YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 34:19-33

२ इतिहास 34:19-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्या नियमशास्त्रातली वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली. मग राजाने हिल्कीया, अहीकाम बिन शाफान, अब्दोन1 बिन मीखा, शाफान चिटणीस व राजसेवक असाया ह्यांना आज्ञा केली की, “हा जो ग्रंथ सापडला आहे त्यातील मजकुरासंबंधाने तुम्ही जाऊन माझ्यातर्फे आणि इस्राएल व यहूदा ह्यांत जे शिल्लक राहिले आहेत त्यांच्यातर्फे परमेश्वराला प्रश्‍न करा. ह्या ग्रंथात जे सर्व लिहिले आहे ते करण्याच्या बाबतीत आमच्या वाडवडिलांनी देवाची आज्ञा पाळली नाही म्हणून परमेश्वराने क्रोधाची वृष्टी आमच्यावर केली आहे, ती फार मोठी आहे.” मग हिल्कीया व राजाने आज्ञा केलेले इतर लोक हे संदेष्ट्री हुल्दा हिच्याकडे गेले. ही शल्लूम बिन ताकहत2 बिन इस्रा नावाच्या जामदाराची स्त्री असून त्या वेळी यरुशलेमेत दुसर्‍या पेठेत राहत होती; तिच्याकडे जाऊन तिला त्यांनी हे कळवले. तेव्हा ती त्यांना म्हणाली, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ज्या पुरुषाने तुम्हांला माझ्याकडे पाठवले त्याला जाऊन सांगा : ‘परमेश्वर म्हणतो, पाहा, यहूदाच्या राजासमोर जो ग्रंथ वाचला त्यात लिहिलेल्या सर्व शापांप्रमाणे मी ह्या स्थानावर व येथील रहिवाशांवर अनिष्ट आणीन. कारण त्या लोकांनी मला सोडून देऊन अन्य देवांपुढे धूप जाळला आहे आणि आपल्या हातांनी घडवलेल्या सर्व वस्तूंमुळे मला संतप्त केले आहे म्हणून ह्या स्थानावर माझ्या क्रोधाची वृष्टी झाली आहे; तो शांत व्हायचा नाही. तथापि ज्याने तुम्हांला परमेश्वराला प्रश्‍न करण्यास पाठवले त्या यहूदाच्या राजाला जाऊन सांगा : इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ही वचने ऐकून तुझे हृदय मृदू झाले, तू देवापुढे नम्र झालास आणि ह्या स्थानाविरुद्ध व येथल्या रहिवाशांविरुद्ध मी सांगितले ते ऐकून तू दीन होऊन आपली वस्त्रे फाडून माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझी विनंती ऐकली आहे, असे परमेश्वर म्हणतो. पाहा, मी तुला तुझ्या पितरांशी मिळवीन; तुला तुझ्या कबरेत शांतीने पोचवतील; जो गहजब मी ह्या स्थळावर व येथल्या रहिवाशांवर आणणार आहे तो तू आपल्या डोळ्यांनी पाहणार नाहीस.” त्यांनी परत येऊन राजाला हे कळवले. मग राजाने यहूदातील व यरुशलेमेतील सर्व वडील जनांना बोलावणे पाठवून जमा केले. यहूदा येथील सर्व लोक, यरुशलेमेतले सर्व रहिवासी, याजक, लेवी अशा सर्व आबालवृद्धांना बरोबर घेऊन राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला; परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने त्याने लोकांना ऐकू येतील अशी वाचून दाखवली. मग राजाने आपल्या स्थानी उभे राहून परमेश्वरासमोर असा करार केला की, ‘मी परमेश्वराचे अनुसरण करीन, त्याच्या आज्ञा, निर्बंध व नियम जिवेभावे पाळीन व त्या ग्रंथातील कराराच्या वचनांप्रमाणे वर्तेन.’ मग यरुशलेमेत व बन्यामिनात जे सर्व लोक आढळले त्यांना त्याने आपल्या करारात सामील केले. यरुशलेमकर आपल्या वडिलांच्या देवाच्या कराराप्रमाणे वागू लागले. इस्राएल लोक ज्या सर्व प्रदेशांत होते तेथून योशीयाने सर्व अमंगळ वस्तू काढून टाकल्या आणि जितके इस्राएल त्यांना मिळाले तितक्या सर्वांना त्याने त्यांचा देव परमेश्वर ह्याची उपासना करायला लावले, त्याच्या सर्व कारकिर्दीत त्यांनी आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर ह्याला अनुसरायचे सोडले नाही.

