YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 5:11-25

२ शमुवेल 5:11-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

सोरेचा राजा हीराम ह्याने दाविदाकडे जासूद पाठवले; तसेच त्याने गंधसरूचे लाकूड, सुतार व गवंडी पाठवले; त्यांनी दाविदासाठी राजमंदिर बांधले. परमेश्वराने इस्राएलावरील आपले राज्य स्थिर केले आहे आणि आपल्या इस्राएली प्रजेप्रीत्यर्थ आपल्या राज्याची उन्नती केली आहे हे दाविदाच्या ध्यानात आले. मग दावीद हेब्रोनाहून आला तेव्हा त्याने यरुशलेमेतून आणखी काही उपपत्नी व पत्नी केल्या; दाविदाला आणखी पुत्र व कन्या झाल्या. यरुशलेमेत त्याला पुत्र झाले त्यांची नावे ही : शम्मूवा, शोबाब, नाथान, शलमोन, इभार, अलीशवा, नेफग, याफीय, अलीशामा, एल्यादा व अलीफलेट. दाविदाला अभिषेक करून इस्राएलाचा राजा केले आहे हे ऐकून सर्व पलिष्टी दाविदाच्या शोधासाठी निघाले; हे कानी येताच दावीद खाली आपल्या गढीत गेला. पलिष्टी येऊन रेफाईम खोर्‍यात पसरले. दाविदाने परमेश्वराला प्रश्‍न केला, “मी पलिष्ट्यांवर चढाई करू काय? तू त्यांना माझ्या हाती देशील काय?” परमेश्वराने दाविदाला म्हटले, “चढाई कर; मी खात्रीने पलिष्ट्यांना तुझ्या हाती देतो.” मग दावीद बाल-परासीम येथे आला; तेथे दाविदाने त्यांचा संहार केला; तो म्हणाला, “परमेश्वर माझ्यापुढे चालून पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूंवर तुटून पडला.” ह्यावरून त्या ठिकाणाचे नाव बाल-परासीम (तुटून पडण्याचे ठिकाण) असे पडले. पलिष्टी तेथे आपल्या मूर्ती टाकून गेले; त्या दाविदाने व त्याच्या लोकांनी नेल्या. मग पुन्हा पलिष्टी चढाई करून येऊन रेफाईम खोर्‍यात पसरले. मग दाविदाने परमेश्वराला प्रश्‍न केला असता त्याने सांगितले, “त्यांच्याशी सामना करू नकोस, तर वळसा घेऊन त्यांच्या पिछाडीस जा आणि तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर छापा घाल. तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सेना कूच करीत आहे असा आवाज तुझ्या कानी पडताच उठावणी कर, कारण परमेश्वर पलिष्ट्यांच्या सेनेचा संहार करण्यासाठी तुझ्या पुढे गेला आहे असे समज.” परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले आणि गेबापासून गेजेरापर्यंत तो पलिष्ट्यांना मार देत गेला.

सामायिक करा
२ शमुवेल 5 वाचा

२ शमुवेल 5:11-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

सोरेचा राजा हिराम याने आपले दूत दावीदाकडे पाठवले गंधसंरूची झाडे, सुतार, गवंडी हे ही त्याने पाठवले. त्यांनी दावीदासाठी निवासस्थान उभारले. तेव्हा परमेश्वराने आपल्याला खरोखरच इस्राएलाचा राजा केले आहे हे दावीदाला पटले. तसेच देवाने आपल्या लोकांसाठी, इस्राएल राष्ट्रासाठी, त्याच्या (दावीदाच्या) राज्याला महत्व दिले आहे, हे ही त्यास उमगले. हेब्रोनहून आता दावीद यरूशलेम येथे आला. तेथे त्याने आणखी लग्ने केली आणि त्याच्याकडे आता अधिक दासी आणि स्त्रिया होत्या. यरूशलेम येथे त्याच्या आणखी काही मुलांचा जन्म झाला. त्याच्या या यरूशलेम येथे जन्मलेल्या पुत्रांची नावे अशी. शम्मुवा, शोबाब, नाथान, शलमोन, इभार, अलीशवा, नेफेग, याफीय, अलीशामा, एल्यादा आणि अलीफलेट. दावीदाला इस्राएल लोकांनी राज्याभिषेक केल्याचे पलिष्ट्यांनी ऐकले. तेव्हा त्यास शोधून त्याचा वध करण्यासाठी म्हणून ते निघाले. पण हे वृत्त समजल्यावर दावीद यरूशलेम येथील किल्ल्यात आला. पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला. दावीदाने परमेश्वरास विचारले, “मी पलिष्ट्यांवर चढाई करू का? तुझे साहाय्य मला लाभेल काय?” परमेश्वर उत्तरला, “होय पलिष्ट्यांच्या पराभवात मी तुला खात्रीने मदत करील.” तेव्हा दावीद बाल-परासीम येथे गेला आणि त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. दावीद तेव्हा म्हणाला, “खिंडार पडलेल्या धरणातून पाणी घूसावे तसा परमेश्वर माझ्यादेखत शत्रूवर तुटून पडला.” म्हणूनच दावीदाने त्या जागेचे नाव बाल परासीम म्हणजे, खिंडार पाडणारा प्रभू, असे ठेवले. पलिष्ट्यांनी आपल्या देवांच्या मूर्ती त्या ठिकाणीच टाकून दिल्या. दावीदाने आणि त्याच्या मनुष्यांनी त्या तेथून हलवल्या. पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला. दावीदाने प्रार्थना केली. यावेळी परमेश्वराने सांगितले, “तेथे जाऊ नको त्यांना वळसा घालून पाठीमागे जा. मग तुतीच्या झाडाजवळ त्यांच्यावर हल्ला कर. तुम्ही झाडावर चढून बसा. त्यांच्या सैन्याच्या चढाईचा आवाज तुम्हास झाडाच्या शेंड्यावरून ऐकू येईल. तेव्हा मात्र झटपट उठाव करा कारण परमेश्वरच पलिष्ट्यांच्या पाडावाला पुढे होईल.” दावीदाने मग परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हालचाली केल्या. पलिष्ट्यांचा पराभव केला. गिबापासून गेजेरपर्यंत तो पलिष्ट्यांना मार देत गेला.

