YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 3:6-39

२ शमुवेल 3:6-39 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

शौलाचे घराणे व दाविदाचे घराणे ह्यांच्यामध्ये जो कलह माजला होता त्यात शौलाच्या घराण्यास अबनेराचे पाठबळ होते. शौलाची एक उपपत्नी होती; ती अय्याची कन्या असून तिचे नाव रिस्पा असे होते. ईश-बोशेथाने अबनेरास विचारले, “तू माझ्या बापाच्या उपपत्नीपाशी का गेलास?” ईश-बोशेथाचे हे शब्द ऐकून अबनेरास क्रोध आला व तो त्याला म्हणाला, “मी काय यहूदाच्या कुत्र्याचे डोके आहे? (मी काय यहूदाच्या पक्षाचा आहे?) आज तुझा बाप शौल ह्याचे घराणे आणि आप्तजन ह्यांच्यावर मी दया करीत असून तुला दाविदाच्या हाती लागू दिले नाही, आणि तू आज ह्या बायकोच्या संबंधाने मला दोष देत आहेस काय? मी शौलाच्या घराण्याकडून राज्य हिसकावून घेईन आणि दाविदाची गादी दानापासून बैरशेब्यापर्यंत इस्राएल व यहूदा ह्यांच्यावर स्थापीन अशी आणभाक परमेश्वराने केली आहे; त्यानुसार मी त्याच्याशी वर्तन केले नाही तर देव अबनेराचे त्या मानाने, किंबहुना त्याहूनही अधिक शासन करो.” त्याच्याने अबनेरास काहीएक जबाब देववला नाही, कारण त्याचा त्याला धाक होता. अबनेराने आपल्या नावाने दाविदाकडे जासूद पाठवून सांगितले, “हा देश कोणाचा बरे?” आणखी असेही सांगितले की, “आपण माझ्याशी सलोखा करा; सर्व इस्राएलाचे मन आपल्याकडे वळवण्याच्या कामी मी आपल्याला मदतीचा हात देतो.” दाविदाने म्हटले, “बरे, मी तुझ्याशी सलोखा करतो; पण एक गोष्ट तुला केली पाहिजे; ती ही की तू मला भेटायला येशील तेव्हा आपल्याबरोबर शौलाची कन्या मीखल हिला घेऊन येणार नाहीस तर तुझी माझी भेट होणार नाही.” दाविदाने शौलाचा पुत्र ईश-बोशेथ ह्याच्याकडे जासूद पाठवून सांगितले की, “माझी स्त्री मीखल जी मी शंभर पलिष्ट्यांच्या अग्रत्वचा देऊन घेतली तिला माझ्याकडे पाठवून दे.” ईश-बोशेथाने लोक पाठवून तिचा नवरा लईशाचा पुत्र पालटीयेल त्याच्यापासून तिला आणले. तिचा नवरा तिच्याबरोबर गेला; तो बहूरीमापर्यंत तिच्यामागून रडत गेला. तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “परत जा;” मग तो माघारी गेला. मग अबनेराने इस्राएलांच्या वडील जनांशी बोलणे लावले की, “दाविदाने आपल्यावर राज्य करावे अशी तुमची गतकाळी इच्छा होती. तर आता ती पूर्ण करा; कारण परमेश्वराने दाविदाविषयी म्हटले आहे की, ‘माझा सेवक दावीद ह्याच्या द्वारे मी आपले लोक इस्राएल ह्यांना पलिष्ट्यांच्या व त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवीन.”’ मग अबनेराने बन्यामिनी लोकांशीही कानगोष्ट केली; आणि इस्राएलास व बन्यामिनी लोकांच्या सर्व घराण्यास जे काही इष्ट वाटले ते दाविदाच्या कानावर घालण्यासाठी तो हेब्रोनास गेला. अबनेर वीस पुरुष बरोबर घेऊन हेब्रोनास दाविदाकडे आला, तेव्हा दाविदाने अबनेरास व त्याच्याबरोबरच्या लोकांना मेजवानी दिली. अबनेर दाविदाला म्हणाला, “मी आता जातो आणि सर्व इस्राएल लोकांना माझ्या स्वामीराजांजवळ जमा करतो, म्हणजे ते आपणाशी करार करतील; मग ज्यांच्यावर राज्य करावे अशी आपली इच्छा आहे त्या सर्वांवर आपण राज्य कराल.” दाविदाने अबनेराची रवानगी केली; व तो सुखरूप निघून गेला. इकडे दाविदाचे लोक यवाबाबरोबर लुटीच्या स्वारीवरून परत आले; त्यांनी मोठी लूट आणली; पण अबनेर दाविदाजवळ हेब्रोन येथे नव्हता; कारण त्याने त्याला निरोप दिला असून तो सुखरूप निघून गेला होता. यवाब व त्याच्याबरोबरचे सगळे सैन्य परत आले तेव्हा यवाबाला लोकांनी सांगितले, “नेराचा पुत्र अबनेर राजाकडे आला होता; त्याची त्याने रवानगी केली व तो सुखरूप निघून गेला आहे.” यवाब राजाजवळ जाऊन म्हणाला, “आपण हे काय केले? अबनेर आपणाजवळ आला होता. त्याची आपण का रवानगी केली? तो हातचा पार निघून गेला. नेराचा पुत्र अबनेर ह्याला आपण ओळखत असालच. तो आपणांस फसवायला आणि आपली हालचाल व आपले एकंदर करणेसवरणे ह्यांचा भेद घेण्यासाठी आला होता.” यवाब दाविदापासून निघून गेल्यावर त्याला नकळत यवाबाने अबनेराकडे जासूद पाठवले; आणि त्यांनी त्याला सिरा नावाच्या विहिरीपासून परत आणले. अबनेर हेब्रोनास परत आला तेव्हा त्याच्याशी एकान्ती बोलण्यासाठी म्हणून यवाब त्याला वेशीच्या आत घेऊन गेला; तेथे आपला भाऊ असाएल ह्याच्या रक्तपाताचा सूड उगवण्यासाठी त्याने अबनेराच्या पोटावर असा वार केला की तो प्राणास मुकला. पुढे दाविदाच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा तो म्हणाला, “नेराचा पुत्र अबनेर ह्याच्या खुनासंबंधाने मी व माझे राज्य परमेश्वराच्या दृष्टीने सदा निर्दोषच असणार. तो दोष यवाबाच्या व त्याच्या सगळ्या पितृकुळाच्या माथी येवो; आणि यवाबाच्या वंशात स्रावी, महारोगी, काठी टेकत चालणारा, तलवारीने पडणारा किंवा अन्नान्न करणारा असा कोणी ना कोणी असल्यावाचून राहणार नाही.” यवाब व त्याचा भाऊ अबीशय ह्यांनी अबनेराचा वध केला; कारण त्याने त्यांचा भाऊ असाएल ह्याला गिबोनाच्या लढाईत मारले होते. मग दावीद यवाबाला व आपल्याबरोबरच्या सर्व लोकांना म्हणाला, “आपली वस्त्रे फाडा आणि गोणपाट नेसून अबनेरापुढे शोक करत चाला.” दावीद राजा स्वतः त्याच्या तिरडीमागे चालला. त्याने हेब्रोन येथे अबनेराला मूठमाती दिली; अबनेराच्या कबरेजवळ राजा गळा काढून रडला; सर्व लोकही रडले. दाविदाने अबनेरासाठी विलाप करून हे गीत म्हटले : “मूढाप्रमाणे अबनेरास मृत्यू प्राप्त व्हावा काय? तुझे हस्त बद्ध केले नव्हते; तुझ्या पायांत बेड्या घातल्या नव्हत्या; अधर्म्यांपुढे जसा