2 तीमथ्य 1:15-18
2 तीमथ्य 1:15-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जे आशियात आहेत ते सर्व माझ्यापासून फुटले, हे तुला ठाऊकच आहे; त्यांत फुगल व हर्मगनेस हे आहेत. अनेसिफराच्या घरावर प्रभू दया करो, कारण त्याने वारंवार माझे समाधान केले आणि त्याला माझ्या बेडीची लाज वाटली नाही; तर तो रोम शहरात असताना त्याने श्रम घेऊन मी सापडेपर्यंत माझा शोध केला; (प्रभू करो आणि त्या दिवशी त्याला प्रभूपासून दया मिळो!) आणि इफिसात कितीतरी प्रकारे त्याने सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.
2 तीमथ्य 1:15-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आशिया प्रांतामध्ये असणाऱ्या सर्वांनी मला सोडले आहे हे तुला ठाऊकच आहे. त्यामध्ये फुगल व हर्मगनेस आहेत. अनेसिफरच्या घरावर प्रभू दया दाखवो कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्यास लाज वाटली नाही. उलट रोम शहरामध्ये असताना त्याने माझा तपास लागेपर्यंत झटून माझा शोध केला. प्रभू करो आणि त्यास त्यादिवशी प्रभूकडून दया मिळो कारण माझ्या इफिसात कितीतरी प्रकारे माझी सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.
2 तीमथ्य 1:15-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आशियातील सर्व विश्वासी माझ्यापासून दूर गेले आहे, हे तुला माहितच आहे. त्यामध्ये फुगलस आणि हर्मगनेस हे देखील आहेत. अनेसिफर आणि त्याचे सर्व कुटुंबीय यांच्यावर प्रभू दया करो, कारण त्याने अनेक वेळा मला उत्तेजन दिले आणि त्याला माझ्या तुरुंगवासाची कधीच लाज वाटली नाही. जेव्हा तो रोममध्ये आला, तेव्हा त्याने सर्वत्र माझा कसून शोध केला आणि शेवटी मला शोधून काढले. त्या दिवशी प्रभुपासून त्याला दया मिळेल असे प्रभू करो! इफिसमध्ये त्याने मला किती प्रकारे मदत केली, हे तुला चांगले माहीत आहे.
2 तीमथ्य 1:15-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जे आशियात आहेत, ते सर्व माझ्यापासून फुटले, हे तुला ठाऊकच आहे. त्यांच्यापैकी फुगल व हर्मगनेस हे आहेत. अनेसिफरच्या कुटुंबावर प्रभू दया करो, कारण त्याने वारंवार मला आधार दिला आणि त्याला माझ्या तुरुंगवासाची लाज वाटली नाही, तर तो रोम शहरात आल्यावर त्याने श्रम घेऊन मी सापडेपर्यंत माझा शोध केला. न्यायाच्या दिवशी त्याला प्रभूकडून दया मिळो! इफिस येथे किती तरी प्रकारे त्याने माझी सेवा केली, हे तुला चांगले माहीत आहे.