२ करिंथ 7:8-11
२ करिंथ 7:8-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी माझ्या पत्राने तुम्हास दुःख दिले ह्याबद्दल मला वाईट वाटत नाही; मला वाईट वाटले होते कारण मला दिसले होते की त्या पत्राने जणू घटकाभर, तुम्हास दुःखी केले होते; तरी आता मी आनंद करतो, तुम्हास दुःख झाले ह्यामुळे नव्हे, तर पश्चात्ताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे, कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते, आमच्याकडून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले. कारण देवप्रेरित दुःख तारणदायी पश्चात्तापास कारणीभूत होतो त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण जगीक दुःख मरणास कारणीभूत होते. कारण पाहा, तुमचे हे दुःख दैवी होते, या एकाच गोष्टीने तुमच्यामध्ये केवढी कळकळ, केवढे दोषनिवारण, केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी, उत्पन्न झाली! या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात ह्याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले आहे.
२ करिंथ 7:8-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जरी माझ्या पत्रामुळे मी तुम्हाला दुःख दिले याचे मला मुळीच वाईट वाटत नाही. याबद्दल जरूर मला दुःख झाले खरे, पण माझ्या पत्राने तुम्हाला थोडाच काळ दुःखी केले हे मी समजतो. तुम्हाला दुःखी केले म्हणून नव्हे, तर त्या दुःखाने तुम्ही पश्चात्तापाकडे वळलात म्हणून मला आनंद वाटतो. तुमचे दुःखी होणे हे परमेश्वराच्या इच्छेनुसार झाले आणि यामुळे आमच्यामुळे तुमची कोणतीही हानी झाली नाही. कारण ईश्वरी दुःखाने पश्चात्ताप व त्याचा परिणाम तारण, परंतु जगीक दुःखाने मरण येते. या ईश्वरी दुःखाने तुमच्यामध्ये काय उत्पन्न केले आहे ते पाहा: किती उत्सुकता, तुम्हाला स्वतः स्पष्ट करण्याची उत्कंठा, किती संताप, किती भय, किती तळमळ, किती आस्था, किती न्याय मिळावा अशी इच्छा आणि या प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतःस निर्दोष असे सिद्ध केले आहे.
२ करिंथ 7:8-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी आपल्या पत्राने तुम्हांला दु:ख दिले ह्याबद्दल मला वाईट वाटत नाही; मला वाईट वाटले होते; कारण त्या पत्रापासून तुम्हांला काही वेळ तरी दु:ख झाले असे मला दिसते. तरी आता मी आनंद करतो; तुम्हांला दु:ख झाले ह्यामुळे नव्हे, तर पश्चात्ताप होण्याजोगे दु:ख झाले ह्यामुळे; कारण देवानुसार तुमचे हे दु:ख दैवी होते; आमच्या हातून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले. कारण ईश्वरप्रेरित दुःख तारणदायी पश्चात्तापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. कारण पाहा, तुमचे हे दुःख दैवी होते; ह्या एकाच गोष्टीने तुमच्यामध्ये केवढी कळकळ, केवढे दोषनिवारण, केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी उत्पन्न झाली! ह्या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात ह्याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले.
२ करिंथ 7:8-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी माझ्या पत्राने तुम्हांला दुःख दिले, ह्याबद्दल मला आता वाईट वाटत नाही. त्या पत्रापासून तुम्हांला काही वेळ तरी दुःख होईल असे मला दिसले असते, तर मला वाईट वाटले असते. परंतु आता मी आनंदी आहे. तुम्हांला दुःख झाले ह्यामुळे नव्हे तर पश्चात्ताप होण्याजोगे दुःख झाले म्हणून. त्या दुःखाचा देवाने उपयोग करून घेतला म्हणून तुम्हांला काही इजा पोहोचली नाही. देवाकडून आलेले दुःख तारणदायक पश्चात्तापास कारणीभूत होते त्याबद्दल खेद वाटत नाही! पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. पाहा, देवाकडून आलेल्या तुमच्या दुःखाचा देवाने किती उपयोग करून घेतला: ह्या एकाच गोष्टीने तुमच्यामध्ये केवढी कळकळ, स्वत:ला निर्दोष ठरविण्यासाठी केवढी उत्सुकता, केवढा आदर, केवढा प्रामाणिकपणा, केवढी उत्कंठा, केवढा आवेश व केवढी न्यायबुद्धी उत्पन्न झाली! ह्या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात ह्याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले.