अद्यापि शमुवेलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती, आणि परमेश्वराचे वचन त्याला प्रगट झाले नव्हते. परमेश्वराने शमुवेलास तिसर्यांदा हाक मारली, तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, “काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारलीत?” परमेश्वर त्या बालकाला हाक मारत आहे असे एली आता समजला. तेव्हा एली शमुवेलास म्हणाला, “जाऊन नीज, आणि त्याने पुन्हा हाक मारली तर म्हण, हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे.” मग शमुवेल जाऊन आपल्या जागी निजला. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला, आणि पहिल्याप्रमाणे “शमुवेला, शमुवेला” अशी त्याने हाक मारली, तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोल, तुझा दास ऐकत आहे.”
१ शमुवेल 3 वाचा
ऐका १ शमुवेल 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 3:7-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