२ इतिहास 35:1-19
२ इतिहास 35:1-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
योशीयाने परमेश्वराप्रीत्यर्थ यरुशलेमेत वल्हांडण सण पाळला; पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस वल्हांडणाचा यज्ञपशू मारला. त्याने याजकांच्या सेवेचा क्रम लावून दिला आणि परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यास त्यांना प्रोत्साहन दिले. जे लेवी सर्व इस्राएल लोकांना शिकवत असत व परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र झाले होते त्यांना त्याने सांगितले की, “इस्राएलाचा राजा दावीद ह्याचा पुत्र शलमोन ह्याने बांधलेल्या मंदिरात पवित्र कोश ठेवा; ह्यापुढे तुम्हांला आपल्या खांद्यांवर बोजा वागवण्याची जरूरी नाही; तर आता तुम्ही आपला देव परमेश्वर व त्याची प्रजा इस्राएल ह्यांची सेवा करा. इस्राएलाचा राजा दावीद व त्याचा पुत्र शलमोन ह्या दोघांनी लिहून ठेवलेल्या विधींना अनुसरून आपल्या पितृकुळांप्रमाणे आपापल्या क्रमानुसार सेवा करण्यास सिद्ध व्हा. जे तुमचे भाऊबंद आहेत त्यांच्या पितृकुळांच्या विभागांप्रमाणे पवित्रस्थानी तुम्ही उभे राहा, म्हणजे त्यांच्या एकेका भागाप्रीत्यर्थ लेव्यांच्या पितृकुळातील एकेका भागाने सेवा करावी. वल्हांडणाचा यज्ञपशू मारा, आपणांस पवित्र करा आणि मोशेच्या द्वारे सांगितलेल्या परमेश्वराच्या वचनानुसार वागण्यास आपल्या बांधवांना सिद्ध करा.” जे लोक तेथे हजर होते त्या सर्वांना योशीयाने वल्हांडणाच्या यज्ञासाठी राजाच्या मालमत्तेतून तीस हजार शेरडेमेढरे व तीन हजार बैल दिले. सरदारांनी लोकांना, याजकांना व लेव्यांना स्वेच्छार्पणे दिली. देवाच्या मंदिराचे कारभारी हिल्कीया, जखर्या व यहीएल ह्यांनी वल्हांडणाच्या यज्ञांसाठी याजकांना दोन हजार सहाशे शेरडेमेंढरे व तीनशे बैल दिले. कोनन्या व त्याचे बंधू शमाया व नथनेल, हशब्या, यइएल व योजाबाद ह्या लेव्यांच्या प्रमुखांनी लेव्यांना पाच हजार शेरडेमेंढरे व पाचशे बैल वल्हांडणाच्या यज्ञांसाठी दिले. ह्या प्रकारे उपासनेची सिद्धता होऊन राजाज्ञेप्रमाणे याजक आपापल्या स्थानी आणि लेवी आपापल्या क्रमानुसार उभे राहिले. मग वल्हांडणाचे यज्ञपशू वधले; बली देणार्याच्या हातून रक्त घेऊन याजक ते शिंपडत होते आणि लेवी त्या पशूंची कातडी काढत होते. मोशेच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे परमेश्वराला अर्पण करण्यास लोकांच्या पितृकुळांच्या विभागाप्रमाणे देता यावी म्हणून ही होमार्पणे त्यांनी निराळी ठेवली. बैलांचेही त्यांनी तसेच केले. त्यांनी वल्हांडणाच्या यज्ञपशूचे मांस विधीप्रमाणे भाजले आणि पवित्र अर्पणे त्यांनी पातेल्यांत, हंड्यांत व कढयांत शिजवून लोकांना लागलीच पोचती केली. नंतर त्यांनी स्वत:साठी व याजकांसाठी तयारी केली, कारण अहरोनाचे वंशज जे याजक ते रात्र पडेपर्यंत होमबली व चरबी अर्पण करण्यात गुंतले होते; म्हणून लेव्यांनी स्वत:साठी व अहरोनवंशज ह्यांच्यासाठी तयारी केली. दावीद, आसाफ, हेमान आणि राजाचा द्रष्टा यदूथून ह्यांच्या आज्ञेप्रमाणे आसाफ वंशातले गायक आपापल्या