कोणी पतन पावतो तसा तू पतन पावलास.” हे ऐकून लोक त्याच्यासाठी पुन्हा रडू लागले. दिवस अजून थोडा उरला होता, तेव्हा सर्व लोक दाविदाने अन्न खावे म्हणून त्याला आग्रह करण्यासाठी आले; पण दावीद शपथ घेऊन म्हणाला, “सूर्यास्तापूर्वी मी भाकर किंवा काही खाल्ले तर देव मला तसेच किंबहुना त्याहूनही अधिक शासन करो.” सर्व लोकांच्या हे लक्षात आले व त्यांना ते बरे वाटले; राजा जे जे करी ते ते सर्व लोकांच्या मनास येई. ह्यावरून सर्व लोकांच्या व सर्व इस्राएल लोकांच्या लक्षात आले की नेराचा पुत्र अबनेर ह्याचा वध राजाकडून झाला नाही. राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आज इस्राएलातला एक सरदार, एक मोठा पुरुष पडला, हे तुम्हांला कळत नाही काय? मी एवढा अभिषिक्त राजा आहे तरी आज निर्बल आहे व हे सरूवेचे पुत्र मला फार भारी आहेत; पण परमेश्वर दुष्कर्म करणार्‍यांचे त्यांच्या दुष्कर्मानुसार पारिपत्य करो.”

सामायिक करा
२ शमुवेल 3 वाचा

२ शमुवेल 3:6-39 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

शौल आणि दावीद यांच्या घराण्यात चाललेल्या लढायांमध्ये शौलाच्या सैन्यातील अबनेरचे बळ वाढत चालले. शौलाची रिस्पा नामक उपपत्नी असून ती अय्याची मुलगी होती. ईश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “माझ्या वडिलांच्या दासीशी तू शारीरिक संबध का ठेवतोस?” या बोलण्याचा अबनेरला संताप आला. तो म्हणाला, मी काय यहूदाच्या असलेल्या कुत्र्याचे डोके आहे? शौलाशी आणि त्याच्या घराण्याशी मी एकनिष्ठ राहिलेलो आहे. दावीदाच्या हातून मी तुमचा पराभव होऊ दिला नाही. मी विश्वासघात केला नाही, पण आता तू मला या स्त्रीच्या संदर्भात दोष देत आहेस. आता मात्र मी निश्चित सांगतो की, परमेश्वराने भाकित केल्याप्रमाणे सर्व घडेल. माझ्या हातून आता हे सर्व प्रत्यक्षात आले नाही, तर देव खुशाल माझे वाईट करो. शौलाच्या घराण्याकडून राज्य काढून घेऊन ते दावीदाकडे सोपवण्याचे भाकित परमेश्वराने केले आहे. परमेश्वर दावीदाला इस्राएल आणि यहूदा यांचा राजा करणार आहे. दानपासून बैर-शेब्यापर्यंत त्याचे राज्य असेल. ईश-बोशेथ हे ऐकून इतका घाबरला की त्याने अबनेरला काहीही प्रत्युत्तर केले नाही. अबनेरने दूताकरवी दावीदाला निरोप पाठवला, “या प्रदेशावर कोणी राज्य करावे असे तुला वाटते? माझ्याशी करार कर. म्हणजे इस्राएलचा राजा म्हणून तुला मान्यता मिळवून द्यायला मी मदत करीन.” यावर दावीद म्हणाला, “हे छान झाले मी करार करायला तयार आहे. आता माझे एक मागणे आहे. शौलाची मुलगी मीखल हिला आपल्याबरोबर आणलीस तरच मी तुला भेटीन.” शौलाचा मुलगा ईश-बोशेथ याच्याकडे दावीदाने जासूदाकरवी निरोप पाठवला, “माझी पत्नी मीखल हिला माझ्याकडे पाठवून द्यावे. ती मला देण्यात आलेली आहे. तिच्या प्राप्तीसाठी मी शंभर पलिष्ट्यांचा वध केला होता.” तेव्हा ईश-बोशेथने लईशाचा मुलगा पालटीयेल याच्याकडून मीखलला आणण्यास माणसे पाठवली. पालटीयेल हा मीखलचा पती तो तिच्या मागोमाग बहूरीमपर्यंत रडत रडत गेला. पण अबनेरने त्यास परत जाण्यास सांगितले तेव्हा तो मागे फिरला. अबनेराने इस्राएलाच्या वडीलधाऱ्या मंडळीकडे निरोप पाठवला, “दावीदाला राजा करावे असे तुमच्या मनात होते. आता ते प्रत्यक्षात आणा परमेश्वराने दावीदा विषयी म्हटले आहे, पलिष्टी लोक आणि इतर शत्रू यांच्यापासून मी माझ्या इस्राएल लोकांचे संरक्षण करीन. माझा सेवक दावीद याच्यामार्फत मी हे करीन.” अबनेरने हे सर्व हेब्रोन येथे दावीदाच्या कानावर घातले. बन्यामीन घराण्यातील लोकांशीही तो या विषयी बोलला त्यांना आणि इस्राएल लोकांस ते चांगले वाटले. एवढे झाल्यावर तो आपल्या बरोबर वीस जणांना घेऊन हेब्रोन येथे दावीदाकडे आला. दावीदाने अबनेर आणि त्याच्या बरोबरचे हे सर्व लोक यांना मेजवानी दिली. अबनेर दावीदाला म्हणाला, “महाराज, सर्व इस्राएल लोकांस मी आता आपल्या पायाशी एकत्र आणतो. ते तुमच्याशी करार करतील. मग आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही इस्राएलवर राज्य कराल.” तेव्हा दावीदाने अबनेरला निरोप दिला. अबनेर शांततेने परत गेला. इकडे यवाब आणि दावीदाचे लोक युध्दावरून परत आले. त्यांनी शत्रूकडून बऱ्याच मौल्यवान वस्तू लुटून आणल्या. दावीदाने निरोप दिल्यावर अबनेर नुकताच शांतचित्ताने तेथून गेला होता. तेव्हा हेब्रोन येथे दावीदाजवळ तो अर्थातच नव्हता. यवाब सर्वसैन्यासह हेब्रोन येथे आला. सैन्यातील लोक यवाबाला म्हणाले, “नेरचा मुलगा अबनेर दावीदराजाकडे आलेला होता आणि दावीदाने त्यास शांत मनाने जाऊ दिले.” तेव्हा यवाब राजाकडे आला आणि म्हणाला, “हे आपण काय केलेत? अबनेर येथे आलेला असताना तुम्ही त्यास तसेच जाऊ दिलेत! असे का? या नेरच्या मुलाला तुम्ही ओळखताच. त्याचा यामध्ये कावा आहे. तो येथील बातमी काढायला आला होता.” मग दावीदाकडून निघून यवाबाने आपले दूत अबनेरच्या मागावर पाठवले. त्यांनी त्यास सिरा विहिरीजवळ गाठले आणि परत आणले. दावीदाला याची काहीच कल्पना नव्हती. हेब्रोन येथे त्यास आणल्यावर यवाबाने त्यास गुप्त मसलत करण्यासाठी म्हणून वेशीच्या आत घेतले आणि अबनेरच्या पोटावर वार केला. अबनेर गतप्राण झाला. यवाबाचा भाऊ असाएल याला अबनेराने मारले होते त्याचा यवाबाने सूड उगवला. दावीदाला हे वृत्त समजले तेव्हा तो म्हणाला, “नेरचा मुलगा अबनेर याच्या खुनाच्या बाबतीत मी आणि माझे राज्य निर्दोष आहोत, परमेश्वर हे जाणतो. यवाब आणि त्याचे कुटुंबीय या कृत्याला जबाबदार आहेत. तेव्हा अपराधी ते आहेत. याचे फळ त्यांना भोगावे