YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 1:14-17

२ इतिहास 1:14-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

शलमोनाने रथ व राऊत ह्यांचा संग्रह केला; त्याच्या-जवळ चौदाशे रथ व बारा हजार राऊत झाले; त्यांतले काही रथ ठेवायच्या नगरात व काही यरुशलेमेत आपल्याजवळ त्याने ठेवले. राजाने यरुशलेमेत चांदी व सोने धोंड्यांप्रमाणे आणि गंधसरू तळवटीतल्या उंबराच्या झाडांप्रमाणे विपुल केले. शलमोनाचे घोडे मिसर देशातून येत; राजाचे व्यापारी घोड्यांच्या एकेका तांड्यांची किंमत ठरवून तांडेच्या तांडे घेत. एकेका रथास सहाशे शेकेल चांदी व एकेका घोड्यास दीडशे शेकेल चांदी देऊन ते मिसर देशाहून आणीत; तसेच ते व्यापारी हित्ती व अरामी राजांसाठीही आणीत.

सामायिक करा
२ इतिहास 1 वाचा

२ इतिहास 1:14-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

शलमोनाने घोडे आणि चौदाशे रथ यांची जमवाजमव केली. त्याच्याकडे बारा हजार घोडेस्वार जमा झाले. त्यांना त्याने रथासाठी जागा असलेल्या नगरांमध्ये ठेवले, व काही जनांना त्याने आपल्याजवळ यरूशलेम येथेच ठेवून घेतले. राजाने यरूशलेमेमध्ये चांदी व सोन्याचा एवढा संचय केला की, ते दगडांप्रमाणे विपुल झाले तसेच गंधसरूचे लाकूड पश्चिमेकडील डोंगराळ भागात उंबराचे लाकूड जसे विपुल होते तसे केले. मिसर आणि क्यू येथून शलमोनाने घोडे मागवले होते. राजाचे व्यापारी क्यू येथे घोडयांची खरेदी करत. त्यांनी प्रत्येक रथ सहाशे शेकेल चांदीला व प्रत्येक घोडा दिडशें शेकेल चांदीला या प्रमाणे मिसरामधून ही खरेदी करून मग ते हेच रथ आणि घोडे हित्ती व अरामी राजांना विकले.

सामायिक करा
२ इतिहास 1 वाचा

२ इतिहास 1:14-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

शलोमोनजवळ रथ व घोडे यांचा साठा झाला; त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बारा हजार घोडे, जे त्याने रथांच्या शहरात व काही यरुशलेमात राजाकडे ठेवली होती. राजाने यरुशलेमात चांदी व सोने धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले. शलोमोनच्या घोड्यांची आयात इजिप्त आणि कवे वरून होत असे; त्यावेळेच्या दरानुसार किंमत लावून राजाचे व्यापारी ते कवेवरून विकत घेत असे. त्यांनी सहाशे शेकेल चांदी देऊन इजिप्तवरून रथ आयात करून आणले व एकेका घोड्याची किंमत एकशे पन्नास शेकेल चांदी इतकी होती. हिथी व अरामी राजांना सुद्धा ते निर्यात करीत असे.