२ करिंथ 10:15-16
२ करिंथ 10:15-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आम्ही मर्यादा सोडून म्हणजे दुसर्यांच्या श्रमासंबंधाने प्रतिष्ठा मिरवत नाही; तर तुमचा विश्वास वाढत जाईल तसतसे आमच्या मर्यादेचे क्षेत्र तुमच्यामध्ये अधिकाधिक वाढत जाईल अशी आम्हांला आशा आहे, ते असे की, तुमच्या पलीकडल्या भागात आम्ही सुवार्ता सांगावी, दुसर्याच्या कार्यक्षेत्रात अगोदरच झालेल्या कामाची प्रतिष्ठा मिरवू नये.
२ करिंथ 10:15-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आम्ही मर्यादा सोडून दुसर्यांच्या कामात अभिमान मिरवीत नाही; पण आम्हास आशा आहे की, जसा तुमचा विश्वास वाढेल तसा, आमच्या कामाच्या मर्यादेचे प्रमाण अधिक पसरत जाईल. म्हणजे, दुसर्यांच्या कार्यक्षेत्रात आधीच करण्यात आलेल्या कामाचा अभिमान न मिरवता, आम्ही तुमच्या पलीकडील प्रांतांत शुभवर्तमान सांगावे.
२ करिंथ 10:15-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे कार्य दुसर्यांनी केले आहे त्याबद्दल आम्ही मर्यादा सोडून अभिमान बाळगत नाही. तुमचा विश्वास जसजसा वाढत जाईल तसेच आमच्या कार्याचे क्षेत्र तुम्हामध्ये खूप वाढावे, अशी आमची आशा आहे. त्यानंतर तुमच्यापलीकडे, दूरवर असलेल्या प्रांतात आम्हाला शुभवार्ता गाजविता येईल आणि इतर लोकांच्या क्षेत्रात जे काम आधी केले आहे त्याबद्दल अभिमान बाळगण्याचे आम्हास कारण उरणार नाही.
२ करिंथ 10:15-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आम्ही मर्यादा सोडून म्हणजे दुसऱ्यांच्या श्रमासंबंधाने प्रतिष्ठा मिरवत नाही, तर तुमचा विश्वास वाढत जाईल, तसतसे आमच्या सेवाकार्याचे क्षेत्र तुमच्यामध्ये देवाने घालून दिलेल्या मर्यादेत अधिकाधिक वाढत जाईल, अशी आम्हांला आशा आहे. त्यानंतर तुमच्यापलीकडच्या देशांत शुभवर्तमान घोषित करणे आम्हांला शक्य होईल आणि दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात अगोदरच झालेल्या कामाची प्रतिष्ठा मिरवण्याची आम्हांला गरज भासणार नाही.