लागेल त्याच्या वंशातील लोक महारोग, पंगुत्व यांनी ग्रासले जातील, युध्दात मारले जातील. त्यांची अन्नान्नदशा होईल.” गिबोनच्या लढाईत अबनेरने असाएलला मारले. आपल्या भावाच्या वधाचे प्रत्युत्तर म्हणून यवाब आणि अबीशय यांनी अबनेरला मारले. दावीदाने यवाब व त्याच्या बरोबरचे सर्व लोक यांना सांगितले, “तुमची ही वस्त्रे फाडा आणि शोक झाला असल्याचे दाखवणारी वस्त्रे घाला.” अबनेरच्या मृत्युबद्दल दुःख व्यक्त करा. त्यांनी हेब्रोन येथे अबनेरचे दफन केले. दावीद अत्यंविधीला हजर होता. अबनेरच्या कबरीपाशी राजा आणि इतर सर्वजण यांनी विलाप केला. तेथे दावीद राजाने हे शोकगीत म्हटले, “एखाद्या मूढ गुन्हेगाराप्रमाणे अबनेर मेला, नाही का? अबनेर, अरे, तुझ्या हातात बेड्या नव्हत्या, पाय साखळदंडांनी बांधले नव्हते. नाही रे, तुला कपटी लोकांनी मारले.” मग पुन्हा सर्वांनी अबनेरसाठी शोक व्यक्त केला. दावीदाने काही तरी खाऊन घ्यावे म्हणून दिवसभर लोकांनी त्याची मनधरणी केली. पण दावीदाने एक निर्धार केला होता. सूर्यास्तापूर्वी मी भाकर किंवा तत्सम काहीही खाल्ले तरी देव मला शासन करो, मला संकटात टाको असे तो बोलला होता. लोकांनी हे सर्व पाहिले आणि दावीद राजाची वर्तणूक पाहून त्यांना आनंद झाला. दावीदाने नेर चा पुत्र अबनेरला मारलेले नाही याबद्दल यहूदा आणि इस्राएल लोकांची खात्री पटली. दावीद राजा आपल्या सेवकांना म्हणाला, आज एक मुख्य आणि महत्वाचा पुढारी इस्राएलमध्ये मारला गेला हे तुम्ही जाणत नाही काय? आज जरी मी आभिषिक्त राजा आहे, तरी मी अशक्त आहे. सरुवेच्या मुलांचे हे वर्तन मला फार त्रासदायक झाले आहे. परमेश्वर त्यांच्या गुन्ह्याबद्दल त्यांना तसेच शासन करो.

सामायिक करा
२ शमुवेल 3 वाचा

२ शमुवेल 3:6-39 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

दावीद व शौल यांच्या घराण्यांमधील लढाईच्या काळात, अबनेर शौलाच्या घराण्यात आपले स्थान मजबूत करीत होता. रिजपाह नावाची शौलाची एक उपपत्नी होती, जी अय्याहची कन्या होती. इश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “तू माझ्या बापाच्या उपपत्नीबरोबर का संबंध केला?” तेव्हा इश-बोशेथचे बोलणे ऐकल्याने अबनेर फार संतापला. त्याने उत्तर दिले, “मी यहूदीयाच्या कुत्र्याचे डोके आहे काय? आजही मी तुझा पिता शौल याच्या घराण्याशी आणि त्याच्या कुटुंबाशी आणि त्याच्या मित्रांशी एकनिष्ठ आहे. मी तुला दावीदाच्या हातून शासन केले नाही. तरीही या स्त्रीला मध्ये आणून माझ्यावर अपराधाचा आरोप करीत आहे! याहवेहने शपथ घेऊन दावीदाला जे म्हटले आहे त्याप्रमाणे मी जर केले नाही तर परमेश्वर अबनेराचे तसे किंवा त्यापेक्षा अधिक शासन करोत. आणि शौलाच्या घराण्याकडून राज्य हस्तांतरीत करून इस्राएल आणि