शलमोनाने रथ व राऊत ह्यांचा संग्रह केला; त्याच्या-जवळ चौदाशे रथ व बारा हजार राऊत झाले; त्यांतले काही रथ ठेवायच्या नगरात व काही यरुशलेमेत आपल्याजवळ त्याने ठेवले. राजाने यरुशलेमेत चांदी व सोने धोंड्यांप्रमाणे आणि गंधसरू तळवटीतल्या उंबराच्या झाडांप्रमाणे विपुल केले. शलमोनाचे घोडे मिसर देशातून येत; राजाचे व्यापारी घोड्यांच्या एकेका तांड्यांची किंमत ठरवून तांडेच्या तांडे घेत. एकेका रथास सहाशे शेकेल चांदी व एकेका घोड्यास दीडशे शेकेल चांदी देऊन ते मिसर देशाहून आणीत; तसेच ते व्यापारी हित्ती व अरामी राजांसाठीही आणीत.
२ इतिहास 1 वाचा
ऐका २ इतिहास 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 1:14-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