२ करिंथ 1:4-5
२ करिंथ 1:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते. त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. कारण ख्रिस्ताची दुःखे जशी आमच्यावर पुष्कळ येतात तसे ख्रिस्ताकडून आमचे सांत्वनही पुष्कळ होते.
२ करिंथ 1:4-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते आपल्या सर्व दुःखांमध्ये आपले सांत्वन करतात, यासाठी की जे सांत्वन आम्हाला परमेश्वराकडून मिळाले आहे, त्या सांत्वनाने जे कोणत्याही दुःखात आहेत त्यांचे सांत्वन करावे. ज्याप्रकारे आम्ही ख्रिस्ताच्या अगणित दुःखांमध्ये सहभागी आहोत, त्याच प्रकारे आमचे सांत्वनही ख्रिस्ताद्वारे विपुल होते.
२ करिंथ 1:4-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हांला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. कारण आमच्या बाबतीत ख्रिस्ताची दु:खे जशी पुष्कळ होतात तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते.
२ करिंथ 1:4-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तो आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन करतो. आम्हांला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते. त्या सांत्वनाने आम्ही संकटग्रस्तांचे सांत्वन करण्यास समर्थ आहोत. कारण जसे आम्ही ख्रिस्ताच्या पुष्कळ दुःखांत सहभागी होतो, तसे ख्रिस्ताद्वारे आम्हांला सांत्वनही पुष्कळ मिळते.