1 तीमथ्य 6:9-10
1 तीमथ्य 6:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते परीक्षेत आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक अभिलाषांच्या आहारी जाऊन नाश पावतात. कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. काही लोक त्याची हाव धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेत त्यामुळे त्यांनी स्वतःलाच पुष्कळ दुःख करून घेतले आहे.
1 तीमथ्य 6:9-10 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे श्रीमंत होण्याची इच्छा धरतात, ते परीक्षेत आणि फासात व अति मूर्खपणाच्या आणि अपायकारक अभिलाषांच्या आहारी जातात, जी त्यांना अधोगतिला नेऊन त्यांचा पुरा नाश करतात. कारण पैशाचा लोभ सर्वप्रकारच्या दुष्टाईचे एक मूळ होय. पैशाच्या आसक्तीने कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस अनेक दुःखांनी भेदून घेतले आहे.
1 तीमथ्य 6:9-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणार्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वत:स पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.
1 तीमथ्य 6:9-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु जे धनवान होऊ पाहतात, ते मोहपाशात सापडून मूर्खपणाच्या बाधक वासनांत अडकून स्वतःचा नाश व विध्वंस ओढवून घेतात; कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे मूळ आहे, त्याच्या मागे लागून कित्येक जण विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी पुष्कळ दुःखांनी त्यांची हृदये विदीर्ण करून घेतली आहेत.