YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 3:7-10

१ शमुवेल 3:7-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

शमुवेलाला तर अजून परमेश्वराचा काही अनुभव आला नव्हता, आणि परमेश्वराचा संदेश अजून त्यास प्रगट झालेला नव्हता. मग परमेश्वराने शमुवेलाला पुन्हा तिसऱ्याने हाक मारली. तेव्हा तो पुन्हा उठून एलीकडे जाऊन म्हणाला, “मी येथे आहे, कारण तुम्ही मला हाक मारलीत.” तेव्हा एलीला समजले की, परमेश्वराने मुलाला हाक मारली आहे. मग एली शमुवेलाला म्हणाला, “तू जाऊन पुन्हा झोप; आणि जर त्याने तुला पुन्हा हाक मारली, तर असे म्हण, हे परमेश्वरा बोल कारण तुझा दास ऐकत आहे.” मग शमुवेल परत जाऊन आपल्या जागी झोपला. आणि परमेश्वर आला आणि उभा राहिला; त्याने पहिल्या वेळेप्रमाणे, “शमुवेला शमुवेला,” अशी हाक मारली. तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोल तुझा दास ऐकत आहे.”

सामायिक करा
१ शमुवेल 3 वाचा

१ शमुवेल 3:7-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

शमुवेलने तर अजूनही याहवेहला ओळखले नव्हते: याहवेहचे वचन आतापर्यंत त्याला प्रकट झाले नव्हते. याहवेहने तिसर्‍यांदा हाक मारली, “शमुवेल!” आणि शमुवेल उठला आणि एलीकडे गेला आणि म्हणाला, “मी येथे आहे; तुम्ही मला बोलाविले.” तेव्हा एलीला समजले की, याहवेह त्या बालकाला बोलावित होते. म्हणून एलीने शमुवेलास सांगितले, “जा आणि झोप आणि जर त्यांनी पुन्हा तुला हाक मारली, तर म्हण, ‘याहवेह, बोला, कारण, तुमचा सेवक ऐकत आहे.’ ” तेव्हा शमुवेल गेला आणि त्याच्या जागेवर झोपला. याहवेह आले आणि तिथे उभे राहिले आणि इतर वेळेप्रमाणे हाक मारली, “शमुवेल! शमुवेल!” तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोला, तुमचा सेवक ऐकत आहे.”

सामायिक करा
१ शमुवेल 3 वाचा

१ शमुवेल 3:7-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

अद्यापि शमुवेलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती, आणि परमेश्वराचे वचन त्याला प्रगट झाले नव्हते. परमेश्वराने शमुवेलास तिसर्‍यांदा हाक मारली, तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, “काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारलीत?” परमेश्वर त्या बालकाला हाक मारत आहे असे एली आता समजला. तेव्हा एली शमुवेलास म्हणाला, “जाऊन नीज, आणि त्याने पुन्हा हाक मारली तर म्हण, हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे.” मग शमुवेल जाऊन आपल्या जागी निजला. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला, आणि पहिल्याप्रमाणे “शमुवेला, शमुवेला” अशी त्याने हाक मारली, तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोल, तुझा दास ऐकत आहे.”

सामायिक करा
१ शमुवेल 3 वाचा