२ करिंथ 1:18-20
२ करिंथ 1:18-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण जसा देव विश्वसनीय आहे; तसे आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे ‘होय’ आणि ‘नाही’ असे नाही. कारण आम्ही, म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य मिळून, तुमच्यात ज्याची घोषणा केली तो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त होय किंवा नाही असा नव्हता तर त्याच्यात होय अशीच होती. कारण देवाची सर्व वचने त्याच्यात ‘होय’ अशी आहेत, म्हणून आपण देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे ‘आमेन’ म्हणतो.
२ करिंथ 1:18-20 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्याप्रकारे परमेश्वर खात्रीने विश्वासू आहे, तेवढ्याच खात्रीने आमचा संदेश “होय” आणि “नाही” असा नाही. तीमथ्य, सीला व मी, तुम्हाला परमेश्वराचे पुत्र येशू ख्रिस्त यांच्याबद्दल संदेश सांगत आलो तो “नाही” आणि “होय” असा नाही, परंतु त्यांच्यामध्ये नेहमीच “होय” आहे. परमेश्वराने कितीही अभिवचने दिलेली असोत, ख्रिस्तामध्ये ती “होय” आहेत. परमेश्वराच्या नावाचे गौरव करीत आम्ही त्यांच्याद्वारे “आमेन” म्हणतो.
२ करिंथ 1:18-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देव विश्वसनीय आहे. आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे, होय, नाही असे नाही.1 कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची घोषणा आमच्याकडून म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून तुमच्यामध्ये झाली ती होय, नाही, अशी नव्हती, तर त्याच्या ठायी होय अशीच होती. देवाची वचने कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे;2 म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारे आमेन म्हणतो.
२ करिंथ 1:18-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
देव विश्वसनीय आहे. आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे, होय-नाही असे द्विधावृत्तीचे नव्हते; कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची जी घोषणा आमच्याकडून म्हणजे सिल्वान, तिमथ्य व माझ्याकडून, तुमच्यामध्ये झाली ती होय-नाही अशी नव्हती, तर त्याच्यामध्ये होय अशीच ठाम स्वरूपाची होती. देवाची वचने कितीही असोत, ख्रिस्तामध्ये ती होकारार्थीच असतात. म्हणून आम्ही देवाच्या गौरवासाठी त्याच्याद्वारे होकार देतो