२ शमुवेल 3:17-18
२ शमुवेल 3:17-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अबनेराने इस्राएलाच्या वडीलधाऱ्या मंडळीकडे निरोप पाठवला, “दावीदाला राजा करावे असे तुमच्या मनात होते. आता ते प्रत्यक्षात आणा परमेश्वराने दावीदा विषयी म्हटले आहे, पलिष्टी लोक आणि इतर शत्रू यांच्यापासून मी माझ्या इस्राएल लोकांचे संरक्षण करीन. माझा सेवक दावीद याच्यामार्फत मी हे करीन.”
२ शमुवेल 3:17-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अबनेरने इस्राएलच्या पुढार्यांबरोबर विचारविनिमय केला आणि म्हणाला, “दावीद तुमचा राजा व्हावा अशी काही काळापासून तुमची इच्छा होती. आता तसे करा! कारण याहवेहने दावीदाला अभिवचन दिले आहे, ‘माझा सेवक दावीद याच्याद्वारे माझ्या इस्राएली लोकांना मी पलिष्ट्यांच्या आणि त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवेन.’ ”
२ शमुवेल 3:17-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग अबनेराने इस्राएलांच्या वडील जनांशी बोलणे लावले की, “दाविदाने आपल्यावर राज्य करावे अशी तुमची गतकाळी इच्छा होती. तर आता ती पूर्ण करा; कारण परमेश्वराने दाविदाविषयी म्हटले आहे की, ‘माझा सेवक दावीद ह्याच्या द्वारे मी आपले लोक इस्राएल ह्यांना पलिष्ट्यांच्या व त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवीन.”’