प्रेषितांची कृत्ये 1:1-3
प्रेषितांची कृत्ये 1:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे थियफिला, येशूने जे शिकवले आणि केले, व ज्या विषयी मी पहिल्या ग्रंथात नमुद केले, त्या दिवसापर्यंत जेव्हा तो वर घेतला गेला. या आज्ञा त्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या निवडलेल्या प्रेषितांना दिल्या. मरण सोसल्यानंतरही येशूने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत. हे दाखवून चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे, व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे.
प्रेषितांची कृत्ये 1:1-3 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
थियफिल महोदय, मी माझ्या पहिल्या ग्रंथात, येशूंनी जे काही कार्य करण्यास आणि शिक्षण देण्यास सुरुवात केली त्या दिवसापासून, त्यांच्या निवडलेल्या प्रेषितांना पवित्र आत्म्याच्याद्वारे आज्ञा केल्यानंतर येशू वर स्वर्गात घेतले गेले त्या दिवसापर्यंत घडलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांचे क्लेश संपल्यानंतर, त्यांनी आपण जिवंत आहोत हे पुष्कळ खात्रीलायक पुराव्यांनी सिद्ध केले. चाळीस दिवसांच्या काळात ते स्वतः त्यांना प्रकट झाले आणि परमेश्वराच्या राज्यासंबंधी बोलले.
प्रेषितांची कृत्ये 1:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
थियफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला, त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करण्यास व शिकवण्यास आरंभले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ अचूक प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवले. चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे.
प्रेषितांची कृत्ये 1:1-3 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
प्रिय थियफिल, येशूने कार्य करायला आरंभ केल्यापासून त्याला स्वर्गात घेतले गेले, तोपर्यंत त्याने जे जे केले व शिकविले त्या सर्वांविषयी मी माझ्या पहिल्या पुस्तकात लिहिले. स्वर्गात घेतला जाण्यापूर्वी ज्यांना त्याने प्रेषित म्हणून निवडले होते, त्यांना त्याने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आदेश दिला. मरण सोसल्यानंतरही त्याने चाळीस दिवस त्यांना दर्शन देऊन अनेक ठोस पुराव्यांनिशी आपण जिवंत आहोत, हे दाखवले. त्यांनी त्याला पाहिले व त्याने त्यांना देवाच्या राज्याविषयी सांगितले.