२ राजे 5:3-5
२ राजे 5:3-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ती आपल्या धनीणीला म्हणाली, “आपल्या मालकांनी शोमरोनातील संदेष्ट्याला भेटावे. तो त्यांचे कोड बरे करेल.” कोणी तरी आपल्या धन्याला सांगितले की ती इस्राएली मुलगी असे म्हणत आहे. त्यावर अरामाचा राजा म्हणाला, “आत्ताच जा. इस्राएलाच्या राजासाठी मी पत्र देतो.” तेव्हा नामान इस्राएलाला निघाला. आपल्याबरोबर त्याने दहा किक्कार चांदी, सोन्याची सहा हजार नाणी आणि दहा पोशाखाचे जोड घेतले.
२ राजे 5:3-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एके दिवशी ती मुलगी आपल्या धनिणीला म्हणाली, “आपल्या स्वामींनी शोमरोनातील संदेष्ट्याची भेट घेतली असती तर किती बरे झाले असते! तो त्यांचा कुष्ठरोग बरा करू शकला असता.” ही इस्राएली मुलगी काय म्हणते हे नामानाने जाऊन राजाला सांगितले. तेव्हा अरामचा राजा म्हणाला, “मग आता जा आणि मी इस्राएलाच्या राजाला पत्र पाठवितो.” मग नामान आपल्याबरोबर चांदीचे दहा तालांत, सोन्याची सहा हजार सोन्याची नाणी आणि उंची पोशाखांचे दहा जोड घेऊन निघाला.
२ राजे 5:3-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ती आपल्या मालकिणीला म्हणाली, “शोमरोनातल्या संदेष्ट्याशी माझ्या धन्याची गाठ पडती तर किती बरे होते? त्याने त्याचे कोड बरे केले असते.” कोणीएकाने जाऊन आपल्या धन्याला सांगितले की ती इस्राएल मुलगी असे असे म्हणत आहे.” अरामाच्या राजाने म्हटले, “जा तर मग. मी इस्राएलाच्या राजाला पत्र देतो.” मग तो माणूस दहा किक्कार1 चांदी, सोन्याची सहा हजार नाणी व दहा पोशाख घेऊन निघाला.