1 थेस्सल 5:5-8
1 थेस्सल 5:5-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात; आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. ह्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. झोप घेणारे रात्री झोप घेतात, आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे.
1 थेस्सल 5:5-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात; आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. ह्यावरून आपण इतरांप्रमाणे झोप घेवू नये, तर जागे व सावध रहावे. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. परत जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्राण घालावे.
1 थेस्सल 5:5-8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु तुम्ही बंधू आणि भगिनींनो तुम्ही सर्व प्रकाशाची व दिवसाची मुले आहात. आम्ही रात्रीचे किंवा अंधकाराचे नाही. आपण जे झोपी गेलेले आहेत, त्यांच्यासारखे असू नये, परंतु आपण जागृत आणि शुद्धीवर असलेले असावे. झोप घेणारे, रात्री झोपतात, मद्य पिणारे, रात्री मद्य पितात. परंतु जे आपण दिवसाचे आहोत, ते आपण संयमी असावे, विश्वास आणि प्रीतिचे चिलखत धारण करावे, आणि तारणाची आशा हे शिरस्त्राण धारण करावे.
1 थेस्सल 5:5-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुम्ही सगळे प्रकाशाची आणि दिवसाची मुले आहात. आपण रात्रीचे किंवा अंधाराचे नाही. म्हणून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे राहून सावध असावे. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात परंतु आपण दिवसाचे आहोत म्हणून आपण सावध असावे. आपण विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे.