YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 1:8-12

२ करिंथ 1:8-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

बंधूंनो, आमच्यावर आशियात जे संकट आले त्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही इतके, शक्तीपलीकडे, अतिशयच दडपले गेलो की, आम्ही आमच्या जिवंत राहण्याविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती. खरोखर आम्हास वाटत होते की, आम्ही मरणारच, पण आम्ही स्वतःवर विश्वास ठेवू नये, तर जो देव मरण पावलेल्यांना उठवतो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा, म्हणून हे घडले. त्याने आम्हास मरणाच्या मोठ्या संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हास ह्यापुढेही सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे. तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना करून आमचे सहाय्य करावे; मग पुष्कळ लोक आमच्यासाठी उपकार मानतील की त्यांच्या पुष्कळ प्रार्थनांमुळे देवाने आम्हास कृपा दिली आहे. आम्हास अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सदविवेकबुद्धीची साक्ष होय. आम्ही मनुष्याच्या ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामाणिकपणे जगात आणि विशेषतः तुमच्याशी वागलो.

सामायिक करा
२ करिंथ 1 वाचा

२ करिंथ 1:8-12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

प्रिय बंधुनो व भगिनींनो, आशिया प्रांतात ज्या दुःखाच्या अनुभवातून आम्हास जावे लागले, त्याबद्दल तुम्ही अज्ञानी असावे अशी आमची इच्छा नाही. आमच्या कल्पना शक्तिपलीकडे आम्ही ओझ्याखाली अगदी दबून गेलो की; आम्ही जीवनाची आशा सोडून दिली होती. खरोखर आम्हाला मृत्यूची दंडाज्ञा ठरलेली आहे असे वाटले, हे यासाठी झाले की आम्ही केवळ स्वतःवर अवलंबून न राहता, जे मृतांना उठवितात त्या परमेश्वरावरच अवलंबून रहावे. त्यांनी आम्हाला मरणाच्या धोक्यातून सोडविले आणि ते पुन्हा आम्हाला असेच सोडवतील. आम्ही त्यांच्यावर आशा ठेवली आहे की ते आम्हाला असेच पुढेही सोडवीत राहतील. परंतु तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हाला मदत करावी. कारण जो कृपेचा अनुग्रह सर्वांच्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून आम्हास मिळाला आहे, त्याबद्दल आमच्यावतीने अनेकजण परमेश्वराची स्तुती करतील. हे आम्हाला गर्वाचे कारण आहे: आमच्या सर्व व्यवहारात आमच्या विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की या जगात आणि तुमच्या संबंधात, आम्ही पवित्र आणि ईश्वरी प्रामाणिकपणाने भरलेले होतो. हे जगीक ज्ञानावर नव्हे तर परमेश्वराच्या कृपेवर अवलंबून राहिल्यामुळे आम्ही करू शकलो.

सामायिक करा
२ करिंथ 1 वाचा

२ करिंथ 1:8-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

बंधुजनहो, आशियात आमच्यावर आलेल्या संकटांविषयी तुम्हांला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशयच दडपले गेलो; इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हांला झाले. फार तर काय, आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हांला सांगत होते; आम्ही स्वत:वर नव्हे तर मृतांना सजीव करणार्‍या देवावर भरवसा ठेवावा, म्हणून हे झाले. त्याने आम्हांला एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हांला ह्यापुढेही सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे. तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हांला साहाय्य करावे; असे की जे कृपादान पुष्कळ जणांच्या योगे आम्हांला मिळाले त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ जणांनी उपकारस्तुती करावी. आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषेकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्त्विकपणाने वागलो.

सामायिक करा
२ करिंथ 1 वाचा

२ करिंथ 1:8-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

बंधुजनहो, आशियात आमच्यावर आलेल्या संकटाविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही. कारण तिथे आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशय दडपले गेलो. इतके की, आम्ही जगण्याची आशा सोडून दिली. खरे तर आम्ही मरणारच, असे आमचे मन आम्हांला सांगत होते. आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरवसा ठेवावा, म्हणून हे घडले. त्याने आम्हांला एवढ्या मोठ्या जीवघेण्या संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हांला ह्यापुढेही सोडवेल, अशी त्याच्यामध्ये आम्हांला आशा आहे. तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हांला साहाय्य करता त्याप्रमाणे जो आशीर्वाद पुष्कळ जणांच्या प्रार्थनेमुळे आम्हांला मिळाला आहे, त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ लोक देवाचे आभार मानतील. खरे तर आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या औदार्याने व प्रामाणिकपणाने वागलो.

सामायिक करा
२ करिंथ 1 वाचा