ठिकाणी होते, आणि द्वारपाळ प्रत्येक द्वाराजवळ होते; त्यांना आपले काम सोडून जावे लागले नाही, कारण त्यांचे भाऊबंद जे लेवी त्यांनी त्यांच्यासाठी तयारी केली. ह्या प्रकारे त्याच दिवशी योशीया राजाच्या आज्ञेप्रमाणे परमेश्वराच्या सर्व उपासनेची तयारी झाली आणि वल्हांडण सण पाळण्याची व परमेश्वराच्या वेदीवर होमबली अर्पण करण्याची सिद्धता झाली. त्या प्रसंगी जे इस्राएल लोक हजर होते त्यांनी वल्हांडण सण पाळला आणि सात दिवस बेखमीर भाकरीचा सण पाळला. शमुवेल संदेष्ट्याच्या काळापासून ह्या सणाप्रमाणे वल्हांडण सण इस्राएलात केव्हाही पाळण्यात आला नव्हता; योशीया, याजक, लेवी, हजर असलेले सर्व यहूदी व इस्राएल लोक व यरुशलेमनिवासी ह्यांच्याप्रमाणे पूर्वी कोणत्याही इस्राएलाच्या राजाने अशा प्रकारे वल्हांडण सण पाळला नव्हता. योशीयाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी हा वल्हांडण सण पाळण्यात आला.
२ इतिहास 35:1-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
राजा, योशीयाने यरूशलेमात परमेश्वराप्रीत्यर्थ वल्हांडणाचा उत्सव केला. पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू कापला गेला. परमेश्वराच्या मंदिराची कामे पार पाडण्यासाठी योशीयाने याजक नेमले आणि त्यांच्या कार्यात त्यांना प्रोत्साहन दिले. इस्राएली लोकांस शिक्षण देणाऱ्या आणि परमेश्वराच्या सेवेसाठी पवित्र होणाऱ्या लेव्यांना योशीया म्हणाला, “दावीद पुत्र शलमोनाने बांधलेल्या या मंदिरात पवित्र करार कोश ठेवा. दावीद इस्राएलचा राजा होता. यापुढे पवित्र करारकोश वारंवार खांद्यावरुन वाहू नका. परमेश्वर देवाची सेवा करा. देवाची प्रजा म्हणजे इस्राएलचे लोक त्यांची सेवा करा. आपआपल्या घराण्यांप्रमाणे तुमचा जो क्रम ठरला आहे त्यानुसार मंदिरातील सेवेसाठी सिध्द व्हा. इस्राएलाचा राजा दावीद आणि त्याचा पुत्र राजा शलमोन यांनी आखून दिल्याप्रमाणे आपआपली कर्तव्ये पार पाडा. आपआपल्या घराण्यांच्या वर्गवारीप्रमाणे, भाऊबंदांबरोबर पवित्र स्थानी उभे राहा. म्हणजे तुम्हास आपापसात सहकार्य करता येईल. वल्हांडणाचे यज्ञपशू कापा, परमेश्वरासाठी स्वत:चे पवित्रीकरण करा. इस्राएल बांधवांसाठी यज्ञपशू तयार ठेवा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही पार पाडा. या आज्ञा परमेश्वराने आपल्याला मोशेद्वारे दिल्या आहेत.” वल्हांडणासाठी योशीयाने तीस हजार शेरडेमेंढरे जे तेथे उपस्थित होते त्यांना यज्ञपशू म्हणून इस्राएल लोकांस दिली; याखेरीज तीन हजार दिले. हे पशुधन त्याच्या खाजगी मालमत्तेतील होते. या उत्सवा निमित्त योशीयाच्या सरदारांनीदेखील लोकांस, लेवींना आणि याजकांना पशूंचे आणि वस्तूंचे मुक्त वाटप केले. मुख्य याजक हिल्कीया, जखऱ्या आणि यहीएल हे देवाच्या मंदिराचे प्रमुख कारभारी होते. त्यांनी दोन हजार सहाशे शेरडेमेंढरे आणि तीनशे बैल एवढे पशू वल्हांडणाचे बली म्हणून याजकांना दिले. कोनन्या आणि त्याचे भाऊ शमाया व नथनेल यांनी तसेच हशब्या, ईयेल व योजाबाद यांनी लेवींना पाच हजार शेरडेमेंढरे व पाचशे बैल वल्हांडणाचे