२ राजे 2:22-25
२ राजे 2:22-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अलीशा बोललेल्या वचनाप्रमाणे ते पाणी चांगले झाले व आजपर्यंत ते चांगले आहे. नंतर अलीशा तेथून वर बेथेलास गेला. तो वाटेने वर चालत असता, लहान मुलांनी गावातून निघून त्याची टिंगल करायला सुरुवात केली. ती म्हणाली, “अरे टकल्या वर जा, ए टकल्या, वर जा.” अलीशाने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले आणि परमेश्वराच्या नावाने त्यांना शाप दिला. त्यानंतर दोन अस्वलींनी वनातून बाहेर येऊन त्यांच्यातली बेचाळीस मुले फाडून टाकली. नंतर अलीशा तेथून कर्मेल डोंगराकडे गेला, आणि तिथून तो परत शोमरोनास आला.
२ राजे 2:22-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अलीशाच्या ह्या वचनानुसार ते पाणी चांगले झाले, ते आजवर तसेच आहे. तो तेथून वरती बेथेलकडे चालला; तो वाट चढून जात असता नगरातून काही पोरे बाहेर येऊन त्याची थट्टा करून म्हणाली, “अरे टकल्या, वर जा.” त्याने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले व परमेश्वराचे नाव घेऊन त्यांना शाप दिला. तेव्हा वनातून दोन अस्वली बाहेर पडल्या व त्यांनी त्यांच्यातल्या बेचाळीस पोरांना फाडून टाकले. तो तेथून निघून कर्मेल पर्वताकडे आला आणि तेथून शोमरोनाला माघारी गेला.