प्रेषितांची कृत्ये 1:21-24
प्रेषितांची कृत्ये 1:21-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून, प्रभू येशू, आमच्यामध्ये आत बाहेर येत जात होता त्या सर्व काळात, योहानाच्या बाप्तिस्म्यापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले, त्या दिवसापर्यंत तर जी माणसे आपल्या संगतीसोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे. तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते, तो बर्सबा म्हटलेला योसेफ व मत्थिया, या दोघांना त्यांनी पुढे आणले. मग त्यांनी अशी प्रार्थना केली, “हे सर्वाची हृदये जाणणाऱ्या प्रभू
प्रेषितांची कृत्ये 1:21-24 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव हे आवश्यक आहे की अशा व्यक्तिंपैकी एकाची निवड आपण करावी की, जो प्रभू येशू आपल्यामध्ये राहत होते त्या वेळेपासून आतापर्यंत सर्व वेळ आपल्याबरोबर राहत आलेला आहे, प्रारंभीपासून म्हणजे योहानाकडून येशूंचा बाप्तिस्मा झाला, त्या दिवसापासून येशूंना स्वर्गात घेतले जाईपर्यंत, कारण यांच्यामधून एकाने आपल्याबरोबर येशूंच्या पुनरुत्थानाचे साक्षी होणे आवश्यक आहे.” तेव्हा त्यांनी यूस्त म्हटलेला योसेफ ज्याला बर्सबा देखील म्हणत असत आणि मत्थिया अशा दोन माणसांची नावे सुचविली. नंतर त्यांनी प्रार्थना केली, “हे प्रभू, तुम्ही प्रत्येकाचे अंतःकरण जाणता. या दोघांपैकी तुम्ही कोणाला निवडले आहे हे आम्हाला दाखवा
प्रेषितांची कृत्ये 1:21-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून योहानाच्या बाप्तिस्म्यापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले तोपर्यंत, म्हणजे तो आपल्यामध्ये येत-जात असे त्या सगळ्या काळात ही जी माणसे आपल्या संगतीसोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे.” तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते तो बर्सब्बा म्हटलेला योसेफ व मत्थिया, ह्या दोघांना त्यांनी पुढे आणले. मग त्यांनी अशी प्रार्थना केली, “हे सर्वांची हृदये जाणणार्या प्रभू
प्रेषितांची कृत्ये 1:21-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
योहानच्या बाप्तिस्म्यानंतर ज्या दिवशी येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले, तोपर्यंत म्हणजे येशू आपणामध्ये येत जात असे, त्या सगळ्या कालावधीत जी माणसे आपल्याबरोबर होती त्यांच्यांतून एकाने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा साक्षीदार म्हणून आमच्याबरोबर सहभागी व्हावे.” तेव्हा बर्सबा म्हटलेला योसेफ ऊर्फ युस्त व मत्थिया ह्या दोघांची नावे सुचविण्यात आली. मग त्यांनी अशी प्रार्थना केली: “सर्वांची हृदये जाणणाऱ्या हे प्रभो