२ शमुवेल 6:19-23
२ शमुवेल 6:19-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग त्याने सर्व प्रजेला म्हणजे इस्राएलाच्या समुदायातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला एकेक भाकर, मांसाचा एकेक तुकडा, खिसमिसांची एकेक ढेप अशी वाटून दिली. मग सर्व लोक घरोघर गेले. आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला. तेव्हा शौलाची कन्या मीखल दाविदाला भेटायला बाहेर आली व त्याला म्हणू लागली, “एखादा हलकट मनुष्य उघडाबोडका होतो तसे आज इस्राएलाच्या महाराजांनी आपले दास व दासी ह्यांच्यासमोर आपले शरीर उघडे केले, तेव्हा इस्राएलाचे महाराज किती वैभवशाली दिसले!” दावीद मीखलेस म्हणाला, “ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे ह्यांच्याऐवजी मला निवडून आपल्या इस्राएली प्रजेवर अधिपती नेमले त्या परमेश्वरासमोर मी नाचलो; आणि परमेश्वरासमोर मी नाचणारच. मी ह्याहूनही तुच्छ बनेन; मी स्वतःच्या दृष्टीने हीन होईन; पण ज्यांना तू दासी म्हणतेस त्या माझा आदरगौरव करतील.” शौलाची कन्या मीखल हिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही.
२ शमुवेल 6:19-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शिवाय इस्राएलाच्या प्रत्येक स्त्री पुरूषास त्याने भाकरीचा तुकडा, खिसमिसाच्या ढेपेचा तुकडा आणि खजूर मिश्रित भाकरीचा तुकडा दिला. मग सर्वजण आपापल्या घरी गेले. मग दावीद घरातील सर्वांना आशीर्वाद द्यायला घरात आला. तेव्हा शौलकन्या मीखल हिने त्यास गाठले आणि ती म्हणाली, “इस्राएलाच्या राजाने आज आपला सन्मान राखला नाही. नोकरा-चाकरांसमोर, दासीसमोर त्या मूर्खांपैकीच एक असल्याप्रमाणे तुम्ही आपले वस्त्र काढलेत!” तेव्हा दावीद तिला म्हणाला, “तुझे वडील किंवा तुझ्या घराण्यातील दुसरे कोणी या सर्वांना सोडून परमेश्वराने मला निवडले आहे. सर्व इस्राएलांचा मी नेता आहे. तेव्हा मी परमेश्वरापुढे असाच नाचतगात जाणार. मी याच्याही पुढची पायरी गाठीन. तुला आदर नसेल कदाचित् पण ज्या दासींचा तू उल्लेख केलास त्यांना माझ्याबद्दल आभिमान वाटतो.” शौलाची कन्या मीखल हिला मूलबाळ झाले नाही. ती तशीच विनापत्य वारली.
२ शमुवेल 6:19-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर त्याने तिथे जमलेल्या इस्राएली लोकांच्या समुदायातील प्रत्येक स्त्री व पुरुषास एक भाकर, खजुराची एक ढेप, मनुक्याची एक वडी दिली, मग सर्व लोक आपआपल्या घरी गेले. दावीद जेव्हा आपल्या घराण्याला आशीर्वाद देण्यासाठी घरी परतला, तेव्हा शौलाची मुलगी मीखल त्याला भेटण्यास बाहेर आली आणि म्हणाली, “आज इस्राएलाच्या राजाने एखाद्या असभ्य माणसाप्रमाणे आपल्या चाकरांच्या कन्यांसमोर अर्धनग्न अवस्थेत फिरून स्वतःस किती प्रतिष्ठित केले आहे!” दावीद मीखलला म्हणाला, “ते याहवेहच्या समोर झाले, ज्यांनी तुझ्या पित्याच्या किंवा त्याच्या घराण्यातील इतर कोणाच्या ऐवजी माझी निवड करून याहवेहच्या इस्राएली लोकांवर मला राज्यकर्ता म्हणून नेमले; तर मी याहवेहसमोर आनंद साजरा करेन. मी यापेक्षाही अधिक अप्रतिष्ठित होईन आणि मी माझ्या स्वतःच्या दृष्टीने अपमानित होईन. परंतु या गुलाम मुलींद्वारे ज्यांच्याबद्दल तू बोललीस, त्या माझा सन्मान करतील.” आणि शौलाची मुलगी मीखल हिला तिच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत संतती झाली नाही.