यज्ञपशू म्हणून दिले, कोनन्या इत्यादी मंडळी लेव्याची प्रमुख होती. वल्हांडणाच्या उपासनेची सर्व सिध्दता झाल्यावर याजक आणि लेवी आपापल्या जागी स्थानापन्न झाले. तशी राजाज्ञाच होती. वल्हांडणाचे कोकरे मारली गेली. त्या पशूंची कातडी काढून रक्त याजकांना दिले. लेवींकडून मिळालेले हे रक्त याजकांनी वेदीवर शिंपडले. त्यांनी मग हे बैल परमेश्वरास होमार्पण करण्यासाठी वेगवेगळ्या घराण्याच्या लोकांकडे स्वाधीन केले. हा अर्पणाचा विधी मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करायचा होता. लेवींनी वल्हांडणाच्या यज्ञपशूंचे मांस विधिवत भाजले. पातेल्यात, हंड्यांत आणि कढई मध्ये त्यांनीही पवित्रार्पणे शिजवली आणि तत्परतेने लोकांस ती नेऊन दिली. हे काम उरकल्यावर लेवींना स्वत:साठी आणि अहरोनाचे वंशज असलेल्या याजकांसाठी मांस मिळाले. कारण हे याजक होमबली आणि चरबी अर्पण करण्यात रात्र पडेपर्यंत गुंतले होते. आसाफच्या घराण्यातील लेवी गायक राजा दाविदाने नेमून दिलेल्या आपापल्या जागांवर उभे होते. आसाफ, हेमान आणि राजाचा संदेष्टा यदूथून हे ते होत. प्रत्येक प्रवेशद्वारावरील द्वारपालांना आपले काम सोडायची गरज नव्हती कारण त्यांच्या लेवी बांधवांनी वल्हांडणाच्या सणाची त्यांच्यासाठी करायची सगळी तयारी केली होती. तेव्हा राजा योशीयाच्या आज्ञेनुसार परमेश्वराच्या उपासनेची सर्व तयारी त्या दिवशी पूर्ण झाली. वल्हांडणाचा उत्सव झाला आणि परमेश्वराच्या वेदीवर होमबली अर्पण करण्यात आले. सर्व उपस्थित इस्राएल लोकांनी वल्हांडणाचा आणि बेखमीर भाकरीचा सण सात दिवस साजरा केला. शमुवेल संदेष्ट्यांच्या काळापासून हा सण एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. इस्राएलच्या कुठल्याच राजाच्या कारकीर्दींत हे झाले नव्हते. राजा योशीया, याजक, लेवी, यहूदा आणि इस्राएलातून आलेले लोक आणि यरूशलेमची प्रजा यांनी वल्हांडणाचा उत्सव थाटामाटाने केला. योशीयाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी हा वल्हांडणाचा उत्सव झाला.
२ इतिहास 35:1-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
योशीयाहने यरुशलेममध्ये याहवेहसाठी वल्हांडण सण साजरा केला आणि वल्हांडणाचे कोकरू पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी कापले गेले. त्याने याजकांना त्यांना दिलेल्या कामासाठी नियुक्त केले आणि याहवेहच्या मंदिराच्या सेवेसाठी त्यांना प्रोत्साहित केले. ज्यांनी सर्व इस्राएली लोकांना आज्ञा केली होती आणि ज्यांना याहवेहसाठी पवित्र केले गेले होते, त्या लेवी लोकांना म्हणाला: “इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाने बांधलेल्या मंदिरात पवित्र कोश ठेवा. ते तुमच्या खांद्यावर वाहून नेण्यासारखे नाही. आता तुमचे परमेश्वर याहवेह आणि त्यांचे इस्राएली लोक यांची सेवा करा. इस्राएलचा राजा दावीद आणि त्याचा पुत्र शलोमोनने लिहिलेल्या सूचनेप्रमाणे तुमच्या विभागातील कुटुंबानुसार तुम्ही स्वतःची तयारी करा. “तुमच्या बरोबरील प्रत्येक उपविभागासाठी लेव्यांच्या गटासह सामान्य इस्राएली