून त्याने पेत्रालासुद्धा अटक करण्याचे ठरवले, ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. हेरोदाने पेत्राला अटक करून तुरुंगात टाकले, त्याच्या रखवालीकरिता त्यास शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले, वल्हांडण सण झाल्यावर पेत्राला लोकांसमोर आणण्याची योजना होती. म्हणून पेत्राला तुंरूगात ठेवण्यात आले, पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती.
प्रेषितांची कृत्ये 12:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याच सुमारास हेरोद राजाने मंडळीतील काही लोकांना छळावे म्हणून बंदिस्त केले. त्याने योहानाचा भाऊ याकोबाचा तलवारीने वध करविला. या कृत्याने यहूदी प्रसन्न झाल्याचे पाहून, हेरोद पेत्रालासुद्धा अटक करण्यास पुढे आला. हे बेखमीर भाकरीच्या सणाच्या वेळेस घडले. पेत्राला अटक करून तुरुंगात टाकले आणि त्याच्यावर चार शिपायांच्या चार दलांचा पहारा बसविला. वल्हांडण सण झाल्यावर त्याला बाहेर आणून समुदायापुढे चौकशी करावी असा हेरोदाचा हेतू होता. पेत्राला तुरुंगात ठेवण्यात आले होते, परंतु मंडळी त्याच्यासाठी परमेश्वराकडे एकाग्रतेने प्रार्थना करत होती.
प्रेषितांची कृत्ये 12:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला. आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले. ते यहूदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरता त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहार्यात होता; परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती.
प्रेषितांची कृत्ये 12:1-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्याच सुमारास हेरोद राजाने ख्रिस्तमंडळीतल्या काही जणांचा छळ सुरू केला. योहानचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने ठार मारले. ते यहुदी लोकांना आवडले, असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात टाकले आणि त्याच्यावर पहारा ठेवण्यासाठी त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. ओलांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे सादर करावे, असा त्याचा बेत होता. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता. मात्र त्याच्याकरिता देवाजवळ ख्रिस्तमंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती.