२ शमुवेल 14:1-4
२ शमुवेल 14:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अबशालोमच्या ओढीमुळे राजा बेचैन झालेला आहे हे सरुवेचा मुलगा यवाब याला कळले. तेव्हा तकोवा शहरात निरोप्याला पाठवून त्याने तेथील एका चतुर स्त्रीला बोलावणे पाठवले. तिला तो म्हणाला, तू खूप दु:खात असल्याचे ढोंग कर. त्यास शोभेसे कपडे कर. नटू सजू नको. अनेक दिवस मृताचा शोक करीत असलेल्या स्त्रीसारखी तू दिसली पाहिजेस. राजाकडे जा आणि मी सांगतो तसे त्याच्याशी बोल. यवाबाने मग तिला काय बोलायचे ते सांगितले. मग तकोवा येथील स्त्री राजाशी बोलली. तिने स्वत:ला जमिनीवर लवून व राजापुढे नतमस्तक होऊन ती म्हणाली, कृपाकरून मला मदत करा.
२ शमुवेल 14:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
राजाचे मन अबशालोमाकडे लागले आहे, हे सरूवेचा पुत्र यवाब ह्याच्या लक्षात आले. तेव्हा यवाबाने तकोवा येथे जासूद पाठवून एका चतुर स्त्रीला बोलावून आणले; तो तिला म्हणाला, “तू सुतक्याचे मिष करून सुतकाचा पेहराव घाल, अंगास तेल लावू नकोस आणि मृतासाठी बहुत दिवस शोक करणारी अशी स्त्री बन; मग राजाकडे जाऊन असे असे बोल.” यवाबाने तिला काय बोलायचे ते शिकवले. तकोवा येथील त्या स्त्रीने राजाकडे जाऊन त्याला साष्टांग दंडवत घातले आणि म्हटले, “महाराज, माझी दाद लावा.”