सामायिक करा
२ इतिहास 34 वाचा

२ इतिहास 34:19-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तो नियमशास्त्रग्रंथ ऐकत असता राजा योशीयाने आपले कपडे फाडले. आणि हिल्कीया, शाफानचा पुत्र अहीकाम, मीखाचा पुत्र अब्दोन, चिटणीस शाफान आणि आपला सेवक असाया यांना योशीयाने आज्ञा केली की. “माझ्या आणि इस्राएल व यहूदा येथे आता शिल्लक असलेल्या लोकांच्या वतीने परमेश्वरास जाऊन विचारा. या पुस्तकातील वचनांविषयी त्यास विचारा. आपल्या पूर्वजांनी परमेश्वराचे म्हणणे न जुमानल्यामुळे परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. आपल्या पूर्वजांचे वर्तन या पुस्तकातील वचनांना अनुसरुन नव्हते.” हिल्कीया आणि राजाचे सेवक हुल्दा नावाच्या संदेष्टीकडे गेले. हुल्दा ही शल्लूमची पत्नीशल्लूम ताकहतचा आणि ताकहत इस्त्राचा पुत्र. इस्त्रा राजाच्या वस्त्रागाराचा प्रमुख होता. हुल्दा यरूशलेमेच्या नवीन भागात राहत होती. हिल्कीया आणि राजाचे सेवकांनी तिला सर्व जे घडले ते सांगितले. हुल्दा त्यांना म्हणाली, “इस्राएलाचा परमेश्वर देव याचे म्हणणे असे आहे.” राजा योशीयाला म्हणावे: परमेश्वर म्हणतो, “या प्रदेशावर आणि इथे राहणाऱ्या लोकांवर मी कोप आणणार आहे.” यहूदाच्या राजाला जे पुस्तक वाचून दाखवण्यात आले. त्यातील मजकुरात आहेत ती सर्व संकटे त्यांच्यावर ओढवतील. माझ्याकडे पाठ फिरवून इतर देवतांपुढे त्यांनी धूप जाळला म्हणून मी असे करणार आहे. आपल्या दुष्कृत्यांमुळे लोकांनी मला सतंप्त केले आहे. या क्रोधाचा अंगार त्यांच्यावर बरसेल आणि तो शांत होणार नाही. पण यहूदाचा राजा योशीया याला सांग, त्यानेच तुला माझ्याकडे पाठवले आहे की तू नुकतेच जे ऐकलेस त्याविषयी इस्राएलाचा परमेश्वर देव म्हणतो: योशीयाने, पश्चातापाने देवासमोर विनम्र झाला. खेदाने आपले कपडे फाडलेस. तू रडलास. तू मृदू अंत:करणाचा असल्यामुळे तुझ्या पूर्वजांकडे मी तुला नेईन. तुला शांत मरण येईल. या प्रदेशावर आणि लोकांवर जी संकटे कोसळतील ती तुला पाहायला लागणार नाहीत. हिल्कीया आणि राजाचे सेवक यासर्वांनी हा निरोप राजाला येऊन सांगितला. तेव्हा राजा योशीयाने यहूदा आणि यरूशलेममधील सर्व वयोवृद्धांना भेटीसाठी एकत्र बोलावले. राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. यहूदातील सर्व प्रजा, यरूशलेममधील सर्व थोर तसेच सामान्य माणसे, याजक आणि लेवी हे सर्व राजासोबत होते. परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने तेथे राजाने त्यांना वाचून दाखवली. मग राजा उभा राहिला. त्याने परमेश्वराशी करार केला. परमेश्वरास अनुसरायचे, त्याचे आज्ञा, नियम आणि विधी पाळायचे त्याने कबूल केले. हे सर्व त्याने मन:पूर्वक करायचे मान्य केले. नियमशास्त्रातील वचनांप्रमाणे वागायचे कबूल केले. मग त्याने यरूशलेम आणि बन्यामीन मधील लोकांसही या करारपालनात सामील करून घेतले. यरूशलेमचे लोक आपल्या पूर्वजांच्या देवाचा करार पाळू लागले. इस्राएलमध्ये वेगवेगळ्या देशांमधील विविध मूर्ती होत्या. पण त्या सर्व अनिष्ट मूर्ती योशीयाने फोडून तोडून टाकल्या. इस्राएल लोकांस त्याने परमेश्वर देवाची सेवा करायला लावले. आणि योशीया जिवंत असेपर्यंत लोक आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचीच उपासना करत होते.

