YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 9:1-7

२ राजे 9:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अलीशाने, एका तरुण संदेष्ट्याला बोलावले. अलीशा त्यास म्हणाला, “तयार हो आणि ही तेलाची कुपी बरोबर घे. रामोथ-गिलाद येथे जा. येथे पोचल्यावर निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याला शोधून काढ. मग आत जाऊन त्यास त्याच्या भावांमधून उठवून आतल्या खोलीत ने. त्यानंतर ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर तेल ओत. तेव्हा ‘परमेश्वर म्हणतो की इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला आहे,’ असे म्हण. एवढे झाले की धावत परत ये. तेथे थांबू नकोस!” तेव्हा तो तरुण संदेष्टा रामोथ-गिलाद येथे आला येथे पोचल्यावर त्यास सैन्यातील सरदार बसलेले आढळले. त्यांना तो म्हणाला, “तुमच्यासाठी एक निरोप आहे.” येहू म्हणाला, “आम्ही सर्वच इथे आहोत. निरोप नक्की कोणासाठी आहे?” तेव्हा तो तरुण म्हणाला, “हे सरदारा, तुझ्याशीच; माझे काम आहे.” यावर येहू उठून घरात आला. त्या तरुण संदेष्ट्याने त्याच्या मस्तकावर तेलाचा अभिषेक केला. येहूला तो म्हणाला, इस्राएलचा परमेश्वर देव म्हणतो, “इस्राएलचा पुढचा राजा म्हणून मी तुला अभिषेक करत आहे.” तुमचा राजा अहाब याच्या घराण्याचा तू संहार करावास. अशा तऱ्हेने मी माझे सेवक, संदेष्टे, परमेश्वराचे सर्व सेवक यांच्या वधाचा सूड घेऊन ईजबेलला शासन करणार आहे.

सामायिक करा
२ राजे 9 वाचा

२ राजे 9:1-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

इकडे अलीशा संदेष्ट्याने एका तरुण संदेष्ट्याला संदेष्ट्यांच्या समुहातून बोलाविले आणि त्याला म्हटले, “तू आपली कंबर बांध, जैतून तेलाची कुपी बरोबर घे आणि रामोथ गिलआद येथे जा. जेव्हा तू तिथे पोहोचशील तेव्हा निमशी यहोशाफाटाचा पुत्र येहूचा शोध घे व त्याला त्याच्या मित्र मंडळीपासून दूर एका खाजगी खोलीत घेऊन जा, मग कुपी घे आणि तेल त्याच्या मस्तकांवर ओत आणि जाहीर कर, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझा इस्राएलाचा राजा म्हणून अभिषेक करतो.’ नंतर दार उघड आणि पळ; उशीर करू नकोस!” मग तो तरुण संदेष्टा रामोथ-गिलआद येथे गेला. जेव्हा तो तिथे पोहोचला, तेव्हा त्याने पाहिले की सेना अधिकारी सोबत बसलेले आहेत. तो म्हणाला, “सेनापती महोदय, माझ्याजवळ तुमच्यासाठी एक संदेश आहे.” येहूने विचारले, “आमच्यापैकी कोणासाठी?” त्याने उत्तर दिले, “सेनापती महोदय तुमच्यासाठी.” मग येहू उठला आणि तो आत घरात गेला. नंतर संदेष्ट्याने येहूच्या मस्तकांवर तेल ओतले आणि जाहीर केले, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: ‘मी तुझा याहवेहची प्रजा इस्राएलाचा राजा म्हणून अभिषेक करतो. तुला आपला स्वामी अहाबाच्या घराण्याचा नाश करावयाचा आहे. ईजबेलने माझ्या संदेष्ट्यांना आणि याहवेहच्या इतर सेवकांना ठार मारलेल्यांचा सूड तुला उगवावयाचा आहे.

सामायिक करा
२ राजे 9 वाचा

२ राजे 9:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर अलीशा संदेष्ट्याने संदेष्ट्यांच्या शिष्यांपैकी एकाला बोलावून सांगितले, “कंबर बांध आणि ही तेलाची कुपी हाती घेऊन रामोथ-गिलाद येथे जा. तेथे पोहचल्यावर येहू बिन यहोशाफाट बिन निमशी ह्याला शोधून काढ; मग आत जाऊन त्याला त्याच्या भाऊबंदांतून उठवून आतल्या खोलीत घेऊन जा. मग ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर ओत व असे बोल, ‘परमेश्वर म्हणतो, तू इस्राएलाचा राजा व्हावेस म्हणून मी तुला अभिषेक केला आहे.’ मग दार उघडून पळ काढ, थांबू नकोस.” नंतर तो तरुण संदेष्टा रामोथ-गिलाद येथे गेला. तो तेथे जाऊन पोहचतो तर तेथे सैन्याचे सरदार बसले आहेत असे त्याला दिसून आले; तेव्हा तो म्हणाला, “हे सरदारा, तुला काही सांगायचे आहे.” येहूने विचारले, “आम्हा सर्वांतून कोणाला?” तो म्हणाला, “हे सरदारा, तुला.” तेव्हा तो उठून घरात गेल्यावर त्या शिष्याने त्याच्या मस्तकावर तेल ओतून म्हटले, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला परमेश्वराच्या लोकांचा म्हणजे इस्राएलाचा राजा व्हावे म्हणून अभिषेक केला आहे; ईजबेलीच्या हातून माझे सेवक जे संदेष्टे आणि परमेश्वराचे दुसरे सर्व सेवक ह्यांचा रक्तपात झाला आहे त्याचा मला सूड घेणे आहे, म्हणून आपला धनी अहाब ह्याच्या घराण्याचा तू संहार कर.

सामायिक करा
२ राजे 9 वाचा