यहूदीयावर दानपासून बेअर-शेबापर्यंत दावीदाचे सिंहासन स्थापित केले नाही तर परमेश्वर अबनेरशी अधिक कठोरपणे वागो.” इश-बोशेथ अबनेरला आणखी एकही शब्द बोलण्यास धजला नाही, कारण तो अबनेरला घाबरत होता. नंतर अबनेरने आपल्या निरोप्यांना दावीदाकडे असे म्हणत पाठवले, “हा प्रदेश कोणाचा आहे? माझ्याबरोबर एक करार कर आणि मी सर्व इस्राएली लोकांना तुझ्याकडे आणण्यास मदत करेन.” दावीद म्हणाला, “ठीक आहे, मी तुझ्याबरोबर एक करार करेन. परंतु मी तुझ्याकडून एका गोष्टीची मागणी करतो: जेव्हा तू मला भेटायला येशील तेव्हा शौलाची कन्या मीखल हिला घेऊन आल्याशिवाय माझ्यासमोर येऊ नकोस.” नंतर दावीदाने शौलाचा पुत्र इश-बोशेथ याच्याकडे दूत पाठवून सांगितले, “माझी पत्नी मीखल मला दे, जिला मी शंभर पलिष्ट्यांच्या अग्रत्वचा किंमत देऊन वाग्दत्त करून घेतली.” तेव्हा इश-बोशेथने हुकूम करून मीखलला तिचा पती, लईशचा पुत्र पलतीएल याच्यापासून आणले. तरीही तिचा पती रडत तिच्यामागे बहूरीमपर्यंत गेला. तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “परत घरी जा!” तेव्हा तो परत गेला. अबनेरने इस्राएलच्या पुढार्‍यांबरोबर विचारविनिमय केला आणि म्हणाला, “दावीद तुमचा राजा व्हावा अशी काही काळापासून तुमची इच्छा होती. आता तसे करा! कारण याहवेहने दावीदाला अभिवचन दिले आहे, ‘माझा सेवक दावीद याच्याद्वारे माझ्या इस्राएली लोकांना मी पलिष्ट्यांच्या आणि त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवेन.’ ” अबनेर बिन्यामीन लोकांबरोबरही प्रत्यक्ष बोलला. नंतर तो हेब्रोनास दावीदाकडे गेला व इस्राएली आणि संपूर्ण बिन्यामीन गोत्राला जे करण्याची इच्छा होती ते दावीदाला सांगितले. जेव्हा अबनेर त्याच्या बरोबरच्या वीस माणसांना घेऊन दावीदाकडे हेब्रोनास आला, तेव्हा दावीदाने त्याच्यासाठी आणि त्याच्या माणसांसाठी मेजवानी तयार केली. तेव्हा अबनेर दावीदाला म्हणाला, “मी जाऊन माझ्या धनीराजासाठी सर्व इस्राएली लोकांना एकत्र करेन, यासाठी की त्यांनी तुमच्याबरोबर एक करार करावा, मग आपल्या मनास येईल त्यांच्यावर आपण राज्य करावे” तेव्हा दावीदाने अबनेरला रवाना केले आणि तो शांतीने गेला. त्याचवेळेस दावीदाची माणसे आणि योआब छापा घालून परतले आणि आपल्याबरोबर मोठी लूट आणली. परंतु अबनेर दावीदाबरोबर हेब्रोनमध्ये नव्हता, कारण दावीदाने त्याला रवाना केले होते आणि तो शांतीने गेला होता. जेव्हा योआब आणि त्याच्या बरोबरचे सर्व सैनिक आले तेव्हा त्याला सांगितले गेले की, नेराचा पुत्र अबनेर राजाकडे आला होता आणि राजाने त्याला परत पाठवून दिले आणि तो शांतीने गेला होता. तेव्हा योआब राजाकडे गेला आणि म्हणाला, “आपण हे काय केले? पाहा, अबनेर आपणाकडे आला होता. आपण त्याला का