२ करिंथ 1:9-10
२ करिंथ 1:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
खरोखर आम्हास वाटत होते की, आम्ही मरणारच, पण आम्ही स्वतःवर विश्वास ठेवू नये, तर जो देव मरण पावलेल्यांना उठवतो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा, म्हणून हे घडले. त्याने आम्हास मरणाच्या मोठ्या संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हास ह्यापुढेही सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे.
२ करिंथ 1:9-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
खरोखर आम्हाला मृत्यूची दंडाज्ञा ठरलेली आहे असे वाटले, हे यासाठी झाले की आम्ही केवळ स्वतःवर अवलंबून न राहता, जे मृतांना उठवितात त्या परमेश्वरावरच अवलंबून राहावे. त्यांनी आम्हाला मरणाच्या धोक्यातून सोडविले आणि ते पुन्हा आम्हाला असेच सोडवतील. आम्ही त्यांच्यावर आशा ठेवली आहे की ते आम्हाला असेच पुढेही सोडवित राहतील.
२ करिंथ 1:9-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
फार तर काय, आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हांला सांगत होते; आम्ही स्वत:वर नव्हे तर मृतांना सजीव करणार्या देवावर भरवसा ठेवावा, म्हणून हे झाले. त्याने आम्हांला एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हांला ह्यापुढेही सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे.
२ करिंथ 1:9-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
खरे तर आम्ही मरणारच, असे आमचे मन आम्हांला सांगत होते. आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरवसा ठेवावा, म्हणून हे घडले. त्याने आम्हांला एवढ्या मोठ्या जीवघेण्या संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हांला ह्यापुढेही सोडवेल, अशी त्याच्यामध्ये आम्हांला आशा आहे.