2 तीमथ्य 1:4-5
2 तीमथ्य 1:3-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी आपल्या प्रार्थनांत रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करतो आणि तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो; तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन, ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेकभावाने करतो, त्याचे मी आभार मानतो. तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठायी होता; तुझी आई युनीके हिच्या ठायी होता; आणि तोच तुझ्याही ठायी आहे असा मला भरवसा आहे.
2 तीमथ्य 1:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुझी आसवे आठवून तुला भेटण्याची उत्कंठा धरतो ह्यासाठी की मी आनंदाने पूर्ण व्हावे. तुझ्यातील निष्कपट विश्वासाची मला आठवण होते जो पहिल्यांदा तुझी आजी लोईसमध्ये होता आणि तुझी आई युनीकेमध्ये होता आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे.
2 तीमथ्य 1:4-5 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यावेळचे तुझे अश्रू मला आठवतात. तुला पुन्हा भेटण्यास मी किती उत्कंठित झालो आहे की माझा आनंद पूर्ण होईल. तुझी आई युनीके आणि तुझी आजी लोईस यांचा प्रभुवर जितका दृढविश्वास आहे आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे.
2 तीमथ्य 1:3-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी माझ्या प्रार्थनेत रात्रंदिवस तुझे स्मरण करतो आणि तुझे अश्रू आठवून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो. तुझ्यामध्ये असलेल्या प्रांजल विश्वासाची मला आठवण होऊन, ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेकभावाने करतो, त्याचे मी आभार मानतो. तो विश्वास तुझी आजी लोईस हिच्यामध्ये व तुझी आई युनीके हिच्यामध्येदेखील होता आणि तोच तुझ्यामध्येसुद्धा आहे, अशी माझी धारणा आहे.