2 थेस्सल 3:10-12
2 थेस्सल 3:10-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली होती की, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये. तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काहीएक काम न करता लुडबुड करतात, असे आम्ही ऐकतो. अशा लोकांस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व उत्तेजन देतो की, त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वतःचेच अन्न खावे.
2 थेस्सल 3:10-12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आम्ही तुम्हाजवळ होतो, तेव्हाही आम्ही तुम्हाला हाच नियम दिला होता: “जो कोणी काम करू इच्छित नाही, त्याने खाऊ नये.” तुमच्यापैकी काहींची जीवनशैली आळशी आहे आणि काही लोक व्यत्यय आणणारे व इतरांच्या कामात लुडबुड करतात असे आम्ही ऐकतो. अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने विनंती नव्हे, आज्ञा करतो की त्यांनी शांत व्हावे, आणि आपल्या अन्नासाठी श्रम करावेत.
2 थेस्सल 3:10-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हादेखील आम्ही तुम्हांला अशी आज्ञा केली होती की, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये. तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काहीएक काम न करता लुडबुड करतात, असे ऐकतो. अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व बोध करतो की, त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वत:चेच अन्न खावे.
2 थेस्सल 3:10-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आम्ही तुमच्याबरोबर होतो, तेव्हादेखील आम्ही तुम्हांला आज्ञा दिली होती की, जो काम करायला तयार नसतो, त्याने खाऊ नये. तुमच्यामध्ये कित्येक आळशीपणाने वागणारे असून ते मुळीच काम न करता लुडबूड करतात, असे ऐकतो, म्हणून आम्ही हे सांगत आहोत. अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व बोध करतो की, त्यांनी व्यवस्थितपणे जीवन जगून आपली उपजीविका मिळविण्यासाठी काम करावे.