राजाचे मन अबशालोमाकडे लागले आहे, हे सरूवेचा पुत्र यवाब ह्याच्या लक्षात आले. तेव्हा यवाबाने तकोवा येथे जासूद पाठवून एका चतुर स्त्रीला बोलावून आणले; तो तिला म्हणाला, “तू सुतक्याचे मिष करून सुतकाचा पेहराव घाल, अंगास तेल लावू नकोस आणि मृतासाठी बहुत दिवस शोक करणारी अशी स्त्री बन; मग राजाकडे जाऊन असे असे बोल.” यवाबाने तिला काय बोलायचे ते शिकवले. तकोवा येथील त्या स्त्रीने राजाकडे जाऊन त्याला साष्टांग दंडवत घातले आणि म्हटले, “महाराज, माझी दाद लावा.”
२ शमुवेल 14 वाचा
ऐका २ शमुवेल 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ शमुवेल 14:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