सामायिक करा
२ इतिहास 34 वाचा

२ इतिहास 34:19-33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जेव्हा राजाने नियमशास्त्राचे शब्द ऐकले तेव्हा त्याने त्याची वस्त्रे फाडली. त्याने हिल्कियाह, शाफानाचा पुत्र अहीकाम आणि मीखाहचा पुत्र अब्दोन आणि शाफान चिटणीस आणि राजाचा सेवक असायाह यांना हा आदेश दिला: “जा आणि माझ्यासाठी आणि इस्राएल आणि यहूदीयामध्ये जे लोक राहत आहेत, त्यांच्याबद्दल या पुस्तकात लिहिलेले जे काही सापडले आहे, त्याबद्दल याहवेहकडे चौकशी करा. याहवेहचा फार मोठा क्रोध आपल्यावर आला आहे, कारण आपल्या पूर्वजांनी याहवेहच्या वचनाचे पालन केले नाही; या पुस्तकात जे सर्वकाही लिहिलेले आहे त्याप्रमाणे ते वागले नाहीत.” हिल्कियाह आणि त्याच्याबरोबर राजाने ज्यांना पाठवले होते, ते संदेष्टी हुल्दाह हिच्याशी बोलण्यास गेले, ती पोशाख भांडाराचा अधिकारी हसराहचा पुत्र तोखाथ चा पुत्र शल्लूमची पत्नी होती. ती यरुशलेमच्या नव्या पेठेत राहत होती. ती त्यांना म्हणाली, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ज्या मनुष्याने तुम्हाला माझ्याकडे पाठवले आहे, त्याला सांगा, ‘याहवेह असे म्हणतात: मी या ठिकाणावर आणि येथील लोकांवर संकट आणेन आणि यहूदीयाच्या राजासमोर वाचलेल्या ग्रंथात लिहिलेले सर्व शाप आणेन. कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि इतर दैवतांना धूप जाळले आहेत आणि त्यांच्या हस्तकृतींनी माझा राग पेटविला गेला आहे आणि माझा राग या जागेवर ओतला जाईल आणि तो शांत होणार नाही.’ यहूदीयाच्या राजाला हे जाऊन सांगा, ज्याने तुम्हाला याहवेहची चौकशी करण्यासाठी पाठविले होते, ‘जे वचन तू ऐकले होते त्याबद्दल याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: कारण तुझे अंतःकरण प्रतिसाद देणारे होते आणि जेव्हा या ठिकाणाविषयी आणि येथील लोकांविरुद्ध तो जे काही बोलला ते तू ऐकले तेव्हा तू स्वतःला परमेश्वरासमोर नम्र केलेस आणि तू माझ्यासमोर नम्र झालास आणि तुझी वस्त्रे फाडली आणि माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझे ऐकले आहे, असे याहवेह जाहीर करतात. आता मी तुला तुझ्या पूर्वजांबरोबर मिळवेन आणि तुला शांतीने पुरले जाईल. या ठिकाणावर आणि येथे राहणाऱ्यांवर मी जे संकट आणणार आहे, ते तुझ्या डोळ्यांना दिसणार नाही.’ ” तेव्हा त्यांनी तिचे उत्तर परत राजाला जाऊन सांगितले. नंतर राजाने यहूदीया आणि यरुशलेममधील सर्व वडीलजनांना एकत्र बोलाविले. यहूदीयाचे लोक, यरुशलेम येथील रहिवासी, याजक आणि लेवी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोकांबरोबर राजा याहवेहच्या मंदिरात गेला. याहवेहच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व शब्द त्याने त्यांना ऐकू जातील असे वाचून दाखविले. राजा त्याच्या स्तंभाजवळ उभा राहिला आणि त्याने याहवेहसमोर याहवेहचे अनुसरण करणे आणि त्यांच्या आज्ञा, कायदा आणि हुकूमनाम्याचे पालन करणे आणि या ग्रंथात लिहिलेल्या शब्दांचे त्याच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि संपूर्ण आत्म्याने पालन करण्याच्या कराराचे नवीनीकरण केले. नंतर त्याने यरुशलेममधील प्रत्येकाला आणि बिन्यामीन गोत्रांच्या लोकांना तसे वचन देण्यास लावले; यरुशलेमच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वराबरोबर केलेल्या कराराप्रमाणे केले. योशीयाहने इस्राएली लोकांच्या सर्व प्रदेशामधून सर्व घृणास्पद मूर्ती काढून टाकल्या आणि इस्राएलमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना त्यांचे परमेश्वर याहवेहची सेवा करावयास लावले. जोपर्यंत तो जिवंत होता, तोपर्यंत त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांचे अनुसरण करण्यास ते चुकले नाहीत.