जाऊ दिले? आता तो गेला आहे! आपणास नेराचा पुत्र अबनेर कसा आहे हे माहीत आहे; तो आपणास फसवायला आणि आपल्या हालचाली पाहण्यासाठी आणि आपण जे करता त्याचा अंदाज घेण्यासाठी आला होता.” नंतर योआब दावीदाकडून निघाला आणि त्याने अबनेरच्या मागे निरोप्यांना पाठवले आणि त्यांनी त्याला सिराहच्या विहिरीपासून परत आणले. परंतु दावीदाला हे माहीत नव्हते. जेव्हा अबनेर हेब्रोनास परत आला, तेव्हा योआबाने त्याला आतील खोलीत बाजूला नेले जसे की, त्याला त्याच्याबरोबर काही खाजगी बोलावयाचे आहे. आणि तिथे त्याचा भाऊ असाहेल याच्या रक्ताचा सूड घ्यावा म्हणून योआबने त्याच्या पोटावर वार केला आणि तो मरण पावला. नंतर जेव्हा दावीदाने याबद्दल ऐकले, तो म्हणाला, “मी आणि माझे राज्य नेराचा पुत्र अबनेर याच्या रक्ताबाबतीत याहवेहसमोर निर्दोष आहोत. त्याचे रक्तदोष योआब आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर असो! योआबच्या कुटुंबात स्रावी, महारोगी, कुबडीवर टेकलेला, तलवारीने पडणारा, अन्नावाचून राहणारा असा कोणी ना कोणी असल्याशिवाय राहणार नाही.” योआब व त्याचा भाऊ अबीशाई यांनी अबनेरला मारून टाकले, कारण त्याने गिबोनच्या लढाईत त्यांचा भाऊ असाहेलला मारले होते. नंतर दावीद योआबाला आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व लोकांना म्हणाला, “तुमची वस्त्रे फाडा आणि गोणपाट नेसून अबनेरसमोर शोक करत चला.” दावीद राजा स्वतः तिरडीमागे चालला. त्यांनी अबनेरास हेब्रोनमध्ये पुरले आणि राजाने अबनेरच्या कबरेजवळ मोठ्याने आकांत केला. सर्व लोकसुद्धा रडले. राजाने अबनेरसाठी हे विलापगीत गाईले: “मूर्खाने मरावे तसे अबनेरने मरावे काय? तुझे हात बांधलेले नव्हते, तुझ्या पायसुद्धा बेड्यांमध्ये नव्हते. दुष्टासमोर एखादा पडावा तसा तू पडला.” आणि सर्व लोक त्याच्यासाठी पुन्हा रडले. नंतर त्या सर्वांनी येऊन दावीदाने दिवस असताच काही खावे अशी विनंती केली; पण दावीद शपथ घेत म्हणाला, “सूर्यास्ताच्या आधी मी भाकर किंवा काहीही सेवन केले, तर परमेश्वर मला कठोर शासन करोत!” सर्व लोकांनी हे लक्षात घेतले आणि त्यांना समाधान वाटले; राजाने जे सर्वकाही केले त्यात ते खचितच समाधानी झाले. त्या दिवशी तिथे असलेल्या सर्व लोकांना आणि सर्व इस्राएलला लक्षात आले की, नेराचा पुत्र अबनेर याला ठार मारण्यात राजाचा काही भाग नव्हता. नंतर राजा आपल्या माणसांना म्हणाला, “तुम्हाला लक्षात येत नाही काय की आज इस्राएलमध्ये एक सेनापती, एक महान पुरुष पडला आहे? आणि आज, मी अभिषिक्त राजा असूनही, निर्बल आहे आणि जेरुइयाहचे हे पुत्र माझ्यासाठी फारच शक्तिमान आहेत. याहवेह वाईट कृत्य करणाऱ्यास त्याच्या दुष्कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देवो!”