सामायिक करा
२ शमुवेल 5 वाचा

२ शमुवेल 5:11-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आता सोरचा राजा हीरामाने दावीदाकडे दूत पाठविले, त्यांच्याबरोबर देवदारू लाकडे व सुतार आणि गवंडी पाठवले आणि त्यांनी दावीदासाठी एक राजवाडा बांधला. तेव्हा दावीदाने जाणले की, याहवेहने आपल्याला इस्राएलवर राजा म्हणून स्थापित केले आहे आणि आपल्या इस्राएली लोकांसाठी त्याचे राज्य उंच केले आहे. दावीदाने हेब्रोन सोडल्यानंतर यरुशलेमात आणखी उपपत्नी आणि पत्नी केल्या आणि त्याला आणखी पुत्र आणि कन्या झाल्या. यरुशलेममध्ये जन्मलेल्या त्याच्या मुलांची नावे ही: शम्मुआ, शोबाब, नाथान, शलोमोन, इभार, एलीशुआ, नेफेग, याफीय, एलीशामा, एलयादा व एलिफेलेत. इस्राएलवर राजा म्हणून दावीदाचा अभिषेक झाला आहे असे पलिष्ट्यांनी जेव्हा ऐकले, तेव्हा ते त्याला शोधण्यासाठी आपले सर्व सैन्य घेऊन निघाले, परंतु दावीदाने याबद्दल ऐकले तेव्हा तो खाली गडाकडे गेला. इकडे पलिष्टी लोक येऊन रेफाईमच्या खोर्‍यात पसरले. तेव्हा दावीदाने याहवेहला विचारले, “मी जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय? आपण त्यांना माझ्या हाती देणार काय?” याहवेहने त्याला उत्तर दिले, “जा, कारण मी नक्कीच पलिष्ट्यांना तुझ्या हातात देईन.” तेव्हा दावीद बआल-पेरासीम येथे गेला आणि तिथे त्याने त्यांचा पराभव केला. दावीद म्हणाला, “पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे याहवेह माझ्या शत्रूंवर माझ्यासमोर तुटून पडले.” म्हणून त्या ठिकाणाला बआल-पेरासीम हे नाव पडले. पलिष्टी लोकांनी त्यांच्या मूर्त्या तिथेच टाकून दिल्या आणि दावीद आणि त्याच्या माणसांनी त्या आपल्याबरोबर नेल्या. पुन्हा एकदा पलिष्टी लोक आले आणि रेफाईमच्या खोर्‍यात पसरले. तेव्हा दावीदाने याहवेहला विचारले आणि त्यांनी उत्तर दिले, “सरळ वरती जाऊ नको, परंतु त्यांच्यामागून वळसा घे आणि तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर हल्ला कर. तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सैन्य चालत येण्याचा आवाज येताच, त्वरित पुढे निघा, त्यावरून पलिष्टी सैन्याचा नाश करण्यासाठी याहवेह तुमच्यापुढे गेले आहेत असे समज.” तेव्हा दावीदाने याहवेहच्या आज्ञेप्रमाणे केले आणि गिबोनापासून गेजेरपर्यंत त्याने पलिष्टी सैन्यांना मारून टाकले.