२ राजे 5:26-27
२ राजे 5:26-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो त्याला म्हणाला, “तो पुरुष तुला भेटण्यासाठी आपल्या रथावरून उतरून मागे फिरला तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते काय? चांदी, वस्त्रे, जैतुनांचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे, दासदासी घेण्याचा हा समय आहे काय? तर नामानाचे कोड तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील.” तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्यापुढून चालता झाला.
२ राजे 5:26-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अलीशा त्यास म्हणाला, “नामान तुला भेटायला आपल्या रथातून उतरला तेव्हा माझे लक्ष तुझ्याकडेच होते. चांदी, कपडे, जैतूनाचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे, दासदासी घेण्याची ही वेळ आहे काय?” नामानचा कोड तुला आणि तुझ्या मुलांना सर्वकाळ लागून राहिल. अलीशाकडून गेहजी निघाला तेव्हा त्याची त्वचा बर्फासारखी पांढरी शुभ्र झाली होती. गेहजीला कोड उठले होते.
२ राजे 5:26-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु अलीशा त्याला म्हणाला, “तो मनुष्य तुला भेटण्यास आपल्या रथावरून उतरला, तेव्हा माझा आत्मा तुझ्याबरोबर नव्हता काय? पैसा किंवा पोशाख, जैतुनाची शेते आणि द्राक्षमळे किंवा मेंढरे आणि गुरे किंवा दास आणि दासी मागून घेण्याचा हा समय आहे काय? तुला व तुझ्या संतानाला नामानाचा कुष्ठरोग निरंतर लागून राहील.” तेव्हा गेहजी अलीशाच्या सान्निध्यातून निघून गेला आणि त्याच्या त्वचेवर कोड फुटले होते—आणि त्याची त्वचा हिमासारखी पांढरी झाली होती.