लोकांच्या कुटुंबाबरोबर पवित्र ठिकाणी उभे राहा. वल्हांडणाच्या कोकऱ्यांचा वध करा, स्वतःला पवित्र करा आणि तुमच्या सहइस्राएली लोकांसाठी, मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे कोकऱ्यांची तयारी करा.” योशीयाहने तिथे असलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी वल्हांडणाचे अर्पण म्हणून तीस हजार कोकरे आणि बोकडे आणि तीन हजार गुरे ही सुद्धा पुरविली, राजाच्या व्यक्तिगत मालमत्तेतून हे सर्व दिले गेले. त्याच्या अधिकार्यांनीसुद्धा स्वेच्छेने लोकांना आणि याजकांना आणि लेवीय यांना मदत केली. हिल्कियाह, जखर्याह आणि यहीएल हे परमेश्वराच्या मंदिराच्या कारभाराचे अधिकारी होते, त्यांनी याजकांना वल्हांडणाची दोन हजार सहाशे अर्पणे आणि तीनशे गुरे दिली. तसेच कनन्याह बरोबर शमायाह आणि नथानेल, त्याचे भाऊ आणि हशब्याह, ईयेल आणि योजाबाद हे लेवी लोकांचे पुढारी, यांनी लेवीय लोकांसाठी पाच हजार वल्हांडणाची अर्पणे आणि पाचशे गुरे दिली. सेवेची व्यवस्था करण्यात आली आणि राजाच्या आदेशानुसार याजकांनी लेवीय लोकांबरोबर आपले स्थान ग्रहण केले. वल्हांडणाची कोकरे कापली गेली आणि याजकांनी त्यांच्या हाती दिलेले रक्त वेदीवर शिंपडले, त्यावेळेस लेवीय लोकांनी प्राण्यांची कातडी काढली. मोशेच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे याहवेहना अर्पण देण्यासाठी लोकांच्या कुटुंबातील पोटविभागांनी याहवेहना अर्पण द्यावे यासाठी त्यांनी होमार्पण बाजूला ठेवले. त्यांनी गुरांच्या बाबतीतही तसेच केले. त्यांनी नेमून दिल्याप्रमाणे वल्हांडण सणाच्या प्राण्यांना अग्नीवर भाजून घेतले आणि पवित्र अर्पणे मडके, कढई आणि तव्यांत उकळले आणि ते सर्व लोकांना लगेच वाढले. यानंतर, त्यांनी स्वतःसाठी आणि याजकांसाठी तयारी केली, कारण याजक, अहरोनाचे वंशज हे रात्र होईपर्यंत होमार्पण आणि चरबीचे भाग अर्पण करत होते. म्हणून लेवींनी स्वतःसाठी आणि अहरोन वंशज याजकांसाठी तयारी केली. दावीद, आसाफ, हेमान आणि राजाचा संदेष्टा यदूथून त्यांनी नेमून दिल्याप्रमाणे आसाफाचे वंशज जे संगीतकार होते त्यांनी आपआपले स्थान ग्रहण केले. प्रत्येक फाटकावरच्या द्वारपालांना त्यांचे काम सोडण्याची गरज नव्हती, कारण त्यांचे सहकारी लेव्यांनी त्यांच्यासाठी तयारी केली होती. त्यावेळेस योशीयाह राजाच्या आदेशाप्रमाणे वल्हांडण सण साजरा करण्यासाठी आणि याहवेहच्या वेदीवर होमबलींचे अर्पण करण्यासाठी याहवेहची संपूर्ण सेवा पार पडली. त्यावेळी जे इस्राएली लोक तिथे उपस्थित होते त्यांनी वल्हांडण सण साजरा केला आणि बेखमीर भाकरीचा सण सात दिवस पाळला. शमुवेल संदेष्ट्याच्या काळापासून इस्राएलमध्ये अशा प्रकारे वल्हांडण सण साजरा करण्यात आला नव्हता; आणि योशीयाहने ज्याप्रकारे याजक, लेवी आणि सर्व यहूदीया आणि इस्राएली लोक जे यरुशलेममध्ये होते, त्यांच्याबरोबर सण साजरा केला होता तसा वल्हांडण इस्राएलच्या कोणत्याही राजांनी कधीही केला नव्हता. हा वल्हांडण सण योशीयाह राजाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी साजरा करण्यात आला.