नंतर त्याने तिथे जमलेल्या इस्राएली लोकांच्या समुदायातील प्रत्येक स्त्री व पुरुषास एक भाकर, खजुराची एक ढेप, मनुक्याची एक वडी दिली, मग सर्व लोक आपआपल्या घरी गेले. दावीद जेव्हा आपल्या घराण्याला आशीर्वाद देण्यासाठी घरी परतला, तेव्हा शौलाची मुलगी मीखल त्याला भेटण्यास बाहेर आली आणि म्हणाली, “आज इस्राएलाच्या राजाने एखाद्या असभ्य माणसाप्रमाणे आपल्या चाकरांच्या कन्यांसमोर अर्धनग्न अवस्थेत फिरून स्वतःस किती प्रतिष्ठित केले आहे!” दावीद मीखलला म्हणाला, “ते याहवेहच्या समोर झाले, ज्यांनी तुझ्या पित्याच्या किंवा त्याच्या घराण्यातील इतर कोणाच्या ऐवजी माझी निवड करून याहवेहच्या इस्राएली लोकांवर मला राज्यकर्ता म्हणून नेमले; तर मी याहवेहसमोर आनंद साजरा करेन. मी यापेक्षाही अधिक अप्रतिष्ठित होईन आणि मी माझ्या स्वतःच्या दृष्टीने अपमानित होईन. परंतु या गुलाम मुलींद्वारे ज्यांच्याबद्दल तू बोललीस, त्या माझा सन्मान करतील.” आणि शौलाची मुलगी मीखल हिला तिच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत संतती झाली नाही.
2 शमुवेल 6 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 शमुवेल 6:19-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